Home » हिवाळ्यात हेयर केयरच्या ‘या’ टिप्स वापरून टिकवा केसांची चमक

हिवाळ्यात हेयर केयरच्या ‘या’ टिप्स वापरून टिकवा केसांची चमक

by Jyotsna Kulkarni
0 comment
Hair Care
Share

हिवाळा ऋतू आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वात चांगला असतो असे अनेक तज्ज्ञ व्यक्ती, डॉक्टर म्हणतात. हिवाळ्यामध्ये आपल्याला आपले आरोग्य उत्तम कमवण्यासाठी वातावरण खूपच मदत करते. मात्र असे असले तरी आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या दृष्टीने हा ऋतू त्रासदायक ठरतो. कारण सतत वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर आणि केसांवर होतो. त्वचेसाठी आपण अनेक क्रीम, लोशन लावून थोडीफार तरी काळजी घेऊ शकतो मात्र केसांची काळजी घेणे तसे अवघड आणि संवेदनशील असते. या कोरड्या वाऱ्यांमुळे केसांच्या अनेक समस्या उदभवतात.

हिवाळ्यामध्ये बदलणाऱ्या वातावरणामुळे केस निर्जीव, कोरडे होऊ लागतात. केसांवरील नैसर्गिक चमक नाहीशी होऊ लागते. तसंच केस तुटणे आणि केसगळतीचीही समस्या निर्माण होते. यामुळे केसांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. हे नुकसान टाळण्यासाठी नियमित हेअर केअर रुटीन पाळणे आवश्यक आहे. केसांच्या देखभालीसाठी डॉक्टरांचा सल्ल्ला घेताना काही नैसर्गिक घरगुती उपचार देखील करता येऊ शकता.

केसांची योग्य ती काळजी घेतली तर अगदी कडाक्याच्या थंडीतही तुमचे केस तुम्हाला हवे तसे दिसतील. तेलानं नियमितपणे केसांची मालीश करणं, कोमट पाण्यानं केस व्यवस्थित धुणं, केसांसाठी रसायनविरहीत शाम्पू वापरणं याशिवाय काही महत्त्वाच्या गोष्टी या काळात केल्याचं पाहिजे सोबतच अनेक घरगुती उपाय देखील करता येतील. पण केसांची योग्य काळजी घेतल्यास या समस्येला सामोरे जाऊ शकते. अशा परिस्थितीत केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता. त्या कोणत्या चला जाणून घेऊया.

​केसांना तेल लावा
सुंदर आणि घनदाट केसांसाठी नियमित तेल लावणं आवश्यक आहे. तेलाच्या मदतीने केसांचा मसाज करावा आणि थोड्या वेळासाठी तेल आपल्या केसांमध्ये राहू द्यावे. तेल मसाजमुळे टाळूच्या त्वचेला पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. तसंच केसांशी संबंधित समस्या दूर होण्यासही मदत मिळते.

​हेअर पॅक
थंडीच्या वातावरणात हेअर पॅक लावणं अतिशय गरजेचे आहे. यामुळे केसांना खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकून राहण्यासही मदत मिळते. घरातील एकही बेसिक सामानापासून हेअर पॅक तयार करून तो केसांना लावू शकता. नैसर्गिक हेअर पॅकमुळे टाळूची त्वचा निरोगी राहते आणि केसांना मॉइश्चराइझर देखील मिळते. यासोबतच तुम्ही कोरफड आणि आयुर्वेदिक तेलापासून तयार केलेल्या हेअर मास्कचाही वापर करू शकता.

शाम्पू
थंडीमध्ये केस धुण्यासाठी योग्य शाम्पू वापरा. म्हणजेच खूप जास्त केमिकल्स असलेला शाम्पू वापरु नका. हार्ड शाम्पू वापरल्यामुळे केसांचं नुकसान होऊ शकतं.

सीरमचा वापर करा
कंडिशनिंग केल्यानंतर चांगल्या प्रतिचं सीरम केसांना लावलयास थंडीमध्ये फायदा होतो. स्कॅल्पसाठी खास सीरमही सहज बाजारात मिळते. डोक्याची त्वचा चांगली राहिली, कोरडी- शुष्क नाही झाली तर संपूर्ण केसच निरोगी राहतात.

