Home » लीप सेकंद म्हणजे काय? का जगभरात हे बंद होणार?

लीप सेकंद म्हणजे काय? का जगभरात हे बंद होणार?

by Team Gajawaja
0 comment
leap second
Share

जसा व्यक्ती तंत्रज्ञानाच्या मदतीने आणखी काही वेगळे बदल घडवून आणत आहे पण त्यासाठी सुद्धा काही कालावधी जातोच. तो कालावधी मोजण्याची आवश्यकता ही भासते. आता दिवसाचे मोजमापनच्या आधारावर पृथ्वी फिरते असे मानले जाते. म्हणजेच तो वेळ ज्यामध्ये पृथ्वी स्वत: भोवती एक परिक्रमा करते. हा वेळ घड्याळानुसार २४ तासांचा असतो. मात्र पृथ्वी आपल्याभोवती फिरण्याचा हा अगदी परफेक्ट वेळ नाही आहे. यासाठीच म्हणूनच ते जुळवण्यासाठी लीप वर्षाची तरतूद आहे, ज्यामुळे दर चार वर्षांनी वर्षातील एक दिवस वाढवावा लागतो. या व्यतिरिक्त एक लीप सेकंद सुद्धा व्यवस्था आहे. मात्र आता असा निर्णय घेण्यात आला आहे की, लीप सेकेंद २०३५ पर्यंत वापरात आणला जाणार नाही. (Leap second)

१३ वर्षापर्यंत संपुष्टात येणार ही व्यवस्था
जगताली वेळेचे मापन करण्यासाठी जबाबदार असलेल्या जागितक संस्थेने असे म्हटले की, फ्रांसमध्ये झालेल्या जगभरातील वैज्ञानिकांनी शासकीय प्रतिनिधींच्या बैठकीत यावर विचार केला आणि त्यांनी बहुमताने लीप सेंकंद ही २०३५ पर्यंत हटवण्याच्या प्रस्तावावर सहमती व्यक्त केली. सध्या जगभरातील घड्याळांमधील सेकंदांनुसार बदल करण्याची गरज भासणार नाही आहे.

leap second
leap second

सामान्य लोकांसाठी समस्या नाही
पृथ्वीच्या परिभ्रमणाचा अचूक अणु घड्याळाशी समन्वय साधण्यासाठी गेल्या अर्ध्या शतकापासून लीप सेकंदांचा वापर केला जात आहे.याच्या मुख्य कारणास्तव पृथ्वीची परिभ्रमण कमी होईल ज्याला बदलण्याची गरज भासते. बहुतांश लोकांसाठी लीप सेकंदाचे काही महत्व नसते. पण ज्या तंत्रांना योग्य वेळेची गरज भासते त्यांच्यासाठी हे अगदी त्रासदायक असते.

काही ठिकाणी समस्याचे कारण
सॅटेलाइट ऑपरेशन, सॉफ्टवेअर, दूरसंचार, व्यवसाय, अंतराळ प्रवास, अनेक कामांसाठी सेकंदाच्या अपूर्णांकांपर्यंत अचूकता आवश्यक असते, ज्यामुळे घड्याळांचे अचूक सिंक्रोनाइझेशन आवश्यक असते, त्यामुळे संपूर्ण प्रणाली गटांमध्ये लीप सेकंद (Leap second) बदल करणे आवश्यक असते. ज्यामुळे लीप सेकंदांचा बदल संपूर्ण सिस्टीम गटांमध्ये करावा लागतो जो त्रासाचे कारण बनतो.

कोऑर्डिनेटड युनिव्हर्सल टाइम आणि पृथ्वीच्या परिभ्रमणामधील संबंध संपुष्टात आणला जाऊ शकत नाही आणि लोकांसाठी काहीही बदलणार नाही. अणू घड्याळे आल्यापासून अचूक मापन करण्याचे युग आले आहे आणि पृथ्वीच्या धिम्या परिभ्रमणामुळे दोन वेळांमध्ये अचूक ताळमेळ नाही आहे. ते हटवण्यासाठी १९७२ मध्ये लीप सेकंदाची धारणा सुरु झाली आणि २७ वेळा विविध वेळांनुसार सेकंद घड्याळांमध्ये जोडले गेले आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.