भारतात दीर्घकाळ मुख्यमंत्री पदावर कार्यरत राहिलेल्या नावांच्या यादीत ज्योति बसु यांचे नाव आवर्जुन घेतले जाते. त्यांच्या नावे काही रेकॉर्ड्स सुद्धा आहेत. शिक्षणादरम्यान ते कम्युनिस्मकडे आकर्षित झाले आणि पेशाने बॅरिस्टर असलेले बसु दा यांना कॉलेज आणि इंग्लंड मधील शिक्षणादरम्यान राजकरणात फार आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी देशातील कम्युनिस्टच्या एखाद्या शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे राजकरण केले आणि २३ वर्ष ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. त्यांना एकेकाळी भारताच्या पंतप्रधान पदासाठी विचारण्यात आले होते. मात्र त्यांनी त्यासाठी नकार दिला होता. त्यांना आजही बंगाल मधील लोहपुरुष म्हणून ओळखले जाते.(Iron man of Bengal)
ज्योति दा नावाने ओळखले जाणारे ज्योतिरेंद्र बसु यांचा जन्म कोलकाता मधील एका बंगाली कायस्थ परिवारात ८ जुलैला १९१४ रोजी झाला होत. वडिल हे पेशाने डॉक्टर होते. तर आई ही एक गृहिणी होती. बसु हे घरातील सर्वाधिक लहान तिसरे मुलं होते. बसु यांचे बालपण बंगालमधील ढाका जिल्ह्यातील बार्दीत गेले. त्यानंतर शालेय शिक्षण कोलकाता मध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्ण केल्यानंतर १९३५ मध्ये ते कायद्याचा अभ्यास करण्याठी लंडनला गेले.
इंग्लंडमध्ये ज्योति बसु यांच्या आयुष्यात काही उल्लेखनीय बदल झाले. ते कमुनिस्ट पार्टीकडे अधिक आकर्षित झाले आणि स्वातंत्र्यच्यासाठी काम करणाऱ्या संघटनांशी ते जोडले गेले. १९४० मध्ये बॅरिस्टर बनून ते भारतात परतले. कलकत्ता हायकोर्टात ते वकील झाले आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला जोडले गेल्यानंतर १९४६ मध्ये बंगालच्या राजकरणात ते सक्रिय झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या संस्थापकांमध्ये सहभागी झालेले बसु १९७७ मध्ये पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले.
ज्योति बसु यांच्या नेतृत्वाखाली सीपएमने पश्चिम बंगाल मध्ये आपला पाया घट्ट केला. याच जोरावर ते २३ वर्षापर्यंत प्रदेशाचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात कृषी उत्पादनाला फार वेग आला होता. १९७० च्या दशकात या क्षेत्राला अधिक चालना मिळाली.अशा प्रकारे पश्चिम बंगाल आयात करणाऱ्या प्रदेशांना खाद्य निर्यात करणारा प्रदेश झाला. (Iron man of Bengal)
हेही वाचा- केवळ राजकरणच नव्हे तर क्रिकेट आणि कॉर्पोरेटमध्ये ही शरद पवारांची होते चर्चा
१९८० च्या दशकात पश्चिम बंगालमध्ये नक्षलवाद्यांचा उदय झाला. ते स्थायी रुप घेऊ शकत होते. मात्र ज्योती दा आणि त्यांच्या सरकारने प्रदेशाला नक्षलवादी होण्यापासून बचावले. दुसऱ्या बाजूला त्यांनी अशी व्यवस्था केली होती की, प्रत्येक गाव आणि शहरातील लोक वामपंथ आणि बासु यांना जोडले जातील. अन्यथा आज बंगालची स्थिती छत्तीगढ प्रमाणेच झाली असती.