प्राचीन काळापासून कैलास पर्वत (Kailash Mount) हे भगवान शंकराचे निवासस्थान मानले जाते. कैलास पर्वताचे दर्शन घेण्यासाठी या Kailash Mansarovar यात्रेला जाणारे हजारो भाविक आहेत. कैलास पर्वताची प्रदक्षिणा ही हिंदू धर्मातील सर्वात मोठी धार्मिक यात्रा मानली जाते. मात्र तमाम भारतीयांसाठी ही कैलास मानसरोवर यात्रा (Kailash Mansarovar Yatra) गेल्या पाच वर्षापासून अत्यंत दुर्मिळ झाली होती. कारण या कैलास मानसरोवर यात्रेसाठी सर्वात जवळचा मार्ग हा तिबेटच्या भागातून जाणारा आहे. हा भाग चीनच्या वर्चस्वाखाली असल्याने चीनने या भागातून जाण्यासाठी भारतीय शिवभक्तांना परवानगी नाकारली आहे. आता नेपाळमार्गे ही यात्रा होते. मात्र हा सर्वात लांबचा पर्याय आहे.
त्यामुळेच गेल्या काही वर्षापासून चीन (China) या मानससरोवर यात्रेसाठी सहकार्य करेल असे प्रयत्न भारताकडून करण्यात येत होते. या प्रयत्नांना यश मिळाल्याची माहिती आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार Ajit Doval आणि चीनचे परराष्ट्र मंत्री Wang Yi यांची नुकतीच बीजिंगमध्ये बैठक झाली. यात कैलास मानसरोवरचा मार्ग भारतीयांसाठी खुला झाल्याची माहिती आहे. तमाम शिवभक्त या बातमीमुळे आनंदीत झाले आहेत.
चीनच्या दौ-यावर गेलेले भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार Ajit Doval यांनी तमाम शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. कैलास मानसरोवर यात्रेसंदर्भात भारत आणि चीनमध्ये मोठा करार झाला आहे. जून 2020 मध्ये गलवानमधील वादानंतर China आणि भारताचे संबंध तणावाचे झाले. त्यात चीननं भारतातून येणा-या कैलास सरोवर यात्रेकरुंना बंदी घातली.
आता पाच वर्षांनंतर बीजिंगमध्ये दोन्ही देशांचे प्रतिनिधी भेटले आणि त्यांच्यात कैलास मानसरोवरपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करण्याचा करार झाला आहे. तिबेटमधून कैलास मानसरोवर यात्रा लवकर सुरू करणे, सीमापार नदी सहकार्य आणि नथुला सीमा व्यापाराला प्रोत्साहन देण्यावर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली आहे.
15 जून 2020 रोजी Gallowan येथे झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. तर सुमारे 60 चिनी सैनिक मारले गेले. या सर्वांत चीननं भारतीयांच्या कैलास यात्रेवर बंदी घातली. कैलास मानसरोवर यात्रा तीन वेगवेगळ्या महामार्गांवरून होते. पहिल्या मार्ग हा Lipulekh Pass, उत्तराखंड येथून आहे. दुसरा मार्ग Nathu La सिक्कीम येथून आहे. तिसरा नेपाळमार्गे आहे. जरी हा मार्ग भारत सरकारकडून अधिकृत नसला तरी काही यात्रेकरू नेपाळमार्गे तिबेटला पोहोचतात आणि कैलास मानसरोवराला भेट देतात. या तीन मार्गांवरुन कैलास पर्वताच्या पायथ्याशी जाण्यास 14 ते 21 दिवस लागतात.
या प्रवासादरम्यान, यात्रेकरू कैलास पर्वताची प्रदक्षिणा करतात आणि मानसरोवर तलावाचेही दर्शन घेतात. हिंदू धर्मात या दोन्हीही यात्रा मोक्ष प्राप्तीसाठी सर्वोच्च मानल्या जातात. यामुळेच या यात्रेसाठी हजारो हिंदू भाविकांची गर्दी असते. मात्र यापैकी मोजक्याच भाविकांना प्रत्यक्ष कैलास पर्वताचे दर्शन घेता येते. कारण या सर्वात चीनची परवानगी आवश्यक आहे. चीननं भारतीय शिवभक्तांना परवानगी नाकारल्यावर नेपाळमार्गे हा प्रवास केला जात आहे. मात्र यासाठी अधिक दिवस लागतात आणि हा मार्ग खर्चिकही असल्याचे सांगण्यात येते.
Kailash Mansarovar Yatra काढण्यासाठी आत्तापर्यंत चीनची परवानगी आवश्यक होती. कारण ही यात्रा तिबेटमध्ये होते. सध्या Tibet हा चीनचा स्वायत्त प्रदेश आहे. त्यामुळे या भागात जाण्यासाठी चायनीज टुरिस्ट व्हिसा घेणे गरजेचे असते. चीन सरकार मोजक्या भारतीयांना हा टुरिस्ट व्हिसा देत असे. पाच वर्षापासून हा व्हिसाही बंद कऱण्यात आला आहे.
==============
हे देखील वाचा : कैलास पर्वताची थक्क करणारी रहस्ये
कैलास पर्वताची रखवाली करणारा रान समाज…
===============
China Government ने या भागातील प्रवासासाठी नियम आणि अटी निश्चित केल्या आहेत. त्याचे अत्यंत काटेकोरपणे पालन करावे लागते. आता नव्यानं चीनने भारतासोबत कैलास मानसरोवर बाबत केलेल्या करारामुळे या सर्वांमध्येही भारतीय भाविकांना अधिक सुट मिळेल अशी आशा आहे. तसेच जो मर्यादित कोटा ठरवला आहे, त्यातही वाढ होईल, अशी आशा शिवभक्तांना आहे. कैलास मानसरोवरचा प्रवास समुद्रसपाटीपासून 17 हजार फूट उंचीवर असलेल्या लिपुलेख खिंडीतून सुरू होतो. हा प्रवास जून महिन्यात सुरू होत असला तरी त्याची तयारी जानेवारीपासूनच सुरू होते. आता ही बातमी आल्यामुळे नव्यावर्षात कैलास यात्रेसाठी सुरु होणारी नोवनोंदणी विक्रमी होईल, अशी आशा आहे.
सई बने