भारतातील सर्वात भक्तीचा मेळावा म्हणून ओळखले जाते ते कुंभमेळ्याला (Kumbhmela). संपूर्ण भारतामध्ये हरिद्वार, नाशिक, प्रयागराज आणि उज्जैन या चार ठिकाणी हा कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरतो. या कुंभमेळाव्याला अनेक शतकांची परंपरा आहे. या मेळाव्याचे महत्व, लोकप्रियता, इतिहास सर्वच पाहून युनेस्कोने (UNISCO) कुंभमेळ्याला ‘जागतिक सांस्कृतिक वारसा’ म्हणून घोषित केले आहे.
यंदा २०२५ या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारीमध्ये प्रयागराजमध्ये हा अभूतपूर्व आणि दैदिप्यमान सोहळा संपन्न होत आहे. या कुंभमेळ्यामध्ये भारतातून, जगभरातून मोठ्या संख्येने साधू, संत येतात आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. या कुंभमेळ्यामधे विविध संप्रदायातील साधू येतात.
प्रत्येक कुंभमेळ्याचे वैशिट्य म्हणजे नागा साधूंचे होणारे दर्शन. या सर्व कुंभमेळ्यांमध्ये नागा साधू (Naga Sadhu) देखील येतात. हे नागा साध्य प्रत्येक व्यक्तीसाठी एक रहस्यच आहे. कारण कुंभमेळ्यात दिसणारे नागा साधू कुठून येतात. तसेच कुंभमेळा झाल्यानंतर कुठे निघून जातात? ते काय खातात आणि कुठे झोपतात? नागा साधू नक्की कोणते लोकं असतात? आदी अनेक प्रश्नांबद्दल आपण जाणून घेऊया.
विवस्त्र राहाणे, सर्वांगाला भस्म लावणे, नाचणे-गाणे, डमरू-डफली वाचवत शंखनाद करणार्या नागा साधूंचे जीवन म्हणजे एक मोठे रहस्य असते. कुंभमेळ्यात सहभागी होण्यापूर्वी नागा साधू कुठे राहातात, काय खातात आणि कुंभमेळा संपल्यानंतर कुठे निघून जातात, याविषयी कोणालाच काही माहीत नसते.
नागा साधूंचे जीवन इतर साधूंपेक्षा अधिक कठिण असते. त्यांचा संबंध शैव परंपरेची स्थापनाने मानला गेला आहे. कुंभ मेळ्यात सामील होणारे १३ आखाड्यांपैकी सर्वात अधिक नागा साधू जुना आखाड्यांतून तयार केले जातात. नागा साधू बनण्याआधी त्यांना अनेक परीक्षेतून जावे लागते. अनेक वर्ष गुरुंची सेवा करावी लागते आणि आपल्या इच्छा त्याग कराव्या लागतात.
कुंभमेळ्यात नागा साधू मोठ्या संख्येने सहभागी होतात. कुंभमेळा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. तिथे गेल्याशिवाय त्या साधूंची नागा बनण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. कुंभ आणि नागा साधूंचा लंगोट यांचाही संबंध असतो. केवळ काही आखाड्यांमध्येच नागा असतात. त्यांना कोतवाल आणि बडा कोतवाल अशी पदे देखील मिळतात.
नागा साधू बनण्याची प्रक्रिया कठीण आणि मोठी असते. नागा साधूंच्या पंथात सामील होण्यासाठी जवळपास ६ वर्षं लागतात. या दरम्यान साधकाला पाच गुरूंकडून शिव, विष्णू, शक्ती, सूर्य आणि गणेश अशा पाच देवांची दीक्षा घ्यावी लागते. भारतात नागा साधूंची संख्या ५ लाखांपेक्षा जास्त आहे.
नागा साधू बनण्याची प्रक्रिया अर्धकुंभ, महाकुंभ आणि सिंहस्थाच्या वेळी सुरू होते. संत समुदायाच्या १३ आखाड्यांपैकी केवळ ७ आखाडेच नागा साधू तयार करतात. त्यात जूना, महानिर्वाणी, निरंजनी, अटल, अग्नी, आनंद आणि आवाहन आखाडा यांचा समावेश होतो.
नागा साधू होण्यास पात्र व्यक्ती आपले सांसारिक जीवन सोडून आध्यात्मिक जीवनात प्रवेश करते. नागा साधू बनल्यानंतर, तो साधक स्वतःच स्वतःला पिंड दान करतो. नागा साधू भिक्षेत दिलेले अन्न ग्रहण करतात आणि त्यांना अन्न मिळाले नाही तर ते उपाशी राहतात.
नागा साधू सामान्य कपडे घालत नाहीत. ते त्यांचे शरीर राखेने झाकतात. नागा साधू झोपण्यासाठी पलंगाचा वापर करत नाहीत. त्यांच्या जीवनात साधेपणाला महत्वाचे स्थान आहे. नागा साधू समाजातील सामान्य लोकांपुढे झुकत नाहीत किंवा कोणाची निंदाही करत नाहीत. नागा साधू बनल्यानंतर ते गाव किंवा शहरातील गर्दीचे जीवन सोडून डोंगरावरील जंगलात राहातात. त्याचे निवासस्थान असे आहे की जेथे कोणी येत नाही.
नागा साधूंची कामेंद्रियं नष्ट करणे हाही त्यांच्या संस्कारांचाच एक भाग असतो. नागा साधू हिमालयात कमी तापमानात नग्न असूनही जिवंत राहतात. अनेक दिवस ते उपाशी राहू शकतात. ऊन, पाऊस, थंडीत त्यांना नग्न राहूनच तपस्या करावी लागते. ते आखाड्याच्या आश्रमात किंवा मंदिरांत राहतात. काही जण हिमालयातल्या गुहांमध्ये किंवा उंच पर्वतांमध्ये तपस्या करून जीवन व्यतीत करतात. आखाड्याच्या आदेशानुसार ते पायी भ्रमंतीही करतात.
वेगवेगळ्या स्थानी नागा साधूची दीक्षा घेणार्या साधूंना वेगवेगळे नाव दिले जातात. अलाहाबाद, प्रयागराज येथे दीक्षा घेणार्यांना नागा म्हणतात. हरिद्वार येथे दीक्षा घेणार्यांना बर्फानी नागा म्हणतात, तर उज्जैनमध्ये दीक्षा घेणार्यांना खूनी नागा म्हणतात. नाशिकमध्ये दीक्षा घेणार्यांना खिचडिया नागा म्हणतात.
====================
हे देखील वाचा :
America : अमेरिका यातही नंबर वन !
Uttar Pradesh : महाकुंभमध्ये 12 ज्योतिलिंग !
====================
असे म्हटले जाते की नागा साधूंमध्ये असामान्य शक्ती असते, ज्या ते कठोर तपश्चर्या करून प्राप्त करतात. या शक्तीचा ते कधीही गैरवापर करत नाही, असे म्हटले जाते की या शक्तीच्या माध्यमातून ते लोकांच्या समस्या सोडवतो. यामुळेच कुंभमध्ये येणारे लोकं नागा साधूंना भेट देतात.
नागा साधू आपले संपूर्ण आयुष्य जंगलात किंवा डोंगरात घालवतात. त्याच्या मृत्यूनंतर, त्यांला भूसमाधी देऊन अंत्यसंस्कार केले जातात. नागा साधूंना आधी जलसमाधी दिली जात असे मात्र नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याने त्यांना भू समाधी देण्यात येते. नागा साधूंना सिद्धयोगाच्या आसनात बसून भू-समाधी दिली जाते.