भारत आणि पाकिस्तानची फाळणी 15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री झाली. तेव्हापासून हे दोन्ही देश कायदेशीररित्या स्वतंत्र झाले. मात्र यापूर्वी हजारो वर्षापासून अखंड भारत थेट अफगाणिस्तानापर्यंत पसरलेला होता. अगदी आजही त्याची उदाहरणे बघायला मिळतात. खुद्द पाकिस्तानातही अनेक हिंदू मंदिरे आहेत. याच पाकिस्तानच्या अनेक शहरांचे नावही हिंदू राजांच्या नावावरुन दिलेले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये आहेत. त्यांनी या पाकिस्तान दौ-यामध्ये भगवान राम यांचे पुत्र, राजकुमार लव यांच्या समाधीचे दर्शन घेत राजकुमार लव यांच्याच नावावरुन आताचे लाहोर शहर कसे तयार झाले, याची माहिती पाकिस्तानातील मंत्र्यांना दिली. (Lahor)
राजीव शुक्ला यांनी लाहोरच्या प्राचीन किल्ल्यातील राजपुत्र लव यांच्या समाधी स्थळाला जेव्हा भेट दिली, तेव्हा त्यांच्यासोबत पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन रझा उपस्थित होते. रझा यांच्या पुढाकारानं या समाधीस्थळाचे नुतनीकरण करण्यात येत आहे. या कामाची शुक्ला यांनी पहाणी करत पाकिस्तानी मंत्र्यांना लाहोर आणि कसून या पाकिस्तानच्या दोन शहरांमागे असलेला भगवान रामांचा संदर्भही सांगितला. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी लाहोरच्या प्राचीन किल्ल्यात असलेल्या भगवान राम यांचे पुत्र, राजकुमार लव यांच्या समाधीचे दर्शन घेतले. राजीव शुक्ला यांनी यासंदर्भातले फोटो सोशल मिडियावर शेअर करत राजपुत्र लव याच्याच नावावरुन आता लाहोर, या पाकिस्तानी शहराचे नाव ठेवण्यात आल्याचेही नमूद केले आहे. (Marathi News)
भगवान रामाचे पुत्र असलेल्या राजकुमार लव यांनीच या सर्व भागावर एकेकाळी राज्य केले होते. त्यांच्याच नावावर हा संपूर्ण परिसर लवपुरी या नावानं ओळखण्यात येत असे. एकेकाळी समृद्ध आणि संपन्न असलेला हा भाग भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेला. या भागाचे नावही लाहोर असे झाले. संपन्न असलेल्या आणि भगवान रामाच्या वंशजांनी जपलेल्या या भागातून राजकुमार लव यांच्या सर्व खुणा पुसण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीला आता 77 वर्ष उलटून गेल्यावर या खुणा पुन्हा प्रस्थापित कऱण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. राजीव शुक्ला यांनी आपल्या पाकिस्तानी दौ-यादरम्यान या दोन देशांमधील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध नव्यानं जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी लाहोरमधील प्राचीन मंदिरांना भेट दिली. भगवान रामाशी संबंधित असलेल्या या मंदिराची अवस्था अतिशय जिर्ण झालेली आहे. या मंदिरांची आणि भगवान रामाचे पुत्र, राजकुमार लव यांच्या समाधीचीही झालेली दुरावस्था कुठल्याही हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारी आहे. (Lahor)
राजीव शुक्ला यांनी लाहोरमधील किल्यात असलेल्या राजपुत्र लव यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. या समाधीस्थळाचे आता नुतनीकरण होत आहे. वास्तविक या लाहोर शहराचे नावही राजपुत्र लव यांच्या नावावरुनच ठेवण्यात आलेले आहे. तशी नोंद लाहोरच्या नगरपालिकेच्या नोंदींमध्येही आहे. या नोंदीनुसार, हे शहर भगवान राम यांचे पुत्र, राजकुमार लव यांनी स्थापन केल्याचा उल्लेख आहे. तर भगवान राम यांचे दुसरे पुत्र, राजकुमार कुश यांच्या नावानं कसूर शहराची स्थापना झाली. हे शहरही सध्या पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तान सरकारही या दोन शहरांची नावे, भगवान राम याच्या राजपुत्रांच्या नावावरुन आहेत, हे मान्य करते. हिंदू धर्मियांच्या मान्यतेनुसार, लाहोरचे प्राचीन नाव लवपुरी होते. राजपुत्र लव यांनी या शहराची स्थापना केली. हे शहर तेव्हा संस्कृती आणि साहित्याचे माहेरघर समजले जात असे. राजपुत्र लव यांनी पंजाबच्या प्रदेशावर राज्य केले आणि लवपुरी शहराला आपली राजधानी म्हणून घोषित केले होते. हेच लवपुरी शहर नंतर लाहोर म्हणून ओळखले गेले. (Marathi News)
===============
हे देखील वाचा : Black Turmeric : भारताच्या काळ्या सोन्याला परदेशात मोठी मागणी !
Masan Holi : वाराणसीच्या मसान होळीसाठी मोठी गर्दी !
===============
भगवान राम यांचे दुसरे पुत्र राजकुमार कुश यांनी कसूर या शहराची स्थापना केली. इतिहासकारांच्या मते पूर्वी या सगळ्या भागात सिंधू संस्कृती होती. आजही या भागात काही ठिकाणी मंदिराचे अवशेष मिळाल्याचे सांगितले जाते. कसूर शहराची स्थापना 1525 साली झाल्याच्या नोंदी आहेत. लवपूरी आणि कसूर ही शहरे राजपुत्र लव आणि कुश यांच्या काळात संपन्न होती, शिवाय मुघल, शीख, पठाण आणि ब्रिटिश साम्राज्यांचाही ही शहरे महत्त्वाचा भाग होती. गुरु नानक देव यांनीही लाहोरला भेट दिल्याचा उल्लेख आहे. शिवाय हे शहर शीख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजित सिंह यांचेही राजधानी शहर होते. मात्र आता या सर्व हिंदू संस्कृतीच्या खुणा या भागातून पुसून टाकण्यात आल्या आहेत. तसेच जी मंदिरे आहेत, त्यांना तोडून टाकण्यात आले आहे. या सर्वांचा जिर्णोद्धार करण्याची गरज असून राजीव शुक्ला यांनी यासंदर्भात पाकिस्तनी मंत्र्यांसोबत बोलणी केल्याची माहिती आहे. (Lahor)
सई बने