Joint Pain in Winter : हिवाळा आणि सांधेदुखी यांचे खास कनेक्शन आहे. खरंतर हिवाळ्यात तापमानाचा पारा खाली उतरला जातो. यामुळे स्नायू खेचल्यासारखे होतात आणि अशातच स्नायूंच्या आसपास असणाऱ्या पेशींना सूज येत दुखण्यास सुरुवात होते. खासकरुन अशा व्यक्तींना जे आधीपासून सांधेदुखीच्या समस्येचा सामना करत आहेत. हिवाळ्यात सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळावा मिळण्यासाठी काही सोपी योगासने घरच्याघरी करू शकता. जाणून घेऊया याबद्दल अधिक….
सांधेदुखीची समस्या कधी होते?
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, सांधेदुखीची कोणत्याही वयात होऊ शकते. जसे वय वाढते तेव्हा नैसर्गिक रुपात शरिरातील हाडांची झिज होऊ लागते. अशातच हाडं कमकुवत झाल्यानंतर दुखापत होण्याची अधिक शक्यता असते. पण सांधेदुखीच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी तुम्ही हेल्दी वजन, दररोज व्यायाम, सांधे दुखीच्या समस्या वाढणारी नाही अशा फूड्स पासून दूर राहावे आणि पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.
हस्त उत्तानासन
हिवाळ्यात ज्या लोकांना शरिराच्या वरच्या भागात दुखते त्यांच्यासाठी हस्त उत्तानासन अत्यंत फायदेशीर आहे. या योगासनामुळे तणाव कमी होण्यास शरीर लवकचीक होण्यास मदत होते. याशिवाय छाती आणि खांदे यावर हे योगासन करताना ताण पडत असल्याने त्या भागातील स्नायूंना आराम मिळतो. हस्त उत्तानासनामुळे शरिरातील ब्लड सर्कुलेशनची प्रक्रिया सुरळीत होतो.
अधो मुख मार्जरी आसन
हिवाळ्यात पाठीचा कणा बहुतांशजणांचा दुखतो. त्यांच्यासाठी अधो मुख मार्जरी आसन अत्यंत उपयोगी आहे. हे आसन केल्याने पाठीच्या दुखण्याच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळतो. याशिवाय शरिरातील ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत होण्यासह स्नायूंनाही आराम मिळतो. अधो मुख मार्जरी आसन तुम्ही दररोज करू शकता.
अधोमुख शवासन
तुमची पाठ आणि खांदे हिवाळ्यात सतत दुखत असल्यास तुम्ही अधोमुख शवासन करू शकता. यामुळे खांदे आणि पाठ दुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. याशिवाय शरीर आतमधून गरम राहण्यास या योगासनामुळे मदत होते. (Joint Pain in Winter)
सेतुबंधासन
हिवाळ्यास सेतुबंधासन केल्याने पाठीच्या दुखण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. यासोबत तुमचा ताणही कमी होतो. सेतुबंधासन या योगासनामुळे तुमच्या पाठीचा कणा लवचीक होण्यासह शरिरातील ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत होते.
(टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.)