Home » ब्राजीलचे राष्ट्रपती झाल्यानंतर लूला डी सिल्वा यांचा का केला जातोय विरोध?

ब्राजीलचे राष्ट्रपती झाल्यानंतर लूला डी सिल्वा यांचा का केला जातोय विरोध?

by Team Gajawaja
0 comment
lula da silva
Share

ब्राजीलच्या राष्ट्रपती निवडणूकीत कम्युनिस्टचे नेते लूला डी सिल्वा (Lula da Silva) यांचा विजय झाला. सध्या वर्तमानातील राष्ट्रपती जैयर बोल्सानारो यांना ४९.१ टक्के तर लूला डी सिल्वा यांना ५०९ टक्के मतं मिळाली. दरम्यान, लूला यांच्या विजयानंतर देशात एका वर्गाकडून त्यांच्याबद्दल जल्लोष साजरा केला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला विरोध ही केला जात आहे. अशातच प्रश्न असा उपस्थितीत राहतो की, अखेर लूला यांच्या विजयानंतर हिंसाचार का होतोय? तर गरिब घरात जन्मलेले लूला डी सिल्वा ते राष्ट्रपती पदाचा प्रवास याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

ब्राजील मधील दिग्गज वामपंथी नेते लूला डी सिल्वा पहिल्यांदाच राष्ट्रपती पदासाठी निवडले गेले नाहीत तर यापूर्वी सुद्धा दोनदा राष्ट्रपती म्हणून त्यांनी कमान सांभाळली होती. ते २००३ ते २०१० पर्यंत दोन वेळा राष्ट्रपती होते. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप ही लावले गेले. त्यानंतर २०१८ मध्ये त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले होते. नंतर २०१९ मध्ये तुरुंगातून बाहेर आले. एकदा तुरुंगात राहिल्याच्या कारणास्तव निवडणूक त्यांना लढवता आली नाही. त्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये निवडणूक लढवली आणि कमी फरकाने विजय मिळवला होता. या विजयानंतर आता पुढील वर्षाच्या सुरुवातीला डी सिल्वा राष्ट्रपती पद सांभाळणार आहेत.

lula da silva
lula da silva

कोण आहेत लूला डी सिल्वा?
लूला यांचे लहानपण गरिबीत गेले. ते एका शेतकरी घरात जन्माला आले आणि त्यांना आठ भावंड आहेत. त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षापासूनच काम करण्यास सुरुवात केली होती. तेव्हा शेंगदाणे विकणे ते चप्पल कंपनीत काम केले. मात्र जेव्हा ते काम करत होते तेव्हा त्यांनी ट्रेड युनियनच्या रुपात कर्मचाऱ्यांच्या वतीने आवाज उठवला आणि काही उपोषणांचे सुद्धा नेतृत्व केले. ऐवढेच नव्हे तर सैन्य तानाशाहीला सुद्धा आव्हान दिले होते आणि १९८० मध्ये त्यांनी राजकरणात पाऊल ठेवले. (Lula da Silva)

त्यांना काही वेळा राष्ट्रपती पदासाठी पराभव ही स्विकारावा लागला. त्यांनी १९८९, १९९४ आणि १९९८ मध्ये राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढली. मात्र विजय झाला नाही. तरीही त्यांनी हार मानली नाही आणि ३ वेळा राष्ट्रपती पदाची निवडणूक हरल्यानंतर २००२ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढली आणि त्यावेळी मात्र त्यांचा विजय झाला. त्यानंतर आणखी एकदा विजय झाला. पण तुरुंगात जावे लागल्याने निवडणूक लढवता आली नाही. पण त्यानंतर जी निवडणूक लढवली त्यात ही विजय मिळाला. असे म्हटले जाते की, त्यांनी राजकरणातून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र फिदेल कास्त्रो यांच्या सांगण्यावरुन त्यांनी पुन्हा राजकरणात पाऊल ठेवले.

सिल्वा यांनी आपल्या कार्यकाळात काही वेल्फेअर प्रोग्राम चालवले, त्यामुळे त्यांची अधिक चर्चा ही झाली. त्याचसोबत त्यांनी आर्थिक वाढ कशी होईल यावर ही काम केले. त्यांच्या या कामाचे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी सुद्धा कौतुक केले होते. मात्र त्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावला गेला आणि त्यांना तुरुंगवास झाला. ते ५८० दिवस तुरुंगात होते. मात्र त्यांची शिक्षा रद्द केली आणि आधीच्या शिक्षेसाठी न्यायाधीशांना पक्षपाती बनवले.

हे देखील वाचा- साउथ कोरियात हॅलोविन पार्टीत मृत्यू तांडव, गर्दीमुळे शंभराहून अधिक बळी

का होतोय विरोध?
सिल्वा यांच्या विजयामुले बोलसोनारो यांच्या पराभवामुळे काही लोक नाखुश आहेत. बोलसोनारो यांना कमी मतं मिळाल्याने नाराज झालेल्या तमाम ट्रक चालकांनी काही राज्यांमधील रस्त्यांवर गाड्या घेऊन येत विरोध केला. त्याचसोबत काही ठिकाणी आंदोलन ही केले जात आहे आणि विजयाचा विरोध केला जात आहे. मात्र लोकांचा विरोध करण्यामागील जो तर्क आहे तो म्हणजे, जो व्यक्ती तुरुंगातून बाहेर आला आहे तो आपल्यावर शासन करु शकत नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.