Home » जेव्हा देशातील पहिल्या वृत्तपत्राने इंग्रजांच्या हुकूमशाहीला हादरवले होते…

जेव्हा देशातील पहिल्या वृत्तपत्राने इंग्रजांच्या हुकूमशाहीला हादरवले होते…

by Team Gajawaja
0 comment
India First News Paper
Share

देशावर ईस्ट इंडिया कंपनीचे शासन होते. याच दरम्यान क्रांतीकाराला सुरुवात झाली. अशी सुरुवात ज्यांनी ब्रिटिश हुकूमशाहीला हादरवरुन सोडले. कारण ‘द बंगाल गजट’ मुळे हे शक्य झाले आणि १७८० मध्ये आयरिश मॅन जेम्स ऑगस्टस हिक्की यांनी याची सुरुवात केली होती. हे एक साप्ताहिक वृत्तपत्र होते आणि ते इंग्रजीत प्रकाशित केले जात होते.(India First News Paper)

इतिसाहासात याला हिक्की गजट आणि द कलकत्ता जनरल अॅडवरटाइजरच्या रुपात ओळखले जाते. जेव्हापासून याचे प्रकाशन सुरु झाले तेव्हापासून बंगाल गजट क्रांतिकारी बदल ठरले. या वृत्तपत्राने केवळ ब्रिटिश हुकूमत नव्हे तर ईस्ट इंडिया कंपनीच्या उच्च पदांवर बसलेल्या लोकांना सुद्धा हादरवुन टाकले होते. गवर्नर हेस्टिंग्सला सुद्धा महाभियोग सहन करावे लागले, पण ब्रिटिश हुकूमतने त्यांचा आवाज दाबला. प्रकाशन सुरु झाल्याच्या १२ वर्षानंतर आजच्या दिवशी बंगाल गजटवर बंदी घालण्यात आली होती.

बंगाल गजटने ईस्ट इंडिया कंपनीच्या उच्च पदांवर बसलेल्या लोकांना भ्रष्टाचार, लाच घेणे आणि ह्युमन राइट्सचे उल्लंघन केल्याची प्रकरणे उघडकीस आणली होती. हा तो काळ होता जेव्हा भारतात गर्वनर जनरल वारेन हेस्टिंग होते. वृत्तपत्राच्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गर्वनर जनरल यांनी भारताचे चीफ जस्टिस यांना लाच दिली होती.

ब्रिटिश भारताचे गर्वनर यांना थेट आव्हान देणे कंपनीला पटले नाही. बंगाल गजटचे प्रकाशन करणाऱ्या हिक्कीवर कायदेशीर निशाणे साधण्यास सुरुवात झाली. तर दुसऱ्या बाजूला वारेन हेस्टिंग्स यांनी सुद्धा वृत्तपत्रावर मानहानिचा खटला दाखल केला. अखेर हिक्कीला दोषी ठरवत तुरुंगात पाठवण्यात आले. हिक्की तुरुंगात तर गेले पण त्यांचा आत्मविश्वास मोडला नाही. नऊ महिने तुरुंगात राहून ते वृत्तपत्र काढत होते.(India First News Paper)

हिक्की यांचा आत्मविश्वास अधिक प्रबळ होतोय हे पाहून इंग्रजांना अत्यंत राग येत होता. अखेर सु्प्रीम कोर्टाने एके दिवशी हिक्की यांची प्रिटिंग प्रेस बंद करण्याचा आदेश दिला आणि बंगाल गजटवर बंदी घातली. १७८२ मध्ये आजच्याच दिवशी बंगाल गजटवर बंदी घातली गेली. त्यानंतर सरकारने प्रिटिंग प्रेस मधील मशीन्सचा लिलाव केला. त्या इंडियन गजट यांनी खरेदी केल्या.

हे देखील वाचा- जगातला तिसरा मोठा रोपवे आता काशी नगरीमध्ये

ब्रिटिश भारताचे गवर्नर हेस्टिंग यांनी आपल्या ताकदीच्या आधारावर बंगाल गजट तर बंद केले. पण बंगाल गजटने आता पर्यंत आपल्या आरोपांना सिद्ध करण्यासाठी पुरावे जमा करुन ठेवले होते आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून ते प्रकाशित करण्यात आले होते. याबद्दलची माहिती जेव्हा ब्रिटिशांपर्यंत पोहचली तेव्हा हेस्टिंग्स आणि सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस यांची चौकशी केली गेली.आरोप सिद्ध झाल्यानंतर दोघांवर महाभियोगाचा खटला सुरु झाला पण तो पर्यंत बंगाल गजट हे एक इतिहास बनले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.