नाशिक भारतातील एक महत्वाचे आणि मोठे शहर आहे. शिवाय देशातील हे एक महत्त्वाचे हिंदू तीर्थक्षेत्र देखील आहे. नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. मंदिरांचे शहर म्हणून देखील नाशिकची एक ओळख आहे. अतिशय पवित्र आणि मोठे तीर्थक्षेत्र असलेल्या या नाशिकला धार्मिक आणि ऐतिहासिक बाबतीत मोठे महत्व आहे.
अतिशय प्रसन्न आणि अल्ह्हादायक वातावरण असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे ‘भारताची नापा व्हॅली’ म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. अशा या नाशिकमधील एक मंदिर असतीशय मोठे आणि जगप्रसिद्ध आहे. त्या मंदिराबद्दल अनेकांना मोठे कुतूहल आणि उत्सुकता जाणून घेण्यासाठी. देशविदेशातील असंख्य पर्यटक या मंदिरात भेट देण्यासाठी येतात आणि मनशांती अनुभवतात. असे हे अतिशय सुंदर मंदिर आहे काळाराम मंदिर.
प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पावनभूमीमधील हे काळाराम मंदिर जगविख्यात आहे. काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या मंदिराला भेट दिली. याचवर्षी 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. त्याआधी पीएम मोदींनी 11 दिवसांचे व्रत केले आणि त्याची सुरुवात नाशिकपासून आहे. प्रभू रामाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणजे काळाराम मंदिराविषयी अधिक माहिती सांगणार आहोत.
प्रभू रामचंद्रांचे त्यांच्या वनवासाच्या काळात नाशिकमध्ये अनेक वर्ष वास्तव्य होते. याच ठिकाणाहून देवी सीतेचे रावणाने अपहरण देखील केले. रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. त्यांच्या इथेही निवासाच्या अनेक खुणा आजही श्रीरामाच्या अस्तित्वाची साक्ष देतात. या अनेक खुणांची जपणूक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये होते. नाशिकचे काळाराम मंदिर हे त्यातीलच एक प्रसिद्ध मंदिर आहे, जे पंचवटी परिसरात वसले आहे.
नाशिकमध्ये रामाची अनेक मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिराचा आपला एक वेगळा इतिहास आणि विशेषता आहे. मात्र या सगळ्यात काळाराम मंदिराचे वैशिष्ट् आणि महती काही औरच. हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या जुने तर आहेच, सोबतच त्याची बांधणीही खास आहे. शिवाय या मंदिराला सामाजिक इतिहासही लाभला आहे.
पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७८२ मध्ये बांधले. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून नागर शैलीमध्ये या मंदिराचे बांधकाम झाले आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात.
संपूर्ण मंदिर ७४ मीटर लांब व ३२ मीटर रूंद आहे. मंदिराला चार दिशांना चार दरवाजे आहेत. पूर्व महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर भव्य सभामंडप लागतो. त्याची उंची बारा फूट आहे. त्यात चाळीस खांब असून तेथे असलेला मारूती समोर असलेल्या मुख्य मंदिरातील श्रीरामाच्या चरणाकडेच पाहत आहे असे वाटते. सभामंडपाच्या बाजूला तीस फूट उंचीवर नगारखाना आहे.
मंदिराचे गर्भगृह काटकोनी असून त्यावरची नक्षीही सुंदर आहे. मंदिराची कळसापर्यंतची उंची ६९ फूट आहे. कळस ३२ टनी शुद्ध सोन्याचा आहे. या मंदिराला मोठा कोटही आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराला तीन दालने आहेत. तिसर्या दालनात मंदिराचा गाभारा आहे. तिथे श्रीराम, लक्ष्मण व सीता यांची मूर्ती आहे. खास बाब म्हणजे आपण नेहमीच श्रीरामांच्या मंदिरात राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तीसोबतच त्यांच्या पायाजवळ हनुमान असतो. मात्र या मंदिरामध्ये हनुमान रामाच्या जवळ नाहीये.
मंदिराला १७ फूट उंचीचा चिरेबंदी कोट आहे. त्याच्या चारही बाजूला ओवर्या आहेत. या मंदिराची बांधणी अशी काही आहे, की एकावर दुसरा पाषाण रचून त्याचे संतुलन साधण्यात आले आहे. पाषाण जोडण्यासाठी सिमेंट किंवा चुन्याचा वापर केलेला नाही. तर खोबणीद्वारे दगड एकमेकांत अडकवले आहेत. त्यामुळेच मंदिराचे स्थापत्य आगळे वेगळे ठरते.
हे राममंदिर प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर असल्याचे बोलले जाते. तिथे आधी नागपंथीय साधू रहात. मंदिरालगत भैरवनाथ आणि गोरक्षनाथांचे मंदिरही आहे. काही नागपंथी साधूंना अरूणा-वरूणा नद्यांच्या संगमावर या मूर्ती सापडल्या आणि त्यांनी लाकडी मंदिर बांधले. पुढे १७८० मध्ये माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी सरदार रंगराव ओढेकरांना हे मंदिर बांधण्याची सूचना केली. १७९० मध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले. त्याकाळी या बांधकामासाठी २३ लाखाचा खर्च आला.
=================
हे देखील वाचा : जाणून घ्या चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र यांमधील फरक
================
एकदा मी ब्रह्मलोकातून
या मंदिरात पूर्वी दलितांना प्रवेश नव्हता. त्यामुळे त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मोठा लढा उभारण्यात आला. बरीच वर्षे लढा चालूनही त्याला यश आले नाही. अखेर याच घटनेने विदग्ध होऊन डॉ. आंबेडकरांनी येवला येथे हिंदू धर्मात जन्माला आलो तरी मरणार नाही, अशी घोषणा केली. पुढे या मंदिरात दलितानाही प्रवेश देण्यात आला. या लढ्याला काही वर्षांपूर्वीच ७५ वर्षे पूर्ण झाली.
याच मंदिराच्या परिसरात प्रसिद्ध सीतागुंफा आहेत. येथेच सीतेने साधना केल्याचे बोलले जाते. पंचवटी हे नाव ज्यामुळे पडले ते पाच प्रसिद्ध वटवृक्षही याच परिसरात आहेत. मंदिरापासूनच जवळच गोदावरी नदी वाहते. प्रसिद्ध रामकुंडही तेथेच आहे. शिवाय इतर अनेक प्रसिद्ध मंदिरेही याच परिसरात आहेत.