निसर्गाचे रुप किती अद्भूत असते. त्याचे रंग किती हे कधीच मोजमाप करता येणार नाही. निसर्गाच्या रुपालाही कधी विशिष्ट अशा चौकटीत बांधता येणार नाही, याचाच प्रत्यय नुकताच इराणमधील समुद्रकिना-यावर आला. इराणच्या एका समुद्रकिना-यावर अचानक रक्तरंजित पाऊस पडल्याचे दृश्य समोर आले. फारकाय समुद्राच्या लाटांचाही रंग बदलला. (Iran)
या लाटाही लालेलाल रंगाच्या दिसू लागल्या. हे दृश्य सुरुवातीला बघणा-यांना भीती वाटली. सर्वत्र रक्ताचा सडा पडला आहे, असेच हे दृश्य होते. काहींनी तर इराणवर मोठे संकट येणार असल्याची ओरड सुरु केली. मात्र काही पर्यटकांनी या निसर्गाच्या चमत्काराचा अनुभव घ्यायला सुरुवात केली, आणि त्यामागचे सत्यही जाणून घेतले. सोशल मिडियावर इराणच्या या रक्तरंजित समुद्रकिना-याचे फोटो व्हायरल होतांना या चमत्कारामागील वैज्ञानिक कारणही सांगण्यात आले आहे. तज्ञांच्या मते, हा ‘ब्लड रेन’ नावाच्या दुर्मिळ नैसर्गिक घटनेचा परिणाम आहे. गेली अनेक वर्ष जगभरातील अनेक समुद्रकिना-यावर अशापद्धतीची अद्भुत आणि रहस्यमय घटना झाली आहे. अगदी काही वर्षापूर्वी भारतामधील केरळ राज्याच्या समुद्रकिना-यावरही असाच रक्ताचा पाऊस पडल्याचीही माहिती आहे. (International News)
इराणमधील समुद्रकिनाऱ्यावरील रक्ताच्या लाटांचे फोटो व्हायरल झाले आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. कारण लाल रंगाच्या या लाटा आणि समुद्रकिना-यावरही असाच लाल रंग पसरल्यामुळे आधी येथे रक्ताचा सडाच पडला आहे की काय, अशी भीती व्यक्त झाली. मात्र नंतर हा निसर्गाच्या अनंत चमत्कारांपैकी हा एक चमत्कार असल्याची खात्री पटली. या विचित्र घटनेनं अनेकांना आश्चर्यचकित केलं आहे. इराणमध्ये हा रक्ताचा पाऊस पडला, त्या समुद्रकिना-याचे नावच होर्मुझ रेड बीच आहे. येथे बहुधा कायमच रक्ताच्या लाल रंगाचा मुसळधार पाऊस पडतो. हे रक्तासारखे लाल रंगाचे पाणी समुद्रात वेगाने वाहत जाते. यामुळे या होर्मुझ रेड बीचवरील लाटांचा रंगही लाल होतो. व्हिडिओमध्ये बघतांना सुरुवातीला यामुळे भीती वाटते. अनेकजण हे दृश्य बघून अनेक शंका व्यक्त करतात. मात्र ही घटना हवामान बदल आणि जमिनीमधील खनिज तत्वांमुळे होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. (Iran)
इराणच्या होर्मुझ समुद्रकिना-यावर अशीच रंगाची उधळण नेहमी होत असते. या समुद्रकिना-यावर अनेकवेळा लाटांचा आणि जमिनीचा रंग वेगळा दिसून येतो. त्यामुळे या समुद्रकिना-याला ‘इंद्रधनुष्य बेट’ असेही म्हणतात. या भागात लोकवस्ती फार कमी आहे. त्यामुळे या समुद्रकिना-याचे बदलणारे रंग फारसे टिपता येत नाहीत. मात्र अलिकडे सोशल मिडियाच्या माध्यमामुळे या होर्मुझ समुद्रकिना-याची माहिती मिळाल्यावर येथे पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या किना-याच्या बदलत्या रंगाचे वास्तव जगापुढे आले आहे. आता हा होर्मुझ समुद्रकिनारा लाल रंगाचा झाला आहे. या लाल रंगामागील शास्त्रीय कारण म्हणजे येथील मातीमध्ये असलेले लोह ऑक्साईडचे प्रमाण हे खूपच जास्त आहे. जेव्हा ही खनिजे समुद्राच्या पाण्यात मिसळतात, तेव्हा समुद्राच्या लाटांचा रंगही भडक लाल रंगाचा होऊन जातो. या भागात वस्तीही याच लाल रंगामुळे कमी आहे. येथील स्थानिक या घटनेला अशुभ मानतात. त्यांच्यामते हा प्रकार म्हणजे, रक्तवर्षा आहे. मात्र असा लाल रंग कायमही रहात नाही. (International News)
=============
हे देखील वाचा : Vanuatu : हा वानुआतु नावाचा देश नेमका आहे तरी कुठे..
Devendra Fadanvis : भोंग्यांचं राजकारण पुन्हा महाराष्ट्रात होणार ?
=============
कधी कधी येथे पडणा-या पावसाचा आणि समुद्राच्या लाटांचा रंग हा गुलाबी किंवा तपकिरी रंगाचीही होतो. या बदलणा-या रंगाचा अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यासही केला आहे. त्यांच्या मते, येथील समुद्राच्या पाण्यात लाल रंगाच्या शेवाळाची किंवा सूक्ष्मजंतूंची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे जंतूच आता पाण्याचा रंग बदलत आहेत. मात्र काही तज्ञांनी या सर्व घटनेचे खापर या भागात असलेल्या औद्योगिक क्षेत्रावर टाकले आहे. येथील कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी थेट समुद्रात सोडले जाते. अनेक वर्ष असे होत असल्यामुळे होर्मुझ समुद्रकिना-यावरील मातीचा रंगही लाल झाला आणि आणि या समुद्रकिना-यावर धडकणा-या लाटाही लाल रंगाच्या झाल्याचा आरोपही होत आहे. अर्थात या घटनेचा प्रत्येकजण आपल्या अभ्यासाप्रमाणे अर्थ लावत आहेत. स्थानिक या घटनेकडे अशुभ घटना म्हणून बघत असले तरी शास्त्रज्ञांच्या मते ही एक दुर्मिळ हवामानशास्त्रीय घटना आहे. यापूर्वीही जगभरात अशा घटना घडल्या आहेत. भारतात 2001 मध्ये केरळमध्ये लाल रंगाचा पाऊस पडला होता. तर स्पेन, श्रीलंका आणि सायबेरियामध्येही लाल रंगाचा पाऊस पडल्याची नोंद आहे. (Iran)
सई बने