दरवर्षी १ मे हा दिवस, महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेची आठवण म्हणून १९६० पासून हा दिवस साजरा केला जातो. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. मात्र, असे असले तरी महाराष्ट्र स्वतंत्र नव्हता. किंबहुना तेव्हा देशाचा नकाशा खूपच वेगळा होता. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढे हळू हळू देशातील राज्ये भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगवेगळी होऊ लागली. त्यानुसारच १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. (Maharashtra)
त्यानंतर दरवर्षी १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. तब्बल १०६ लोकांनी आपल्या जीवाचे बलिदान देऊन या राज्याची निर्मिती केली आहे. या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली जाते. या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. शिवाय १ मे हा दिवस कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याची निर्मिती वाटते तितकी सोपी अजिबातच नव्हती. (Maharashtra Day)
महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली?
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वेगवेगळी राज्ये मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोकं राहत होते. त्याच दरम्यान भाषावार राज्य, प्रांत निर्माण करण्याची मागणी जोर धरु लागली. मराठी भाषिकांना त्यांचे स्वतःचे राज्य पाहिजे होते तर गुजराती भाषिकांनी देखील स्वत:चं वेगळं राज्य हवं होतं. ही मागणी दिवसेंदिवस जोर धरू लागली. या मागणीसाठी अनेक आंदोलनं झाली. (Marathi Latest News)
प्र.के.अत्रे, प्रबोधन ठाकरे, सेनापती बापट, शाहीर अमरशेख आणि कॉ. डांगे यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रीय सहभाग होता. या आंदोलनासाठी अत्रे यांनी मराठा नावाचे दैनिक काढले होते. त्यातल्याच एका आंदोलनामध्ये तब्बल १०६ लोकांनी आपला प्राण गमावला आणि त्यानंतरच आपल्याला हे राज्य मिळाले. या आंदोलनाचा परिणाम म्हणून १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली. (Marathi Trending News)
१०६ आंदोलक हुतात्मे झाले ते आंदोलन
दिवस होता २१ नोव्हेंबर १९५६ चा मुंबईच्या फ्लोरा फाउंटनच्या परिसरात खूपच तणावाचे वातावरण होते. याचे कारण म्हणजे राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले. मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असूनही महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले गेले. त्यामुळे मराठी माणसं खूपच चिडली होती. सर्वत्र छोट्या मोठ्या सभा होत होत्या आणि या सभांमधून आयोगाच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त केला जात होता. या सर्व लहान लहान संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार आणि आपला निषेध नोंदवणार असे ठरले. (Top Marathi News)
ठरल्याप्रमाणे एक प्रचंड मोठा जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून आकाशाला चीर देतील अशी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमू लागला. हा मोर्चा पांगवण्यासाठी उधळून लावण्यासाठी पोलिसांनी आपली सर्व ताकद पणाला लावली. त्यांनी मोर्चा मधल्या लोकांवर लाठीचार्ज देखील केला. मात्र त्यादिवशी मराठी माणसाचे मनसुबे काही औरच होते. काहीही झाले तरी मागे फिरायचे नाही, ही सक्त ताकीद त्यांनी स्वतःला आधीच दिली होती. त्यामुळेच या अढळ सत्याग्रहींसमोर पोलिसांचे सर्व प्रयत्न अयशस्वी होत होते. (Top Marathi Stories)
मात्र हा मोर्चा उधळून लावण्यासाठी सरकारचे आणि पोलिसांचे सर्वच प्रयत्न चालू होते. अशातच मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबार करण्याचा मोठा आदेश दिला. त्यांच्या या आदेशावरून मोर्चेकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला. या दुर्दैवी घटनेमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातल्या तब्बल १०६ आंदोलकांना हौतात्म्य आले. (Social News)
या घटनेनंतर एकच विस्फोट झाला आणि मुंबई महाराष्ट्राला जोडली जावी यासाठी लोकं अधिकच आक्रमक झाले. या मागणीपुढे आणि लोकांच्या प्रक्षोभापुढे अखेर सरकार झुकले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे अखेर सरकारने नमते घेतले आणि १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर १९६५ मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.