Home » Loan App च्या जाळ्यात अडकलेल्या संपूर्ण परिवाराने संपवले आयुष्य, असे रहा सतर्क

Loan App च्या जाळ्यात अडकलेल्या संपूर्ण परिवाराने संपवले आयुष्य, असे रहा सतर्क

आपल्या स्मार्टफोनवर काहींना असा मेसेज येतो की, इंस्टेट लोन. त्याच्या जाहिराती ही दाखवल्या जातात. मात्र तुम्हाला माहितेय का, अशा प्रकारच्या जाहिराती संपूर्ण परिवाराचा जीव घेऊ शकतात

by Team Gajawaja
0 comment
Loan app fraud
Share

आपल्या स्मार्टफोनवर काहींना असा मेसेज येतो की, इंस्टेट लोन. त्याच्या जाहिराती ही दाखवल्या जातात. मात्र तुम्हाला माहितेय का, अशा प्रकारच्या जाहिराती संपूर्ण परिवाराचा जीव घेऊ शकतात. खरंतर भोपाळ मधील असेच एक प्रकरण समोर आले आहे. त्यामध्ये डिजिटल कर्ज देणाऱ्या अॅपच्या जाळ्यात अडकून एका संपूर्ण परिवाराने आत्महत्या केली. या परिवाराच्या मुख्य व्यक्तीला कर्जाची परतफेड करण्यासाठी ऐवढे छळले गेले की त्याने आपल्या दोन लहान मुलांसह बायको आणि स्वत:ने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. (Loan app fraud)

परंतु अशाप्रकारच्या कर्जाच्या अॅप बद्दल आरबीआयने गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. लोकांनी सतर्क रहावे असा इशारा दिला आहे. तर सरकारने अशा काही अॅप्सवर बंदी घातली आहे. चोरीछुप्या पद्धतीने आतापर्यंत त्यांचे काम सुरु होते. ही लोक अशा व्यक्तींना आपले शिकार करायचे जे आर्थिक रुपात मजबू नाही आण गरजूंना इंस्टेट कर्जाच्या जाळ्यात अडकवायचे. तर जाणून घेऊयात अशा प्रकारच्या जाळ्यातून तुम्ही कसा बचाव कराल.

आधी कर्ज नंतर रिकवरीसाठी छळ
इंस्टंट लोन अप्रुवल देत असल्याचे सांगत लोकांना कर्ज दिले जाते. या बद्दल सोशल मीडियात जाहिराती ही चालवल्या जातात. त्यात कमी व्याज दरात झटपट कर्ज दिले जाईल असा दावा केला जातो. अशातच गरजू लोक अशी जाहिरात पाहून भुलतात आणि आपली खासगी माहिती देत कर्ज घेतात. मात्र त्याच्या रिकवरी वेळी त्यांना ब्लॅकमेल केले जाते. अशातच व्यक्ती टोकाचे निर्णय घेतो. भोपाळ मध्ये झालेल्या या प्रकरणात एक सुसाइड नोट मिळाली. त्यात स्पष्टपणे लिहिले गेले की, या परिवाराने मार्केटमध्ये असलेल्या कर्जाच्या अॅपच्या जाळ्यात अडकून असा निर्णय घेतला आहे.

देशात कर्जाच्या अॅप्सवर सरकार आणि आरबीआय कठोर
देशात डिजिटल लेंडिंग फ्रॉडची प्रकरणे सध्या वेगाने वाढत आहेत. त्यामुळे सरकार आणि आरबीआयने मिळून कठोर पावले उचलली आहेत. सरकारने डिजिटल कर्ज देणाऱ्या काही चीनी अॅपवर बंदी घातली आहे. तर आरबीआयने त्याच संदर्भात काही गाइडलाइन्स शेअर केल्या आहेत. तरीही अशा प्रकारच्या अॅपवर आळा बसत नाहीय. सध्या अशा प्रकारचे एक दोन नव्हे तर खुप अॅप चलनात आहेत आणि लोकांना स्वस्त दरात काही मिनिटांत कर्जाची मदत करत आहेत. त्यानंतर त्यांची फसवणूक केली जात आहे. ((Loan app fraud)

हेही वाचा- ITR फाइल करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

असा करा बचाव
जर तुम्हाला अशा प्रकारच्या कर्जाच्या फसवणूकीपासून दूर रहायचे असतील तर कोणत्याही बँक किंव ऑथेंटिक आर्थिक कंपनी व्यतिरिक्त कोठून ही कर्जासाठी अर्ज करु नका. जर तु्म्हाला आपत्कालीन स्थितीत कर्ज हवे असेल तर अत्यंत सावधगिरीने कर्जासाठी अर्ज करा. यासाठी तुम्ही प्रथम आरबीआयच्या गाइडलाइन्स वाचा. त्यानंतर डिजिटल कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या सर्व शुल्कांबद्दल माहिती मिळा. त्यानंतर कर्ज मान्य होण्यापूर्वी दिले जाणारे की-फॅक्ट स्टेटमेंट सुद्धा व्यवस्थितीत वाचा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.