Home » ‘या’ शहरात तब्बल ६६ दिवस उगवत नाही सूर्य, पण कसं काय?

‘या’ शहरात तब्बल ६६ दिवस उगवत नाही सूर्य, पण कसं काय?

0 comment
Share

जगात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी स्वतःमध्येच खूप विचित्र आहेत. त्यापैकी एक ठिकाण अमेरिकेतही आहे. अमेरिकेतील अलास्का जगभर आपल्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथील विलोभनीय दृश्ये कोणाचेही मन मोहून टाकतात. पण याठिकाणी एक शहर असेही आहे, जिथे हिवाळ्यात दोन महिने सूर्य दिसत नाही. या शहराचे नाव बॅरो आहे, जे उत्कियाग्विक म्हणून ओळखले जाते. या शहरात १८ नोव्हेंबरला सूर्यास्त होतो आणि त्यानंतर थेट पुढच्या वर्षी २३ जानेवारीलाच सूर्याचं दर्शन होऊ शकतं. (Polar Nights in Alaska)

म्हणजेच संपूर्ण ६६ दिवस येथे गडद अंधार होतो, जसा रात्री असतो तसाच. दिवसा काही तास प्रकाश असतो, पण लोकांना सूर्य दिसत नाही. निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी सूर्यदर्शनासाठी लोकांना दोन महिन्यांहून अधिक काळ वाट पाहावी लागते, जे खरोखरच मनोरंजक आहे. या शहरातील लोक या घटनेला ‘डेज ऑफ डार्कनेस’ असे म्हणतात. पण हे सगळं कसं घडतं माहीत आहे का? यामागचे कारण काय आहे, हे जाणून घेऊया. (Polar Nights in Alaska)

हे देखील वाचा: ‘Haunted’ मानला जातो सुरतचा ‘हा’ बीच, विकिपीडियावरही केला गेलाय भयावह उल्लेख!

खरं तर, उत्तर ध्रुवाकडे जाताना हिवाळ्यात काही ठिकाणी दिवस इतके लहान असतात की तेथे प्रकाश नसतो. आर्क्टिकमध्ये पडणाऱ्या उत्क्यागाविकमध्येही हीच परिस्थिती असते. हे शहर उत्तर ध्रुवापासून २ हजार ९२ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. आर्क्टिक सर्कल उत्तर ध्रुवावर आहे आणि अंटार्क्टिक सर्कल दक्षिण ध्रुवावर आहे. उत्क्याग्विक शहर आर्क्टिक सर्कलच्या उंचीवर आहे. आर्क्टिक सर्कलच्या उंचीमुळे येथे सूर्य क्षितिजाच्या वर जाऊ शकत नाही. म्हणून त्याला ‘पोलार नाईट्स’ असेही म्हणतात. (Polar Nights in Alaska)

म्हणजेच, शहर किंवा देश उत्तर ध्रुवाच्या जितके जवळ असेल तितके रात्र किंवा दिवस जास्त असतील. यावेळी पृथ्वी आपल्या अक्षावर तिरकी उभी असते. यामुळे सूर्यप्रकाश तिच्या दोन्ही ध्रुवांवर म्हणजेच उत्तर आणि दक्षिण ध्रुवांवर एकाच वेळी पडत नाही. यामुळेच उत्तरेला दिवस असेल तर दक्षिण ध्रुवावर रात्र असते. उत्कियाग्विक शहराची लोकसंख्या सुमारे ४ हजार आहे. उत्कियाग्विक भागातील लोकांना ध्रुवीय रात्री कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतो. (Polar Nights in Alaska)

हे देखील वाचा: मुंबईमध्ये आहेत काही भीतीदायक ठिकाणं; ‘हे’ ठिकाण वाचाल तर थक्क व्हाल

नोव्हेंबर ते जानेवारी या काळात येथील तापमान खूपच कमी राहते. काहीवेळा येथील तापमान मायनस १० ते २० अंशांपर्यंत खाली येते. एवढेच नाही, तर दोन महिन्यांच्या अंधारात शहराचे सरासरी तापमान मायनस ५ अंशांच्या खाली आहे. उत्कियाग्विक शहरातील लोकांना ध्रुवीय रात्रीची सवय आहे आणि ते ती साजरी देखील करतात. यामुळेच सूर्यास्ताच्या दिवशी लोक उत्सव साजरा करतात आणि त्यानंतर सूर्योदयाच्या दिवशी लोकांमध्ये आनंदाचे वातावरण असते. (Polar Nights in Alaska)

मात्र, सूर्योदयाशी संबंधित अशी घटना केवळ अमेरिकेतच घडते असे नाही. तर अलास्का व्यतिरिक्त रशिया, स्वीडन, फिनलंड, ग्रीस आणि कॅनडाच्या काही शहरांमध्येही अशी घटना घडते. कॅनडातील ग्रीस फियोर्डमध्ये तब्बल १०० दिवस अंधाराची परिस्थिती असते. (Polar Nights in Alaska)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.