केरळ विधानसभेत सर्वसंम्मतीने राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव पारित झाला आहे. केरळ सरकारने केंद्र सरकारला अपील केले आहे की,राज्याचे नाव बदलून केरलम असे करावे. विधानसभेत या संबंधित संविधानात संशोधन करण्याची मागणी करण्यात आली आहे. संविधानात या राज्याचे नाव केरळ असे आहे. केरळ सरकारने अशी मागणी केली आहे की, केंद्र सरकारने आता केरळाचे नाव बदलण्यास मंजूरी द्यावी. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केरळ विधानसभेत प्रक्रिया आणि कार्य संचालन नियम ११८ अंतर्गत सदनाता प्रस्ताव पारित केला आहे.(Kerala official name)
मल्याळम भाषेत केरलम शब्दाचाच वापर करण्यात आला आहे. ऐतिहासिक संदर्भात ही केरलम असा उल्लेख आहे. इंग्रजांनी त्याला केरळ असे म्हटले. तर दुसऱ्या भाषांमध्ये ही केरळ असे म्हटले गेले आहे. संविधानातील पहिल्या अनुसूचीत राज्याचे नाव केरळ लिहिले गेले आहे. अशातच राज्य सरकारने संविधानिक बदलावाची मागणी केली आहे.
कसे पडले केरळ नाव?
काही इतिहासकार असे मानतात की, ‘केरलम’ नाव ‘केरा’ शब्दावरुन आला आहे. याचा अर्थ असा होतो की, नारळाचे झाडं. या राज्याची ओळख सुद्धा तिच आहे. धार्मिक मान्यत आहे की, भगवान परशुरामाने समुद्राकडून भुमि पुन्हा मिळवली होती. यामुळे आधी ‘चेरना-आलम’ असे नाव अस्तित्वात आले. त्यानंतर त्याचे नाव केरलम असे झाले. केरलम नावावरुन केरळ हे नाव प्रचलित झाले.
कसे अस्तित्त्वात आला केरळ?
देशातील दक्षिण-पश्चिमेला असलेले हे राज्य अत्यंत जुने आहे. त्रवनकोर आणि कोचिन रियासत मिळून १ जुलै १९४९ मध्ये मिळून त्रवनकोर-कोचीन राज्य अस्तित्वात आले. तर मालाबार मद्रास प्रांताच्या अधीनच राहिला. राज्य पुर्नगठन अधिनियम १९५६ अंतर्गत त्रावनकोर-कोचीन राज्य आणि मालाबार मिळून १ नोव्हेंबर १९५६ रोजी केरळ राज्य अस्तित्वात आले.
केरळची भाषा, मल्याळम आहे. केरळ शब्द कसा अस्तित्वात आला या बद्दल कोणताही स्पष्टता नाही. अशी मान्यता आहे की, चेरना आणि आलम सारखे शब्द मिळून केरलम शब्द तयार झाला आहे. केरलमचा अर्थ असा होतो की, असा भूभाग जो समुद्रातून निघाला आहे. याचा आणखी एक अर्थ असा होतो की, समुद्र आणि पवर्तांचे संगम स्थान. केरळाचा विदेशी साहित्यात मलाबार नावाने उल्लेख केला आहे.
केरलम नावाचे का अपील केले जातेय?
राज्य सरकारने असा तर्क लावला आहे की, राज्याचे नाव केरलम असेच आहे. १ नोव्हेंबर १९५६ रोजी भाषेच्या आधारावर जेव्हा राज्यांचे पुर्नगठन झाले तेव्हा सुद्धा केरलम करण्याची मागणी केली होती. हेच कारण आहे की, १ नोव्हेंबरला केरलप्पिरवी दिवस सुद्धा साजरा केला जातो. केरळ, जसे दक्षिण भारतीय राज्यात भाषेच्या आंदोलनासाठी इतिहास म्हणून राहिला होते. (Kerala official name)
हेही वाचा- इस्लाम धर्मात बहुविवाह प्रथा नाही, शरियत आणि संविधान काय म्हणते पहा
मल्यामळम बोलणारी लोक दशकांपासून एकजुट केरलमचा नारा देतात. राज्याची मातृभाषा स्वतंत्रता संग्रामच्या दिवसांपासूनच मजबूत होती. राज्याचे नाव बदलण्याची मागणी फार जुनी आहे. जेव्हा संविधान तयार करण्यात आले तेव्हा संविधानाच्या पहिल्या अनुसूचित याचे राज्य केरळ असे लिहिले गेले. आता राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे की, संविधानातील कलम ३ अंतर्गत याचे केरलम असे नाव करावे.