ओडिसा राज्यातील पुरी शहरत भगवान जगन्नाथ यांचे प्रसिद्ध मंदिर आहे. भारतातील चार प्रमुख धामांपैकी एक जगन्नाथ मंदिर आहे. प्रत्येक महिन्याच्या आढाष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीला भगवान जगन्नाथ रथ यात्रा काढली जाते. या यात्रेदरम्यान भगवानाचे तीन विविध विशाल रथावर बसून आपल्या धामापासून गुंडिचा मंदिरात जातात. या रथात मधोमध बहिण सुभद्रा, बाजूच्या रथात श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या प्रतिमा असतात. भगवान जगन्नाथ यांच्या या रथ यात्रेत सहभागी होण्यासाठी दूरदूरवरुन भाविक येतात. असे मानले जाते की, या रथात सहभागी होणाऱ्यांना १०० यज्ञांचे पुण्य लाभते. मृत्यूनंतर ही लोक मोक्ष प्राप्त करतात. यंदाच्या वर्षी जगन्नाथ रथ यात्रा १ जुलै पसून निघणार आहे.परंतु जगन्नाथ रथ यात्रेसंदर्भातील काही अनोख्या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का? (Jagannath rath yatra)
जगन्नाथ यात्रेसंबंधित अनोख्या गोष्टी जाणून घेऊयात
-भगवान जगन्नाथांचे मंदिर हे ८०० वर्षांपूर्वीचे आहे. या मंदिरात भगवान श्रीकृष्ण आपली बहिण सुभद्रा आणि भाऊ बलराम यांच्यासोबत विराजमान झाले होते. येथे श्रीकृष्णाला जगन्नाथाच्या रुपात ओळखले जाते. त्यांचा भाऊ बलराम आणि बहिण सुभद्रा यांची सुद्धा पूजा केली जाते.
-प्रत्येक वर्षी यात्रेदरम्यान १५ दिवस आधी भगवान जगन्नाथ आजारी पडतात आणि ही स्थिती १५ दिवस राहते. या दरम्यान, भगवान जगन्नाथ एकांतवासात राहतात. पूर्णत: स्वस्थ झाल्यानंतर भगवान भक्तांना दर्शन देतात आणि भव्य रथ यात्रा काढली जाते.
-या रथ यात्रेत तीन रथ असतात. सर्वात पुढे असलेला रथ हा बलरामजी यांचा असतो. याच दरम्यान सुभद्रा देवींचा रथ आणि सर्वात मागे भगवान जगन्नाथ असतात. बलरामजी यांच्या रथाला तालध्वज असे म्हटले जाते. तर देवी सुभद्रा यांच्या रथाला दर्पदलन किंवा पद्म रथ असे म्हटले जाते. भगवान जगन्नाथ यांच्या रथाला नंदीघोष किंवा गरुडध्वज म्हणतात.
-या सर्व रथांची ओळख रंगांच्या आधारावर केली जाते. तालध्वज रंग लाल आणि हिरव्या रंगाचा असतो. दर्पदलन काळा आणि लाल किंवा निळा आणि लाल रंगाचा असतो. नंदीघोषचा रंग लाल आणि पिवळा असतो. सर्वाधिक उंच रथ हा नंदीघोषाचा असतो. याची उंची ४५.६ फूट, त्यानंतर बलरामजी यांचा तालध्वज ४५ फूट उंच आणि देवी सुभद्रा यांचा दर्पदलन रथ ४४.६ फूट उंच असतो.
हे देखील वाचा- घरात देवघराची रचना कशी असावी? जाणून घ्या वास्तूशास्र काय सांगते

-या रथ यात्रेची तयारी अक्षय्य तृतीयेपासून सुरु होते. सर्व रथ कडुलिंबाच्या पवित्र आणि परिपक्व लाकडांपासून तयार करण्यात येते. त्याला दारु असे म्हणतात. या रथाच्या निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारचे खिळे किंवा काट्यांचा, धातूचा वापर केला जात नाही.(Jagannath rath yatra)
-ढोल, ताशे, तुतारी आणि शंखध्वनीसोबत आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितिय तिथीला या रथ यात्रेचा प्रारंभ होतो. असे मानले जाते की, या यात्रेदरम्यान भगवान आपली मावशी घर गुंडिचा मंदिरात जातात. तेथे तिन्ही देव ७ दिवसांपर्यंत आराम करतात आणि दशमी तिथीला पुन्हा मुख्य मंदिरात परतात.
-असे म्हटले जाते की, रथ यात्रेदरम्यान रथ खेचल्यास व्यक्तीची पाप संपतात आणि त्याला १०० जन्मांचा पुण्य आणि मोक्ष ही मिळतो. रथ खेचणाऱ्याला सौभाग्यवान मानले जाते.