पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौऱ्यादरम्यान केवाडिया येथून मिशन लाइफची सुरुवात केली. या दरम्यान, संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटेरेस,परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल उपस्थितीत होते. मिशन लाइफची सुरुवात करत पीएम मोदी यांनी असे म्हटले होतेकी, जलवायु परिवर्तनाच्या प्रभावांचा सामना करण्यासाठी जगाला एकत्रित होण्याची गरज आहे. मिशन लाइफमध्ये आपण पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी प्रेरित करणार आहोत. आपण आपल्या लाइफस्टाइलमध्ये बदलाव करुन पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेणार आहोत. मोदी यांनी असे ही म्हटले की, या अभियानाची सुरुवात गुजरात पासून केली जात आहे. कारण गुजरात अशा राज्यांपैकी एक आहे जेथे सर्वात प्रथम पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठीच्या दिशेने काम सुरु झाल होते. (LiFE Mission)
काय आहे लाइफ मिशन?
लाइफ मिशन दोन गोष्टींपासुन तयार करण्यात आले आहे. एक म्हणजे लाइफस्टाइल आणि दुसरी म्हणजे पर्यावरण. हे मिशन लागू करण्याचे थेट लक्ष्य जलवायू परिवर्तानाचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. यासाठी तीन नियम तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार रिड्यूज, रीयूज आणि रिसायकल.
कसे काम करणार हे मिशन?
मिशन लाइफच्या मदतीने पर्यावरणाला कमीत कमी नुकसान पोहचवणे आणि त्याच्याशी जोडण्याचा अधिक प्रयत्न केला जाणार आहे. म्हणजेच आपण जी काही लाइफस्टाइल आपलीशी करु त्याच्या माध्यमातून पर्यावरणाला हानी पोहचणार नाही याची काळजी घ्यावी. भारत त्या देशांमध्ये सहभागी आहे ज्याने जलवायू परिवर्तनाचा प्रभाव कमी करण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे.
देशात प्रत्येक वर्षाला प्रति व्यक्ती १.५ टन कार्बन उत्सर्जन केले जात आहे. जर जगभरात हा आकडा ४ टन आहे. जगात भारत यामध्ये चौथा सर्वाधिक मोठ देश आहे ज्याची Renewable Energy अधिक आहे. येथे पवन आणि सौर उर्जेचा अधिक वापर केला जातो. या मिशनअंतर्गत या उर्जेचा अधिक वापर केला जाणार आहे. जेणेकरुन कार्बनचे उत्सर्जन थांबवले जाईल. (LiFE Mission)
हे देखील वाचा- ग्रीन फटाके तुम्ही कधी वापरले आहेत का?
गेल्या ७-८ वर्षात रिन्यूवेबल एनर्जीची क्षमता २९० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. ऐवढेच नव्हे तर ४० टक्क्यांपर्यंत गैर-जीवाश्मापासून इंधन तयार करण्याच्या क्षमतेत ४० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. तर नॅशनल हायड्रोजन मिशनच्या माध्यमातून पर्यावरणपूरक उर्जा तयार केली जात आहे. या मिशनच्या माध्यमातून एनर्जी सेक्टरच्या त्या पद्धतीवर अधिक लक्ष दिले जाणार आहे जे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे काम करतील, हेच या मिशनचे लक्ष्य आहे.