Home » उत्तराखंडातील ‘या’ मंदिरात आहे चुंबकीय शक्ती, शरिराला आकर्षून घेतात असे म्हटले जाते

उत्तराखंडातील ‘या’ मंदिरात आहे चुंबकीय शक्ती, शरिराला आकर्षून घेतात असे म्हटले जाते

by Team Gajawaja
0 comment
Kasar Devi Temple
Share

उत्तराखंड सारख्या सुंदर राज्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे की, येथे अशी काही ठिकाणं आहेत जी परदेशी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. मात्र उत्तराखंड मधील असे एक रहस्यमय मंदिर आहे जेथे दूरदूरवरुन लोक येतात. खरंतर अल्मोंडा मधील कसर देवी मंदिर (Kasar Devi Temple) हे आपल्या अनोख्या चुंबकिय चमत्कारासाठी लोकप्रिय आहे. ज्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमी वैज्ञानिक सुद्धा येतात. असे मानले जाते की, या चमत्काराबद्दल आजवर कोणलाही काही माहिती नाही. तर आज आपण याच कसर मंदिराबद्दल अधिक जाणून घेऊयात.

कसर मंदिराचा इतिहास
कसर देवी ही तिच जागा आहे जेथे स्वामी विवेकानंद सुद्धा आले होते. त्यांनी तेथे ध्यान केले होते. तेव्हापासून हे ठिकाण आणि मंदिर पर्यटकांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. स्वामी विवेकानंद यांना हे ठिकाण ऐवढे आवडले होते की, त्यांनी आपल्या लेखात याचा उल्लेख सुद्धा केला होता. कसर देवी लोकांमध्ये ऐवढी प्रिय झाली की, बॉब डायलन, जॉर्ज हॅरिसन, कॅट स्टीवंस, एलन गिन्सबर्ग आणि टिमोथी लेरी सारखे काही प्रसिद्ध व्यक्ती सुद्धा आल्या होत्या. ७० च्या दशकात हिप्पी संस्कृतीच्या दशकात हे ठिकाण हिप्पी हिल बनली होती.

Kasar Devi Temple
Kasar Devi Temple

चुंबकीय शक्तीसाठी प्रसिद्ध आहे मंदिर
कसर देवी मंदिर भारतातील उत्तराखंड येथील अल्मोडा पर्वतांवर आहे. मंदिराबद्दल असे मानले जाते की, येथे साक्षात देवीने अवतार घेतला होता. असे म्हटले जाते की, भारतातील हे असे एकमेव ठिकाण आहे जेथे चुंबकीय शक्ती आहे. मंदिराच्या आसपास अशा काही जागा आहेत जेथे जमिनीखाली मोठे मोठे भू-चुंबकीय पिंड आहे.त. कसार देवी मंदिराच्या आसपासचे क्षेत्र वॅन एलेन बेल्ट आहे. येथे जमिनीखाली भू-चुंबकीय पिंड आहेत. या मंदिरात काही शक्ती आहेत. ज्याचा शोध घेण्यासाठी नासाचे वैज्ञानिक सुद्धा आले होते. मात्र त्यांना काहीच कळले नाही.(Kasar Devi Temple)

प्रत्येक वर्षी असते जत्रा
अल्मोडा मधील कसर देवी मंदिर एक सर्वाधिक मोठे ऐतिहासिक महत्वाचे आहे. हे मंदिर प्रसिद्ध तीर्थ स्थळांपैकी एक आहे. या मंदिरात प्रत्येक वर्षी कार्तिक पौर्णिमेदरम्यान कसार जत्रेचे आयोजन असते. येथे हजारो-लाखो लोक येत असतात. ही जत्रा फक्त या राज्यातच नव्हे तर विदेशात ही प्रसिद्ध आहे.

हे देखील वाचा- युद्धानंतर येथे केले पांडवांनी पिंडदान….

कसे पोहचाल
-देहरादून मधील पंतनगर विमानतळापासून कसर देवी मंदिर जवळ आहे. ते येथून १२४ किमी आहे. विमानतळावरुन प्रवासी येथे स्थानिक बस किंवा खासगी टॅक्सीच्या माध्यमातून अल्मोडा येथे जाऊ शकतात. जे कसर देवी मंदिरापासून ८ किमी दूर आहे.
-ट्रेनच्या माध्यमातून तुम्ही येणार असाल तर काठगोदाम रेल्वे स्थानक जवळ आहे. येथून मंदिर ८८ किमी दूर आहे. स्थानिक बस आणि खासगी टॅक्सी स्टेशन पासून अल्मोडासाठी दररोज येतजात असतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.