Home » ताऱ्यांना सुद्धा आपला इतिहास माहिती असतो?

ताऱ्यांना सुद्धा आपला इतिहास माहिती असतो?

by Team Gajawaja
0 comment
Life cycle of stars
Share

ताऱ्यांचे लहानपणच त्यांना त्यांच्या विकास क्रमाला आकार देतात. मात्र ही एक कठीण प्रक्रिया असते.याच कारणामुळे त्यांच्या विकासाचे सैंद्धांतिक प्रतिमान बनवणे मुश्किलचे काम आहे. तारांचे वय, संरचना आणि निर्माणाबद्दल विविध प्रकारे माहिती मिळवली जाते. त्यापैंकीच एक म्हणजे ताऱ्यांचे स्पंदन (Oscillations of Starts). याच आधारावर वैज्ञानिक आता केवळ ताऱ्यांचा शिशुकालच्या माध्यमातून येणाऱ्या विकासाबद्दल, वर्तमान अवस्थेच्या मते त्यांच्या लहानपणाबद्दल सुद्धा जाणून घेऊ शकतो. जे यापूर्वी कधीच शक्य नव्हते. (Life cycle of stars)

एस्ट्रोसीज्मोलॉजीचे क्षेत्र
ब्रम्हांण्डात अगणित तारे आङेत. त्यापैकी लाखो कोटी ताऱ्यांबद्दल आपले खगोलशास्रज्ञ काही दशकांपासून अभ्यास करत आहेत. नव्या एस्ट्रोसीज्मोलॉजीच्या क्षेत्रातील विशेतज्ञ कॉन्सेटेन्जे ज्विन्ट्स यांचे असे म्हणणे आहे की, ज्या प्रकारे पृथ्वीच्या अंर्तभागात गेल्याशिवाय भुकंपीय तरंगांच्या माध्यमातून तेथील प्रक्रियेची व्याख्या केली जाऊ शकते. त्याच प्रकारे स्पंदनाच्या माध्यमातून ताऱ्यांचे वय अशी माहिती सुद्धा मिळू शकते.

Life cycle of stars
Life cycle of stars

आधुनिक टेलिस्कोपचा आधार
ज्विन्ट्ज इन्सब्रूक युनिव्हर्सिटीच्या इंस्टिट्युट फॉर एस्ट्रो-पार्टिक फिजिक्स शोध समूह स्टेलर इवेल्यूशन अॅन्ड एस्ट्रोसीज्मोलॉजीचे प्रमुख आहे. आज जेम्स वेब, TESS, केप्लर सारखे स्पेस टेलिस्कोपच्या वाढत्या योग्य क्षमतेच्या कारणास्तव ताऱ्यांच्या स्पंदनाचा अभ्यास करणे यापूर्वीपेक्षा अधिक उत्तम झाले आहे. याच कारणास्तव नवा अभ्यास हा काही दशकं जुन्या अशा ताऱ्यांच्या विकासाच्या सिद्धांतांवर नवा प्रकाश टाकण्याचे काम करत आहे.

कधी पर्यंत असते ताऱ्यांचे लहानपण
जोपर्यंत तारे आपल्या क्रोडमध्ये हाइड्रोजनला हिलियममध्ये बदलण्यास सुरु करत नाहीत तो पर्यंत असे मानले जाते की, त्यांचा लहानपणाचा काळ सुरु आहे. या दरम्यान, ते मेन सीक्वेंसच्या आधीच्या स्थितीत असल्याचे मानले जाते. त्या अवस्थेत पोहचल्यावर ते तरुणांच्या श्रेणीत पोहचतात. या अभ्यासाचे प्रमुख लेखक थॉमस स्टेंडल यांनी असे म्हटले आहे की, आतापर्यंत तरुण ताऱ्यांवरच अधिक संशोधन करण्यात आले होते. (Life cycle of stars)

हे देखील वाचा- विमानात फोन फ्लाइट मोडवर का ठेवला जातो? जाणून घ्या कारणं

ताऱ्यांच्या लहानपणाकडे दुर्लक्ष
स्टेंडल यांचे असे म्हणणे आहे की, हे विचित्र वाटते की, परंतु आता सुद्धा मेन सिक्वेन्सपूर्वीच्या अवस्थेवर अत्यंत कमी अभ्यास करण्यात आला होता. कारण हा काळ खुप अशांत आणि उग्र असतो. त्यामुळेच त्यांचे प्रतिमान बनवणे कठीण असते. हे केवळ नुकत्याच गेल्या काही वर्षातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाच्या कारणास्तव शक्य झाले आहे. त्यामुळेच आपल्याला ताऱ्यांचा शिशुकाल जवळून पाहू शकतो. आपण ते क्षण पाहू शकतो जेव्हा हाइड्रोजनचे हिलियममध्ये संलयन सुरु होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.