Home » अंजीर खाण्याचे जादुई फायदे

अंजीर खाण्याचे जादुई फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Benefits Of Figs
Share

आपल्या देशात नेहमीच लोकं आजारी पडल्यानंतर भरमसाठ औषधं घेतात. ही औषधं काही काळ आपला त्रास नक्कीच कमी करतात पण पुन्हा आपल्याला त्या त्रासाला सामोरे जावे लागते. मग पुन्हा औषधं या चक्रामुळे आपल्या शरीराला औषधांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो, कधी कधी त्याचे साईड इफेक्ट देखील झाल्याचे दिसून येते. मग यापासून वाचावे तरी कसे?

पुन्हा पुनः एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर त्यावर घरगुती उपचार देखील करून बघावे. जेणेकरून फायदा झाला तर चांगलेच आहे. आता आपल्या जवळ असलेल्या जवळपास सर्वच पदार्थांचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. फळं, डाळी, भाज्या, सुकामेवा, वनस्पती आदी सर्वच गोष्टींचा यात समावेष होतो. अनेक आजारांपासून वाचण्यासाठी किंवा पुन्हा आजार होऊ नये यासाठी आपण काही उपाय केले पाहिजे. आता अंजीर या पदार्थाचेच घ्या. कोणी अंजीर फळ म्हणून ओळखते तर कोणी सुकामेवा अर्थात ड्रायफ्रुटस. ओळख कोणतीही असली तरी या अंजीर आरोग्याच्या दृष्टीने होणारे फायदे अतिशय चांगले आहेत. नक्की अंजीर खाल्ल्यावर कोणते फायदे होतात चला जाणून घेऊया.

अंजीरला आरोग्य समस्या दूर करणारा खजिना म्हटले जाते. त्यामधील व्हिटॅमिन ए, सी, ई, के, बी6, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि इतर अनेक पोषक घटक तुमच्या शरीराला आतून मजबूत बनवतात. तुम्हाला जर निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य हवे असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आहारात अंजीरचा समावेश करा. अंजीर केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर पचन सुधारण्यास देखील मदत करते. खोकला आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीर फायदेशीर आहे.

अंजीर हे सुपरफूड मानले जाते. वाळलेले अंजीर लवकर खराब होत नाहीत. अंजीर आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. अंजीर हे नेहमीच पाण्यात भिजवून खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे उष्णता दूर होते आणि पोटासाठी अधिक फायदेशीर सिद्ध होते. तुम्हाला जर अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्ही भिजवलेले अंजीर नक्की खालले पाहिजे. 1-2 अंजीर दररोज पाण्यात भिजवून सकाळी खावेत.

Benefits Of Figs

रक्तदाब नियंत्रणासाठी
भिजवलेले अंजीर तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स तुमच्या शरीराला हानी पोहोचवणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी लढतात. मग त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि तुमचे हृदयही चांगले राहते.

प्रतिकारशक्ती वाढते
अंजीरचे सेवन केल्याने व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट हे घटक प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. सोबतच शरीर सुदृढ राहण्यास मदत होते.

रक्त शुद्धीकरण आणि पचनास उपयुक्त
शरीरातून हानीकारक घटक गुदद्वारातून बाहेर काढून टाकणे, रक्त पातळ करणे , रक्ताची वाढ करण्याचे काम अंजीर करते. रक्तदाब बद्दकोष्ठता आणि पचनाचे सगळे आजार दूर करण्यासाठी फारच फायदेशीर आहेत. आतड्याची हालचाल सुरळीत होते आणि बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत मिळते. याशिवाय अंजीर पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्यासही मदत करते.

उर्जेचा साठा
अंजीर हे नैसर्गिक गोड आणि फॅट फ्री फळ असते. यात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साखर, मिनरल्स आणि सोल्युबल फायबर असते. अंजीरमध्ये साधारण 200 कॅलरीज असतात शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते.

ह्रदयासाठी चांगले
अंजीर खाल्ल्यामुळे ह्रदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी अॅसिड असते. रक्तामध्ये आढळणाऱ्या ग्लायएसेराईड नावाच्या घटकाला कमी करत आरोग्या चांगले राखते.

दम्यावर फायदेशीर
दम्यावरही अंजीर फायदेशीर आहे. रोज सकाळी एक तोळा अंजीर आणि लालसर पंढरी गोरख चिंच संपनत खा. त्यामुळे श्वास घेणे सोपे होते आणि दम्याचा त्रास कमी होतो.

त्वचेसाठी फायदेशीर
अंजीरमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असतं. यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होते. अंजीर खाल्ल्यानं त्वचेचं पोषण होतं.

हाडांसाठी फायदेशीर
अंजीर खाणं हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांच्या विकासासाठी मदत करतात.

भिजवलेले अंजीर खाण्याचे फायदे?
– भिजवलेले अंजीर खाल्ल्याने दीर्घकालीन बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. अंजीरमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे पोट साफ होते.
– दररोज भिजवलेले अंजीर खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.
– पीएमएस आणि पीसीओडी रुग्णांसाठीही अंजीर खूप फायदेशीर ठरते.
– गर्भवती मातांसाठीही अंजीर फायदेशीर मानले जाते.
– अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो.

2-3 अंजीर रात्रभर 1 ग्लास पाण्यात किंवा दुधात भिजवावे. सकाळी अंजीर चावून खावे आणि त्यानंतर अंजीर भिजवलेले पाणी पिऊन घ्यावे. यामुळे तुम्हाला लगेच ताजेतवाने वाटेल आणि ऊर्जा मिळेल. दिवसातून जास्तीत जास्त 3 ते 4 अंजीर खावीत. जास्त खावू नये.

(डिस्क्लेमर: ही माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी आणि अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.