Home » Luna 25 मध्ये रशियाकडून झाली ‘ही’ चूक

Luna 25 मध्ये रशियाकडून झाली ‘ही’ चूक

जवळजवळ ५० वर्षांमध्ये रशियाचे पहिले चंद्रयान मिशन लूना-२५ चंद्रावर लँन्डिंग करण्याच्या प्रयत्नाआधीच कोसळले गेले आहे.

by Team Gajawaja
0 comment
Luna-25
Share

जवळजवळ ५० वर्षांमध्ये रशियाचे पहिले चंद्रयान मिशन लूना-२५ चंद्रावर लँन्डिंग करण्याच्या प्रयत्नाआधीच कोसळले गेले आहे. रशियाची आंतराळ एजेंसी Roscosmos यांनी असे म्हटले की, लूना-२५ सोबतचा शनिवारी दुपारी २.५७ मिनिटांनी संपर्क तुटला गेला. मात्र त्यानंतर त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र काहीही संपर्क होऊ शकला नाही. (Luna 25)

एजेंसीने टेलिग्रामवर टाकलेल्या एका पोस्टनुसार, ऑपरेशनच्या दरम्यान स्वयंचलित स्थानकात एक असामान्य स्थिती निर्माण झाली. ज्याने ठरवलेल्या मापदंडांसह पुढे जाण्याच्या प्रक्रियेला परवानगी दिली नव्हती. १० ऑगस्टला लॉन्च करण्यात आलेल्या रशियाचे आंतराळयान बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या उद्देशाने चंद्रयान-२ सोबत मिशन मूनच्या रेसमध्ये होते.

सुरुवातीच्या निष्कर्षांवरुन असे समोर आले आहे की, लँन्डर चंद्राच्या पृष्ठभागाला धडकल्यानंतर अस्तित्वात राहिला नाही. आंतराळ एजेंसीने असे म्हटले की, दुर्गघटनेच्या कारणास्तव तपास सुरु केला जाईल. मात्र त्यांनी तांत्रिक समस्येबद्दल उघडपणे सांगितले नाही.

Luna-25

Luna-25

८०० किलोग्रॅम वजनाचा लूना-२५ यानला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँन्डिग करायेच होते. जे इतिहासात पहिल्यांदाच असे होणार होते. रशियाच्या एजेंसीनुसार त्यांना असे दाखवून द्यायचे होते की, रशिया असा एक देश आहे जो चंद्रावर पेलोड पोहचवण्यास सक्षम. आहे. त्याचसोबत रशियाला चंद्राच्या पृष्ठभागावर निश्चितपणे पोहचायचे होते. रशियाने १९९८ च्या नंतर एखाद्या खगोलीय पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केलेला नाही. (Luna 25)

अपयशाचे कारण
लूना-२५ आंतराळ यानाने सोमवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँन्डिंग करण्याची योजना तयार केली होती, जो आतापर्यंत तेथे पोहचण्यासाठीचा एक अज्ञात भाग होता. चंद्राचा दक्षिण ध्रुव वैज्ञानिकांसाठी विशेष आहे. ते असे मानतात की, ज्या ध्रुवीय क्रेटरांच्या भागागावर स्थायी रुपात सावली असते तेथे पाणी जमा झालेले असू शकते. जे भविष्यात संशोधक हवा आणि रॉकेट इंधनासाठी वापरू शकतात. मात्र ते आंतराळ यान अप्रत्याक्षिक कक्षेत जाऊन नियंत्रणाबाहेर गेले आणि चंद्राच्या पृष्ठभागाला धडकल्याने ते उध्वस्त झाले.

हेही वाचा-  शनीग्रहावर आलंय तुफान…

www.russianspaceweb.com च्या नुसार, लूना-२५ ची उड्डाण नियंत्रण प्रणाली कमकुवत होती. ज्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता होती. त्याचसोबत या महत्त्वपूर्ण लँन्डिंगपूर्वी अमेरिका, चीन आणि भारताप्रमाणे एक सरळ कक्षीय मिशन त्यांना करायचे होते. तर जून महिन्यात राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना सुचित करण्यात आले होते की, हे यान यशस्वी होण्याची शक्यता जवळजवळ ७० टक्केच आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.