दोन मिनिटांत झटपट तयार होणारी मॅगी प्रत्येकजण आवडीने खातात. मार्केटमध्ये काही प्रकारचे नुडल्स मिळतात. परंतु मॅगीला एक वेगळीच पसंदी नेहमी मिळते. लोकांना मॅगी ऐवढी आवडते की, त्याच्या किंमतीत वाढ झाली तरीही ती खाणे सोडत नाही. मात्र तुम्हाला माहितेय का, मॅगीची कल्पना कोणाला आणि कोठून आली असेल. भारतापर्यंतचा याचा प्रवास कसा झाला? याच बद्दल आपण आज अधिक जाणून घेऊयात. (Maggi history)
महिलांच्या मजबूरीने सुरु झाला होता मॅगीचा प्रवास
आज आवडीने खाल्ली जाणारी ही मॅगी ऐकेकाळी मजबूरीचे कारण ठरली होती. खरंतर स्विर्त्झलँन्ड मध्ये जेव्हा इंडस्ट्रियल क्रांति शिगेला पोहचली होती. त्यावेळी महिलांना फॅक्ट्रीत काम करण्याचा अधिकार मिळाला होता. मात्र त्यांच्यावर घराच्या जबाबदाऱ्या सुद्धा होत्या. त्यामुळे दीर्घकाळ फॅक्ट्रीत काम केल्यानंतर घरी जाऊन जेवण ही त्यांना बनवावे लागायचे. त्यांच्याकडे वेळेचा अभाव होता. तेव्हा महिलांनी या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्विस पब्लिक वेल्फेअर सोसायटीने एक पाऊल उचलले.
कसे पडेल याचे नाव
स्विस पब्लिक वेल्फेअर सोसायटीने जूलियस मॅगीची मदत घेतली. जूलियस माइकल जोहासन मॅगीने १८७२ मध्ये जेव्हा महिलांची ही समस्या पाहिली तेव्हा त्यांनी पीठापासून तयार करण्यात आलेले फूड्स विक्री करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांचा हा व्यवसाय काही चालला नाही. त्यानंतर १८९७ मध्ये त्यांनी असे फूड्स तयार करण्यास सुरुवात केली, जे लवकर शिजले जातील. कारण महिलांचा जेवण बनवण्याचा वेळ वाचला जाईल. त्याचसोबत मॅगीची सुरुवात झाली. १८९७ मध्ये सर्वाधिक प्रथम जर्मनी मध्ये नूडल्सची सुरुवात झाली. जूलियस मॅगीने आपल्या नवावरुन कंपनीचे नाव मॅगी असे ठेवले. (Maggi history)
हेही वाचा- श्रीराम ग्रुपच्या फाउंडर्सनी कर्मचाऱ्यांमध्ये विभागली ६ हजार कोटींची संपत्ती
दोन मिनिटांत शिजणाऱ्या मॅगीला फार पसंद केले गेले. १९१२ मध्ये मॅगीला फ्रांन्स आणि अमेरिकासारख्या अन्य काही देशात मिळू लागली. मात्र त्याच काळात जूलियस मॅगी यांचे निधन जाले. त्यांच्या मृत्यूचा परिणाम हा मॅगी उत्पादनावर झाला. दीर्घकाळ हा व्यवसाय मंदगतीने चालत होता. त्यानंतर १९४७ मध्ये नेस्लेने मॅगीला खरेदी केले आणि त्याची ब्राँन्डिंग करत मार्केटिंगने मॅगीला घरोघरी पोहचवण्याचे काम केले. नेस्ले इंडिया लिमिडेटने मॅगीला १९८४ मध्ये भारतात आणले. त्यावेळी कोणीही विचार केला नव्हता की, मॅगी करोडो लोकांची पसंद होईल.