आफ्रिकेच्या केनिया रिफ्ट व्हॅलीमधील दरीची चर्चा सर्वत्र आहे. आफ्रिकन खंड दोन भागात विभागला जाणार आहे त्याची ही सुरुवात आहे, असे सांगितले जाते. पण फक्त आफ्रिका खंड नाही, तर भारत देशाचेही दोन तुकडे होणार आहेत, असे सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र भौगोलिक हालचालीवरुन ही अशक्यप्राय कल्पना सत्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय आणि युरेशियन प्लेट्सची टक्कर झाल्यावर काय होऊ शकतं, याबाबत तज्ञांचा अभ्यास सुरु आहे. याच तज्ञांच्या अभ्यासातून असे आढळून आले आहे की, भारतीय प्लेटचे काही भाग पृथ्वीच्या आत तुटत आहेत. ज्यामुळे ही प्लेट भविष्यात दोन भागात विभागली जाऊ शकते. आफ्रिकन खंडातही असेच बदल होत असून त्यावरुन भविष्यात आफ्रिका खंडाचे दोन भाग होण्याची शक्यता वर्तवण्य़ात आली आहे. तशीच शक्यता भारताबाबतही असून भारताचेही दोन तुकडे होणार असे तज्ञ सांगत आहेत.
युरेशियन आणि भारतीय प्लेट्सच्या टक्करी बाबत अभ्यास करणा-या संशोधकांनी धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या अभ्यासकांनी यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांनी हिमालयातील हालचालींचाही अभ्यास केला आहे. याच भागात भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्स हळूहळू एकमेकांवर आदळत आहेत. त्यामुळे भुकंपाचे प्रमाण वाढले आहे. 6 कोटी वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या भूगर्भीय टक्करमुळे उंच शिखरे निर्माण झाली आहेत. याच शिखरांचा अभ्यास भूगर्भशास्त्रज्ञ करीत आहेत. या अभ्यासातूनच भारतीय प्लेट तुटत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात ही सर्व प्रक्रिया अतिशय कमी वेगानं होत असली तरी प्रदीर्घ कालावधीनंतर भारत देशाचे तुकडे होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हजारो वर्षापूर्वी आफ्रिका खंड हा आशिया खंडाचा एक भाग होता. अशाच भूगर्भातील हालचालींमुळे आफ्रिका हा आशियापासून वेगळा झाला. त्याच काळात, भारतीय उपखंडाचा काही भाग आशियाशी जोडला गेला आहे. अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की भारतीय प्लेटचे काही भाग वेगळे होऊ शकतात. तिबेटी झऱ्यांमधून मिळालेल्या भूकंपीय लाटा आणि वायूच्या नमुन्यांमधून हे सिद्ध झाले आहे. अलिकडे झालेला तिबेट मधील भूकंप पाहता ही हालचाल वेगानं चालत असल्याचेही संशोधकांचे म्हणणे आहे.
एकेकाळी हिमालयाच्या निर्मितीला कारणीभूत असलेली भारतीय टेक्टोनिक प्लेट तुटल्यावर हिमालयाच्या उंचालाही त्याचा धोका होऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे. या संदर्भात संशोधकांचा असा विश्वास आहे की, गरम आवरणातील पदार्थ पृथक्करणामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढू शकतात. यासंदर्भात युट्रेक्ट विद्यापीठातील भूगतिशास्त्री डुवे व्हॅन डेन वेल्ट हे संशोधन करीत आहेत. त्यांचा विश्वास आहे की, भारतीय प्लेटची जाडी आणि रचना वेगवेगळी असल्याने तिला अनेक वेळा भेगा पडल्या आहेत. भूतानजवळील एका मोठ्या प्रदेशात याबाबत पुरावे सापडले आहेत. या भागात आवरणाचे खडक रिकाम्या जागेत वाहून जात आहेत. संशोधक आता प्लेट फुटल्याने या प्रदेशात भूकंप कसे आणि किती मोठे होऊ शकतात याचा शोध घेत आहेत. हा प्रदेश भूकंप प्रवण झाला तर या भागातील मानवी अस्तित्वाला धोका निर्माण होणार आहे.
=============
हे देखील वाचा : Mahakhumbh 2025 : गंगा नदी लुप्त होणार !
America : बराक आणि मिशेल ओबामांच्या नात्यात आलाय दुरावा !
=============
असेच जर या प्रदेशात वारंवार झाले तर, भूगर्भातील खडक बाहेर पडू शकतात आणि गरम आवरणातील पदार्थ या रिकाम्या जागा भरू शकतात. उट्रेक्ट विद्यापीठातील शास्त्रज्ञ डोवे व्हॅन यांच्या मते, अशा बदलांमुळे भूकंपाचा धोका वाढू शकतो. यामुळे या भागातील धरणांनाही मोठा धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या सर्वांबाबत अधिक संशोधन होण्याची गरज आहे. भविष्यात तिबेट, भूतान भागातील भूकंप वाढण्याची शक्यता आहे. या भूकंपाची माहिती या अभ्यासातून अधिक लवकर आणि अचून मिळेल, याबाबत संशोधक प्रयत्न करीत आहेत. या सर्व घटनांसाठी अफ्रिका खंडामध्ये पडत असलेल्या भल्या मोठ्या दरीचे उदाहरण देण्यात येत आहे. पूर्व आफ्रिकन रिफ्ट व्हॅली उत्तरेकडील एडनच्या आखातापासून दक्षिणेस झिम्बाब्वेपर्यंत 3,000 किलोमीटरपेक्षा जास्त पसरलेली ही दरी आहे.
सई बने