कंडिशनर लावणे
आपल्यापैकी बहुतांश जण हेअर वॉशनंतर कंडिशनर लावणे विसरतात किंवा लावतच नाहीत. यामुळे केस अधिक कोरडे होतात. थंडीच्या दिवसांत हेअर वॉश केल्यानंतर न विसरता कंडिशनरचा वापर करावा. यामुळे केस कोरडे होत नाहीत.

कोरफड
थंडीमध्ये हवेतच कोरडेपणा असतो. साहजिकच त्याचा परिणाम केसांवरही होतो. हा कोरडेपणा कमी करण्यासाठी एलोव्हेरा म्हणजे कोरफडीचा उपयोग होतो. कोरफडीमध्ये सॅलिसिलिक अॅसिड असतं. त्यामध्ये जंतूनाशक आणि संसर्ग रोखण्यासाठी कारणीभूत गुण असतात. त्यामुळे केस गळणे किंवा कोंड्याची समस्या दूर होते. आणि केस सुंदर आणि दाट होण्यास मदत होते.

केस ओले ठेवू नका
केस धुतल्यानंतर ते व्यवस्थित पुसून कोरडे करा. त्यासाठी अगदी हेअर ड्रायर शक्यतो वापरू नका. पण केस अजिबात ओले राहू देऊ नका. केस ओले राहिले तर ते लवकर तुटतात. मात्र जोरात चोळूनही ते पुसू नका. नाहीतर केस खूप रुक्ष होऊ शकतात. ओले केस विंचरू नका किंवा त्यातला गुंता काढण्याचा प्रयत्न करु नका.

Hair Care

जास्त वेळा केस धुऊ नका
नैसर्गिक तेल स्रावामुळे हिवाळ्यात टाळू खूप तेलकट बनते. जास्त वेळा केस धुण्याचा मोह टाळावा. आठवड्यातून जास्तीत जास्त दोनदा केस धुणे योग्य राहील. तुमचा शाम्पू आणि कंडिशनर सल्फेट आणि पॅराबेन फ्री असेल तेच वापरा.

ओले केस ठेऊन बाहेर जाऊ नका
ओल्या केसांनी हवेत बाहेर पडणे अधिक नुकसानकारक ठरेल. हिवाळ्यातील हवेत ओले केस जास्त प्रमाणात तुटतात. केसांना नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या. हिवाळ्यातच नाही तर कोणत्याही हंगामात ओल्या केसांनी बाहेर पडणं टाळा. कारण प्रदूषणामुळे धूळ केसाला चिकटते आणि त्यामुळे केस लवकर खराब होतात.

कोमट पाण्याचा वापर
केस धुण्यासाठी अधिक गरम पाण्याचा वापर करू नये. यामुळे केसांचे भरपूर नुकसान होते. केस धुण्यासाठी खूप गरम किंवा खूप थंड पाणी वापरू नये. केस स्वच्छ धुण्यासाठी कोमट पाण्याचा उपयोग करावा. गरम पाण्यामुळे टाळूच्या त्वचेवर थेट परिणाम होतात. टाळूची त्वचा निरोगी असल्यास केसांशी संबंधित समस्या निर्माण होत नाहीत. पण टाळूची त्वचा कोरडी झाल्यास कोंडा, केसगळती, केस तुटणे इत्यादी समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

​भरपूर पाणी प्या
संपूर्ण शरीराची कार्य प्रणाली सुरळीत पार पडण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. भरपूर पाणी प्यायल्याने केस आणि त्वचेलाही लाभ मिळतात. त्वचेसह केस देखील हायड्रेट राहतात. हिवाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.

​हीटिंग टुलचा वापर कमीतकमी
बहुतांश मुली हेअरस्टाइलसाठी हीटिंग टुलचा अधिक प्रमाणात वापर करतात. उदाहरणार्थ हेअर स्ट्रेटनर किंवा ड्रायर इत्यादी. तसंच कलर ट्रीटमेंटमुळेही केसांचे प्रचंड नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी हीटिंग टुलचा वापर कमी प्रमाणात करावा.

डाएट
थंडीमध्ये केसांच्या आणि एकूणच आपल्या शरीराच्या योग्य पोषणासाठी आहार देखील उत्तम असणे आवश्यक आहे. थंडीमध्ये भूक जास्त लागते. थंडीत भरपूर भाज्या, फळे सहज उपलब्ध असतात. त्याचा फायदा घ्या. ताज्या भाज्या, फळांचा आपल्या रोजच्या आहारात न चुकता समावेश करा. ड्रायफ्रूट्स खा. योग्य आणि समतोल आहार घ्या.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.