Home » Curd Benefits : हिवाळ्यामध्ये दही खाणे योग्य की अयोग्य? घ्या जाणून

Curd Benefits : हिवाळ्यामध्ये दही खाणे योग्य की अयोग्य? घ्या जाणून

by Jyotsna Kulkarni
0 comment
Curd Benefits
Share

हिवाळा  (Winter) म्हणजे खाण्यापिण्याची नुसती चंगळ असते. नानाविध भाज्या, फळे खाण्यासाठी अनेक पर्याय या ऋतूमध्ये उपलब्ध असतात.  या ऋतूमध्ये आपण विविध पौष्टिक पदार्थ खाऊन जी ऊर्जा (Energy) कमवत असतो ती आपल्याला वर्षभर पुरते असे म्हटले जाते. त्यामुळेच हिवाळ्यामध्ये आपले खाणे अतिशय उत्तम आणि सकस असले पाहिजे. (Curd Benefits)

या ऋतूमध्ये वातावरण थंड असते शिवाय थंड वारे देखील वाहत असतात. त्यामुळेच आपण अनेकदा आंबट, गोड पदार्थ खाणे टाळतो. असे पदार्थ खाल्ले की लगेच संसर्गाची भीती असते. पण हिवाळ्यामध्ये हे पदार्थ खाल्ल्यामुळे अनेक फायदे होतात. मात्र नक्कीच योग्य प्रेमात आणि योग्य वेळेत खाणे गरजेचे असते.

आता दही (Curd), अतिशय साधा मात्र आरोग्याच्या दृष्टीने भरपूर फायदेशीर असलेली गोष्ट आहे. अनेकांचे जेवण तर दह्याशिवाय अपूर्ण असते. मात्र हिवाळ्यामध्ये बरेच लोकं दही खाणे टाळतात. पण असे करणे खरंच योग्य आहे का? हिवाळ्यामध्ये दही खाल्ल्याने त्रास होतो का? हिवाळाल्यामध्ये दही खाल्ल्याने होणारे फायदे कोणते? चला सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. (Curd Benefits In Winter)

दह्यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात, ज्याचा शरीराला खूप फायदा होतो. दह्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन बी-2, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात. दही खाल्ल्याने शरीर आणि हाडे मजबूत होतात. प्रोबायोटिक-समृद्ध अन्न म्हणून देखील ओळखले जाते.

Curd Benefits

हिवाळ्यामध्ये दही खाल्ल्याने सर्दी, खोकला होतो अशी अनेकांची धारणा असते. दह्यामध्ये अनेक चांगले बॅक्टेरिया जसे- लैक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस, लैक्टोकोकस लैक्टिस, लैक्टोकोकस लैक्टिस क्रेमोरिस इ. आणि चांगल्या दर्जाचे प्रथिने असतात. ज्यामुळे शरीराला मोठे फायदे होतात.

हिवाळ्यात दुपारच्या जेवणानंतर किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासोबत दही खाल्ल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. रात्री झोपण्यापूर्वी दही खाणे टाळा, कारण यामुळे पचनक्रिया धीम्या होण्याचा धोका असतो.

हिवाळ्यात दही खाण्याचे फायदे :

– हिवाळ्यात दही खाल्ल्याने बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, ॲसिडिटी (Stomach Problem) यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय आतड्यांची जळजळही कमी व्हायला मदत होते.

– दही पचनास मदत करते. हे शरीरातील पीएच संतुलन व्यवस्थापित करते, जे ऍसिड तयार होण्यास प्रतिबंध करते. दही आम्लपित्त रोखून पचनास खूप मदत करते. (Curd Helps For Digestion)

–  हिवाळ्यात दही खाल्ल्याने शरीरातील इम्यून सिस्टीम मजबूत होते. दह्यात असलेले जीवनसत्व बी-12, कॅल्शियम, आणि प्रोटीन शरीरासाठी फायदेशीर ठरतात. (Improve Immunity)

Curd Benefits

– हिवाळ्यात थंडीमुळे अनेकदा पचनक्रिया मंदावते पण दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स पचन सुधारण्यास मदत करतात, त्यामुळे शरीराची अतिरिक्त चरबी जळायला मदत होते. (Helps for Weight Loss )

– निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी दही फायदेशीर आहे. त्वचेला कोरडेपणापासून वाचवण्यासाठी त्यात नैसर्गिक मॉइश्चरायझिंग घटक असतात. ज्या लोकांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांमुळे मुरुमे होतात. दही त्यांच्यासाठी उपयुक्त ठरते. (beneficial for skin)

– दही हे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा उत्कृष्ट स्रोत आहे. ज्यामुळे हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन हाडं मजबूत व्हायला मदत होते. दह्याच्या नियमित सेवनाने ऑस्टियोपोरोसिस सारखे आजार आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. कॅल्शियम हे दातांच्या मजबुतीसाठी आणि संरक्षणासाठी फायदेशीर आहे. (Curd Helps For Dental Care and Bone care)

– हिवाळ्यात दही शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यास मदत करते, पण त्याचे सेवन गरम मसाल्यांसोबत केल्यास अधिक फायदेशीर ठरते. (Helps for Maintain body temperature)

=======

हे देखील वाचा : Salman Rushdie : पुन्हा ‘सॅटनिक व्हर्सेस’ चे वादळ !

Bashar Al-Assad : बेशुमार संपत्तीसाठी अस्मा यांचा घटस्फोटाचा अर्ज

=======

– दह्यात असलेले चांगले बॅक्टेरिया मानसिक आरोग्य सुधारण्यासही मदत करतात. दह्यातल्या जीवाणूमुळे सेरोटोनिनचं उत्पादन वाढून तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होतं. दही खाल्ल्याने मन स्थिर व्हायला मदत होते. (Mental Health)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.