फ्रान्समधील रोकामाडॉर हे अतिशय लोकप्रिय असे पर्यटनस्थळ आहे. मोठे किल्ले आणि हजार वर्षाचा इतिहास या शहराला आहे. रोकामाडॉरचा समावेश मध्ययुगीन ख्रिश्चन धर्मातील महत्त्वाच्या शहरांमध्ये होतो. या शहराला अनेक पर्यटक एका खास वस्तूला पहाण्यासाठी भेट देतात, ती वस्तू म्हणजे, प्रत्यक्ष देवदुतानं दिलेली असल्याची भावना येथील जनतेची आहे. रोकामाडॉरचे सर्वात पवित्र चॅपलच्या प्रवेश द्वारावरील खडकांमध्ये एक तलवार होती. ही तलवार राजाला प्रत्यक्ष देवदुतांनी भेट दिल्याची आख्ययिका या भागात सांगितली जाते.
पण अचानक ही तलवार गायब झाली आहे. ज्या तलवारीमध्ये दगडाला चिरण्याचे सामर्थ्य होते, ती तलवार एका रात्रीत गायब झाली आहे. शंभर फूट खडकामध्ये असलेली तलवार गायब झाल्यानं फ्रान्समधील रोकामाडौर शहर सध्या स्तब्ध झाल्यासारखे आहे. ही तलवार जादुची आहे, अशी आख्यायिकाही सांगितली जात होती. १३०० वर्षापासूनची ही तलावर एका रात्रीत आकाशात गेली की दगडात सामावून गेली, असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. (The Secret of the Sword)
एवढ्या वर्षापासून दगडात अडकलेल्या या तलवारीचा धातू एवढा खास होता की, त्यावर हवामानाचा कुठलाही परिणाम झालेला नव्हता. ती सदैव तेजोमय दिसायची. अशी १३०० वर्ष जुनी तलवार गायब झाल्यानं फ्रान्समध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेनं फ्रान्समध्ये सोशल मिडियावर अनेक अफवाही पसरल्या आहेत. तर फ्रान्स सरकारनं या तलवारीच्या शोधासाठी एक स्वतंत्र पथक स्थापन केलं आहे. फ्रान्सच्या रोकामाडॉर शहरामधून १३०० वर्षे जुनी तलवार गायब झाल्याची बातमी आली आणि एकच खळबळ उडाली.
ही तलवार इतकी वर्षे खडकात गाडली होती. या तलवारीवर कोणत्याही हवामानाचा परिणाम झाला नव्हता पण ती एका रात्रीत अचानक गायब झाल्यानं अनेकांना धक्का बसला आहे. फ्रान्सचा राजा आर्थर यांच्या वारशातील प्रसिद्ध अशी ही एक्सकॅलिबर तलवार होती. ती अचानक गायब झाल्याने देशभरात घबराट पसरली आहे. तलवार गायब होणे ही गुढ घटना असल्याचे काहींचे म्हणणे आहे. तर काही नागरिक या घटनेचा पुराणकथेशी संबंध जोडत आहेत. महाकाय जादुई तलवार एक्सकॅलिबर ही पौराणिक आख्यायिकांनी वेढलेली आहे. (The Secret of the Sword)
या तलवारीला जगातील सर्वात तीक्ष्ण धार असलेली तलवार मानली जाते. १३०० वर्षांहून अधिक काळ खडकात दडलेली तलवार कोणी काढली याबाबत अद्यापही पोलिसांकडे माहिती नाही. तलवार जमिनीपासून खूप वर होती. जवळपास १०० फूटांपेक्षा हे अंतर जास्त होते. शिवाय तलवार ज्या दगडावर होती, तो उभा चढ आहे. इथपर्यंत कोण कसे गेले असेल, याचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेमुळे या भागातील पोलिसही आश्चर्यचकित झाले आहेत.
ही अवघडातील अवघड अशी चोरी असल्याची चर्चा सुरु आहे. कारण एक्सकॅलिबर तलवार एका फटक्यात मोठमोठे दगड देखील कापण्यास सक्षम होती. फ्रान्सच्या राजघराण्यासोबत या एक्सकॅलिबर तलवारीच्या कहाण्या आहेत. राजा आर्थरच्या वारशाशी निगडीत ही तलवार आहे. ही तलवार शतकानुशतके रोकामाडॉरच्या इतिहासाचा भाग आहे. एक्सकॅलिबर मिळाली नाही तर फ्रान्सच्या इतिहासातील महत्त्वाचा भाग पुसल्याची भावना आता स्थानिकांना वाटत आहे. (The Secret of the Sword)
===============
हे देखील वाचा : भेट दिलेली मुर्ती झाली अमेरिकेची ओळख
===============
पौराणिक कथेनुसार, आठव्या शतकात एका देवदूताने रोमन सम्राट शारलेमेनला एक्सकॅलिबर तलवार दिली होती. फ्रेंच साहित्यात लोकप्रिय असलेली ११ व्या शतकातील कविता एक्सकॅलिबर तलवारीच्या ‘जादुई क्षमतेचे’ वर्णन करते. ‘द सॉन्ग ऑफ रोलँड’ या कवितेची प्रत ऑक्सफर्डमधील बोडलेयन लायब्ररीत ठेवण्यात आली आहे. या तलवारीबाबत शहरात अनेक कथा प्रचलित आहेत. यातील सर्वात लोकप्रिय म्हणजे राजा शारलेमेनने आपला शूर सैनिक रोलँड याला ही जादूची तलवार भेट दिली होती. (The Secret of the Sword)
युद्धात जखमी झालेल्या आणि युद्धात मृत्यू निश्चित असलेल्या रोलँडने तलवार नष्ट करण्याचा प्रयत्न केला. कारण त्याच्या शत्रूंची या तलवारीवर नजर होती. त्यांना ती मिळू नये म्हणून त्यानं ही तलवार हवेत फेकली आणि ती फ्रान्सच्या रोकामाडौर शहरातील एका खडकावर पडली. तेव्हापासून, म्हणजे, १३०० पासून एक्सकॅलिबर तलवार त्याच जागेवर होती. देशविदेशातून अनेक पर्यटक ही तलवार बघायला यायचे. आणि त्यासंबंधीच्या कथा ऐकायचे. आता तलवार गायब झाल्यानं फ्रान्समध्ये खळबळ उडाली आहे.
सई बने