देशात प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिवस हा १५ ऑगस्टला साजरा केला जातो. तर १९४७ मध्ये भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले होते. परंतु आपल्याला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळाले तेव्हा मध्यरात्र झाली होती. तर आपण प्रत्येक वर्षी १५ ऑगस्टलाच का भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो? नक्की काय कारण होते ही तारीख निवडण्याचे? जाणून घेऊयात याच संदर्भात अधिक सविस्तरपणे.(Independence Day)
खऱंतर १९३० ते १९४७ पर्यंत २६ जानेवारी हा भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात होता. याचा निर्णय १९२९ मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात झाला होता, जे लाहौरमध्ये झाला होता. या अधिवेशनात भारताने पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर सविनय अवज्ञा आंदोलनासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस द्वारे भारतातील नागरिकांना निवेदन करण्यात आलेच आणि त्याचसोबत भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्यतेपर्यंत आदेशांचे पालन वेळोवेळी करण्यास ही सांगितले गेले. त्यावेळी भारतात लॉर्ड माउंटबेटन यांचे शासन होते.
माउंटबेटन यांनी खासगी रुपात भारताच्या स्वातंत्र्यासाठी १५ ऑगस्टचा दिवस ठरवला होता. असे सांगितले जाते की, ते या दिनाला आपल्या कार्यकाळातील अतिशय सौभाग्यशाली मानत होते. यामागे आणखी दुसरे कारण असे की, दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान १९४५ मध्ये १५ ऑगस्टच्याच दिवशी जापानाच्या सेनेने ब्रिटेनच्या समोर त्यांच्या नेतृत्वाखाली आत्मसमर्पम केले होते. माउंटबेन त्यावेळी देशातील सर्व सेनांचे कमांडर होते. लॉर्ड माउंटबेटन यांच्या नेतृत्वाखाली ३ जून च्या दिवशी स्वतंत्रता आणि विभाजनाच्या संदर्भात झालेल्या बैठकीतच हे ठरवण्यात आले होते.(Independence Day)
३ जूनच्या प्लॅनमध्ये जेव्हा स्वातंत्र्याचा दिवस ठरवण्यात आला तो सार्वजनिक रुपात घोषित करण्यात आला. पण त्यावेळेला देशभरातील ज्योतिषांनी आक्रोश व्यक्त करत त्यांनी म्हटले की, ज्योतिषीय गणनेनुसार १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस अशुभ आणि अमंगलकारी होता. ऑप्शनच्या आधारावर दुसऱ्या तारखा सुद्धा सुचवण्यात आल्या. परंतु माउंटबेटन हे १५ ऑगस्टच्या तारखेवरच अडून राहिले. कारण त्यांच्यासाठी ही खास तारीख होते. अखेर समस्येवर तोडगा काढत ज्योतिष्यांनी सुद्धा सुवर्णमध्ये काढला.
हे देखील वाचा- तब्बल ९० वर्ष भारतावर राणी व्हिक्टोरियाने ठेवले होते आपले वर्चस्व
त्यानंतर १४ किंवा १५ ऑगस्टच्या मध्यरात्रीचा वेळ सुचवला आणि त्यामागे इंग्रजांच्या वेळेचा सुद्धा हवाला दिला गेला. इंग्रजांच्या परंपरेनुसार रात्री १२ वाजल्यानंतर नवा दिवस सुरु होते. तर हिंदी गणनेनुसार नव्या दिवसाची सुरुवात ही सूर्योदयाने होते. ज्योतिष या गोष्टीवर अडून राहिले की, सत्तेच्या परिवर्तनाचे संभाषण ४८ मिनिटांच्या कालावधीत केला जावा, जो अभिजीत मुहूर्तामध्ये येतो. हा मुहूर्त ११ वाजून ५१ मिनिटांनी सुरु होऊन १२ वाजून २४ मिनिटांपर्यंतचाच होता. हे भाषण १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत दिले जाणार होते. या ठरवलेल्या वेळेतच जवाहरलाल नेहरु यांना भाषण द्यायचे होते.
सुरुवातीच्या आधारावर ब्रिटेन द्वारे भारताला जून १९४८ पर्यंत सत्ता हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव होता. फेब्रुवारी १९४७ मध्ये सत्ता मिळाल्यानंतर लॉर्ड माउंटबेटन यांनी भारतीय नेत्यांसोबत सर्वसामान्य सहमती मिळवण्यासाठी लगेच साखळी स्वरुपात बातचीत करणे सुरु केले. परंतु हे सर्व सोप्पे नव्हते. खासकरुन जेव्हा विभाजच्या मुद्द्यावर जिन्ना आणि नेहरुंमध्ये वाद निर्माण झाला होता. एक वेगळा राष्ट्र बनवण्यासाठी जिन्ना यांच्या मागणीने मोठ्या स्तरावर संपूर्ण भारतात सांप्रदायिक दंगे झाले आणि प्रत्येक स्थिती ही हाताबाहेर होत गेली. या दिवसाची अपेक्षा माउंटबेटन यांनी केली नव्हती. त्यामुळे माउंटबेटन यांनी ठरविले की, ते भारताचा स्वातंत्र्य दिन १९४७ ते १९४८ पर्यंत पूर्ववत करतील.(Independence Day)
दरम्यान, १९४५ मध्ये दुसरे महायुद्ध संपण्याच्या वेळेस ब्रिटिश आर्थिक रुपात कमकुवत झाला होता आणि ते इंग्लंडमध्ये स्वत:चे शासन चालवण्यासाठी संघर्ष करत होते. असे ही म्हटले जाते की, ब्रिटिश सत्ता जवळजवळ दिवाळखोर होण्याच्या मार्गावर होती. महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या हालचालींचा यामध्ये फार मोलाचा वाटा होता. १९४० च्या सुरुवातीला गांधी आणि बोस यांच्या हालचालींमुळे जनता आंदोलनसाठी आक्रमक झाली होती आणि दशकाच्या अखेरीस ब्रिटीश हुकूमतसाठी हा एक चिंतेचा विषय बनला होता.