Home » ‘सायमन गो बॅक’ म्हणणारे लाला लजपत राय

‘सायमन गो बॅक’ म्हणणारे लाला लजपत राय

by Team Gajawaja
0 comment
Lala Lajpat Rai
Share

भारत मातेला वीरांची जननी असे म्हटले जाते. या धरतीवर काही वीरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाचा विचार न करता आहुती दिली. आपले आयुष्य देशासाठी बलिदान केले. त्यापैकीच एक स्वतंत्रता सेनानी होते ‘शेर-ए-पंजाब’ लाला लजपत राय (Lala Lajpat Rai). त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांनीच पंजाब नॅशनल बँक आणि लक्ष्मी बीमा कंपनीची स्थापना केली होती. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये गरम दलाचे तीन प्रमुख नेते लाल-बाल-पाल पैकी एक होते. आज त्यांची जयंती साजरी केली जात आहे.

लाला लजपतराय यांचे आयुष्य
पंजाब केसरी लाला लजपत राय यांचा जन्म २८ जानेवारी, १८६५ रोजी फिरोजपुर, पंजाब येथे झाला होता. त्यांचे वडिल मुंशी राधा कृष्ण आजाद हे फारसी आणि उर्दूचे महान विद्वान होते. तर आई गुलाब देवी धार्मिक महिला होत्या. सुरुवातीपासूनच लाला लजपत राय यांना लेखनाची आणि भाषणाची खुप आवड होती. त्यांनी काही काळ हरियाणातील रोहतक आणि हिसार शहरात वकीली केली. लाला लजपतराय यांना शेर-ए-पंजाबच्या नावाने ओळखले जायचे. त्यांना गरम दलाचे नेते मानले जायचे. लाल लजपत राय यांना स्वावलंबीपणाने स्वराज्य चालवायचे होते.

इंग्रजांकडून मदत न मिळाल्याने बंड सुरु केले
१८९७ आणि १८९९ मध्ये त्यांनी देशात आलेल्या दुष्काळावेळी पीडितांची तन, मन आणि धनाने सेवा केली. देशात आलेल्या भुकंप, दुष्काळावेळी ब्रिटिश शासनाने काहीच केले नाही. लाला जी यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने अनेक ठिकाणी दुष्काळात ही शिबिरांचे आयोजन करत लोकांची सेवा केली. त्यानंतर जेव्हा १९०५ मध्ये बंगालचे विभाजन झाले तेव्हा लाला लजपत राय यांनी सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि विपिनचंद्र पाल सारख्या आंदोलनकर्त्यांसोबत ते जोडले देले.

या तिघांनी मिळून इंग्रजांना हैराण करुन सोडले. तसेच त्यांनी असे काही नवे प्रयोग केले जे त्या काळातील अद्वितीय होते.लाल-बाल-पाल यांच्या नेतृत्वाला संपूर्ण देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला. यामुळेच इंग्रजांची झोपच उडाली. त्यांनी आपल्या मोहिमेअंतर्गत ब्रिटेनमध्ये तयार झालेल्या सामानावर बहिष्कार आणि व्यावसायिक संस्थेंत आंदोलन करत ब्रिटिश सरकारचा विरोध केला.

स्वावलंबीपणाने स्वराज्या मिळवण्याचा हेतू असलेल्या लाला लजपत राय यांना त्यांच्या विचारांच्या स्पष्टतेमुळे लढवय्या नेते म्हणून लोकप्रिय झाले.

अमेरिकेत राहून ही फूंकले आंदोलनाचे बिगुल
लाला लजपत राय (Lala Lajpat Rai) हे ऑक्टोंबर १९१७ रोजी अमेरिकेत आले. येथील न्यूयॉर्क शहरात त्यांनी इंडियन होम रुल लीग ऑफ अमेरिका अशा नावाने एका संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्याची ठिणगी कायम पेटवत ठेवली. लालाजी जेव्हा तीन वर्षानंतर जेव्हा २० फेब्रुवारी १९२० रोजी भारतात आले तेव्हा ते देशवासियांसाठी एक जहाल नेते बनले होते.

