Home » शास्त्रज्ञांनी लावला शोध, पसरणाऱ्या रोगांवर डासच करणार उपचार!

शास्त्रज्ञांनी लावला शोध, पसरणाऱ्या रोगांवर डासच करणार उपचार!

0 comment
Share

भारतात दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यू-चिकुनगुनियासारख्या आजारांचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी लोकांना घरात पाणी साचू देऊ नका, स्वच्छतेकडे लक्ष द्या, मच्छरदाणी लावून झोपा, असे सल्ले दिले जातात. ही खबरदारी घेतल्यानंतरही पावसाळ्यात डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांनी रुग्णालये भरलेली असतात. अशा परिस्थितीत, आता शास्त्रज्ञांनी देशात डेंग्यू-चिकुनगुनियावर नियंत्रण मिळवण्यासाठी डासांचा नवा प्रकार विकसित केला आहे. (Special Mosquito)

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) वेक्टर कंट्रोल रिसर्च सेंटरने (VCRC) विशेष मादी डास विकसित केले आहेत. या मादी नर डासांसोबत मिळून अशा अळ्या तयार करतील, ज्या डेंग्यू आणि चिकुनगुनियाला संपवतील. कारण यामुळे त्यांच्या आत आजारांचे विषाणू राहणार नाहीत. (Special Mosquito) जर विषाणूच नसेल, तर त्यांच्या चाव्याद्वारे मानवांना संसर्ग होणार नाही. या डासांना एडिज इजिप्टी असे नाव देण्यात आले आहे. जगभरात डासांमुळे पसरणाऱ्या आजारामुळे जगभरात दरवर्षी सुमारे ४ लाख लोकांचा मृत्यू होतो. याचा सर्वाधिक फटका मुलांना बसतो. (Special Mosquito)

हे देखील वाचा: सकाळपासून संध्याकाळपर्यंत ८ तास ओरडत राहते ‘ही’ महिला, कमावते बक्कळ पैसे

व्हीसीआरसीच्या संचालिका डॉ.अश्विनी कुमार म्हणाल्या की, विकसित डास डेंग्यू आणि चिकुनगुनिया पसरवणाऱ्या डासांच्या प्रत्येक पेशीवर बसून आपले घर बनवतील आणि त्यानंतर हे डास हळूहळू डेंग्यूसारख्या विषाणूवर नियंत्रण ठेवतील. अश्विनी कुमार म्हणाल्या की, संशोधनात असे आढळून आले की, बॅक्टेरियाची लागण झाल्यावर डास डेंग्यू पसरवू शकत नाहीत. (Special Mosquito)

माहितीनुसार, २०१७ मध्ये ICMR आणि VCRC ने या तंत्रज्ञानावर काम करण्यास सुरुवात केली आहे. या संशोधनासाठी ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातून वोल्बॅचिया बॅक्टेरियाच्या दोन्ही प्रजातींची सुमारे १०,००० अंडी भारतात आणण्यात आली. शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर ही अंडी फोडल्याने एडिज इजिप्टी प्रजातीच्या डासांची लागणही करण्यात आली. असे संशोधन यापूर्वीही सुरू होते. चार वर्षे या संशोधनावर काम केल्यानंतर, ICMR आणि VCRC च्या संशोधकांनी त्यांचा अहवाल ICMR च्या तज्ज्ञ समितीला दिला आहे. त्याचबरोबर या प्रयोगाच्या व्यावहारिक वापरासाठी शासनाची मंजुरी मिळणे बाकी आहे. (Special Mosquito)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.