हिवाळा (Winter) सुरु झाल्यानंतर विविध भाज्यांची अवाक मोठ्या प्रमाणावर वाढते. पालेभाज्यांमध्ये तर मोठ्या प्रमाणावर विविधता दिसून येते. हिवाळा हा आपल्या शरीराच्या दृष्टीने आणि आरोग्यच्या दृष्टीने महत्वाचा ऋतू मानला जातो. मात्र या ऋतूमध्ये आपण देखील थोडी काळजी घेत चांगल्या पद्धतीचे सकस जेवण आणि उष्ण पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणे आवश्यक असते. (Health Tips)
वातावरणात थंडावा आणि थंड वाऱ्यांमुळे आपल्याला अनेक आजारांचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. सर्दी, खोकला, ताप हे आजार तर हिवाळ्यामध्ये हमखास होताना दिसतात. या किंवा इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी आपण आपले शरीर उष्ण ठेवणे गरजेचे आहे. यासाठी आपण आपल्या आहारामध्ये बदल करून उष्ण पदार्थ खाणे अपेक्षित आहे. अशातच जर हिवाळ्यामध्ये आपण लसूण जास्त खाल्ला तर त्याचे देखील मोठया प्रमाणावर फायदे आपल्याला होताना दिसतात. (Winter Health)
भारतामध्ये असे कोणतेही घर नसेल ज्या घरामध्ये लसूण न वापरता जेवण बनत असेल. आपल्या देशात लसणाचा मुबलक वापर केला जातो. भाज्यांना चव आणण्याचे मोठे काम लसूण करते. मात्र तुम्हाला माहित आहे का? की लसूण हा चव देण्यासोबतच आपल्या आरोग्याला अनेक आजारांपासून वाचवत असतो. हिवाळ्यामध्ये तर लसूण प्रकर्षाने खाल्लाच पाहिजे. नक्की हिवाळ्यात लसूण खाऊन कोणते फायदा मिळतात जाणून घेऊया. (Garlic Benefits)
सर्दी-खोकल्यामध्ये फायदेशीर
हिवाळ्यात सर्दी-खोकल्यासारख्या समस्या सामान्य आहेत.जर लसणाचे नियमित सेवन केले तर या समस्या टाळता येऊ शकता. लसणात नैसर्गिकरित्या अँटीवायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे लसणाचे सेवन केल्याने सर्दी, खोकल्यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. (Marathi News)
थंडीमध्ये आराम मिळेल
लसणात उष्णता निर्माण करणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि थंडी कमी होते. लसणाच्या सेवनाने रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे हात आणि पायांना उबदारपणा येतो आणि थंडीपासून आराम मिळतो. (Latest Marathi News)
रोगप्रतिकारशक्ती वाढते
हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे विविध आजारांचा संसर्ग होणे सामान्य आहे. अशा वेळी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणे खूप महत्त्वाचे आहे. लसणामध्ये अॅलिसिन नावाचे एक संयुग असते ज्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि इम्युनोमोड्युलेटरी गुणधर्म असतात. हे गुणधर्म शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. (Garlic and Health)
पचनसंस्था मजबुतीसाठी
हिवाळ्यात पचन खूप कमकुवत होते, त्यामुळे लसणाचे नियमित सेवन केल्यास ही समस्या टाळता येते. यात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत जे पचन सुधारण्यास मदत करतात.
श्वसनाच्या समस्या
लसणात असे गुणधर्म असतात जे श्वसनाच्या समस्यांशी लढण्यास मदत करतात. त्याचे सेवन श्वसनमार्गातून श्लेष्मा साफ करण्यास मदत करते.
रक्तदाब
लसणाच्या नियमित सेवनाने उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
केसांसाठी फायदेशीर
लसणामध्ये सिस्टीन नावाचे अमिनो आम्ल मुबलक प्रमाणात असते. हे आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. म्हणजेच लसूण खाल्ल्याने केस लांब होतात. तसेच केस निरोगी राहतात.
हृदयरोगाचा धोका कमी
हिवाळ्यात हृदयरोगाचा धोका वाढतो. जर दररोज कच्चे लसणाच्या पाकळ्या खाल्ल्या तर शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होईल. हृदयरोगाचा धोकाही कमी होईल. लसूण हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतो.
===============
हे देखील वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार ?
===============
मधुमेह नियंत्रण
लसूण खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. लसणातील औषधी गुणधर्म रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात. तसेच, सर्दीमुळे होणारे सांधेदुखी कमी करण्यासही मदत करतात.