लाल लजपत राय यांना कलकत्ता मध्ये काँग्रेसच्या खास सत्राच्या अध्यक्षतेसाठी बोलावण्यात आले होते. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या विरोधात त्यांनी पंजाब मध्ये ब्रिटिश शासनाच्या विरोधात उग्र आंदोलन केले. जेव्हा गांधींनी १९२० मध्ये असहयोग आंदोलन छेडले तेव्हा पंजाब मध्ये आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले आणि त्यांनी काँग्रेस इंडिपेंटेंडस पार्टी तयार केली.

‘सायमन गो बॅक’ चा नारा दिला
सायमन कमीशन ३ फेब्रुवारी १९२८ जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांचा विरोधात लाला लजपत राय ही सहभागी झाले. त्यांनी या कमीशनचा जोरदार विरोध केला. सायमन कमिशन भारतातील घटनात्मक सुधारणांचा आढावा घेण्यासाठी आणि अहवाल तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेली सात सदस्यांची समिती होती. हे सर्वजण ब्रिटिशांच्या इराद्याच्या आधारे भारतातील घटनात्मक चौकट तयार करण्यासाठी भारतात आले होते. परंतु त्यांना संपूर्ण देशाने जोरदार विरोध केला.

सायमन कमीशनच्या भारतात येण्यासह त्यांच्या विरोधातील आग संपूर्ण देशात पसरली गेली. चौरी चौरा कांडानंतर गांधीजींनी असहयोग आंदोलन मागे घेतल्याने स्वातंत्र्याच्या लढाईत आलेली सब्धता आता फुटली होती. लोक पुन्हा रस्त्यावर उतरले होते आणि पाहता पाहता संपूर्ण देशाने ‘सायमन गो बॅक’ असा नारा दिला.

हे देखील वाचा- समाजात महिलांच्या अस्तित्वाला हक्क मिळवून देणाऱ्या ‘सावित्री बाई फुले’

इंग्रजांच्या लाठ्यांचा मार खाल्ला पण देशासाठी अखेरपर्यंत लढले
सायमन कमीशनच्या विरोधात क्रांतीकाऱ्यंनी ३० ऑक्टोंबर १९२८ रोजी लाहौरमध्ये एक विरोधी आंदोलनाचे आयोजन केले होते. त्याचे नेतृत्व लाला लजपत राय करत होते. या आंदोलनात झालेल्या तुफान जमावाला पाहिल्याने इंग्रज सरकार अधिकच संतप्त झाली होती. अशातच इंग्रजांनी लाला लजपत राय आणि त्यांच्या दलावर लाठीचार्ज केला. यामध्ये सहभागी झालेल्या तरुणांना अमानुषपणे मारहाण झाली.

लाला लजपत राय हे इंग्रजांच्या लाठीचार्जला घाबरले नाही आणि त्यांचा जोरदार विरोध करणे त्यांनी सुरुच ठेवले. यामध्ये लाला जी खुप गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली. १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लाल लजपत राय हे गरम दलाचे नेते होतो. त्यांना चंद्रशेखर आझाद, भगतसिंह, राजगुरु, सुखदेव आणि वीर क्रांतिकारी आपले आदर्श मानायचे. जेव्हा लोकांना कळले की, इंग्रजांनी लाला लजपतराय यांना मारहाण केली तेव्हा त्याचा बदला घेण्यासाठी १७ डिसेंबर १९२८ ला ब्रिटिश पोलिसांचे अधिकारी सांडर्स यांना गोळी घालत त्यांची हत्या केली. त्यानंतर सांडर्स यांच्या हत्येप्रकरणी राजगुरु, सुखदेव आणि भगतसिंह यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.