International Lefthanders Day- १३ ऑगस्ट हा जगभरात डावखुऱ्यांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. सर्वाधिक प्रथम डावखुऱ्यांचा दिवस हा १३ ऑगस्ट १९९२ मध्ये साजरा करण्यात आला होता. तर डावखुऱ्यांचा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश असा की, डाव्या हाताने लिहिणाऱ्यांची ही अनोखी क्वालिटीचे सेलिब्रेशन करण्यासह त्याचे फायदे आणि नुकसानीबद्दल ही जागरुक करणे हे होते. पहिल्यांदाच डावखुऱ्यांचा दिवस हा १९७६ मध्ये Dean R Campbell यांनी साजरा केला होता. त्यानंतर तो जगभरात साजरा केला जाऊ लागला.
डावखुऱ्यांचा दिवस साजरा करण्यामागे आणखी काही उद्देष आहेत. त्यानुसार लोकांमध्ये जागृकता निर्माण करत उजव्या हाताने लिहिणारे हे डाव्या हाताने लिहिणाऱ्यांसारखेच असतात. आपले प्रत्येक काम ते अगदी सहज करतात. जसे उजव्या हाताने काम करणाऱ्या व्यक्ती करतात. तर जगातील एकूण लोकसंख्येपैकी ७-१० टक्के डावखुऱे लोक आहेत. तरीही डाव्या हाताने लिहिणाऱ्यांना काही वेळेस टीका ही केली जाते.
काही लोक डावखुरे का असतात?
काही संशोधकांचे असे मानणे आहे की, जेनेटिकच्या तुलनेत यामागे पर्यावरणाचा अधिक प्रभाव पडतो. त्यांचे असे म्हणणे आहे की, गर्भात पर्यावरणीय कारक (हार्मोनच्या संपर्कासहित) प्रभावित करु शकतात. त्यामुळेच मुलाचा डावा किंवा उजवा हात हा अधिक मजबूत असेल. खरंतर जी लोक डाव्या हाताने लिहितात किंवा काही काम करतात त्यांना सुद्धा समस्या येतात. जसे की, मशीन, कंप्युटरचा माउस, किबोर्ड सारख्या गोष्टी या उजव्या हाताच्या वापरानुसार तयार केली जातात. अशातच जी लोक डाव्या हाताने काम करतात त्यांच्यासाठी या गोष्टी वापरताना समस्या येऊ शकते.
हे देखील वाचा- .. म्हणून डॉक्टर ॲप्रन, तर वकील काळा कोट परिधान करतात
जगभरातील खास अशा डावखुऱ्या व्यक्ती
बराक ओबामा, बिल गेट्स, मार्क जुकरबर्ग, लेडी गागा, जुलिया राबर्ट्स, जुड़ी गारलँड, ओपरा विनफ्रे, हेलन केलर, लेविस केरोल, लियोनार्डो द विंसी, एरिस्टोल, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर.(International Lefthanders Day)
डावखुरे असण्यामागे काय आहे खासियत?
मुलींच्या तुलनेत मुलं ही अधिक डावखुरे असतात. त्यासाठी टेस्टोस्टरॉन हार्मोन जबाबदार असतात. ऐवढेच नव्हे तर काही तज्ञ लहान वयात डोक्याला लागलेली दुखापत सुद्धा यासाठी जबाबदार असल्याचे मानतात. संशोधनातून असे कळते की, डावखुऱ्या व्यक्तींमध्ये अल्सर आणि गाठी विकसित होण्याची जोखिम कमी असू शकते. ती लोक स्ट्रोकच्या धक्क्यापासून सुद्धा वेगाने बरे होऊ शकतात. अमेरिकन जर्नल ऑफ साइकोलॉजी मधील एका जुन्या लेखातून असे कळते की, डावखुऱ्या व्यक्ती या वेगळ्या विचारांच्या असू शकतात. खासकुन ते रचनात्मक विचारांमध्ये उजव्या हाताने काम करणाऱ्यांपेक्षा उत्तम असतात.