झोपेचे आणि आपल्या आरोग्याचे घनिष्ठ नाते आहे. त्यातही पुरेशी आणि योग्य वेळेत झोप न घेतल्यास त्याचा डोळ्यांवर अतिशय घातक परिणाम होतो. रात्री पूर्ण झोप झाली नसल्यास, दिवसा अतिरिक्त झोप घेतल्यास आणि झोपेत घोरल्यास काचबिंदू होण्याचा धोका(Risk of glaucoma) असतो. यासंदर्भात लंडनच्या नेत्रतज्ञांनी तब्बल अकरा वर्ष संशोधन केले. त्यात सुमारे 8690 लोकांमध्ये काचबिंदू आढळून आला. हा काचबिंदूचा धोका(Risk of glaucoma) एवढा गंभीर आहे की, 2040 पर्यंत जगातील 112 दशलक्ष लोक यामुळे प्रभावित होऊ शकतात. काचबिंदूचा डोळ्यांना मेंदूशी जोडणाऱ्या ऑप्टिक नर्व्हवर खूप परिणाम होतो. डोळ्याच्या नेत्रगोलातील दाब वाढल्याने डोळ्याच्या ऑप्टिक नर्व्ह म्हणजे डोळ्यापासून मेंदूला जोडणाऱ्या मुख्य मज्जातंतूला हानी पोहोचते. त्यामुळे व्यक्तीची दृष्टी अधू होऊ लागते. डोळ्यांच्या अशा परिस्थितीला काचबिंदू म्हणतात.

झोपेचा आणि डोळ्यांच्या आरोग्याचा जवळचा संबंध आहे. रात्री पुरेशी झोप न लागणे, दिवसा झोप लागणे आणि घोरणे याचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. अशीच दिनचर्या काही वर्ष राहिल्यास काचबिंदू होण्याचा धोका (Risk of glaucoma)वाढतो. यावर वेळेवर उपचार न केल्यास अंधत्व येण्याचा धोकाही वाढतो. लंडनस्थित बायोबँकने केलेल्या या अभ्यासात हा धोका आढळून आला आहे. 11 वर्षे चाललेल्या या संशोधनात सुमारे 8690 लोकांमध्ये काचबिंदू आढळून आले. काचबिंदू झालेल्या व्यक्तीमध्ये डोळ्याच्या बाहुलीत काचेसारखी लकाकी दिसते. म्हणून त्याला काचबिंदू असं म्हणतात. ज्यांना मधुमेह आहे, त्यांना काचबिंदू होण्याची जास्त शक्यता (Risk of glaucoma)असते. त्यामुळेच ज्यांना मधुमेह आहे, आणि ज्यांची झोप अनियमीत आहे, त्यांना ठराविक महिन्यांनी डोळ्यांची तपासणी करण्याचा सल्ला देण्यात येतो. काचबिंदू झालेल्यांची दृष्टी धुरकट होते आणि प्रतिमेच्या कडेला अंधार दिसतो. तसेच समोरचे बघताना कडेचे काहीही दिसत नाही. काचबिंदू ज्यांना होतो, त्याचे डोळेही वारंवार दुखतात. तसेच तीव्र डोकेदुखीचा त्रासही होतो. काचबिंदूवर संशोधन करण्या-या लंडनच्या नेत्र तज्ञांने सांगितले की, पुरेशी झोप न मिळाल्यास हा त्रास कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. पन्नाशी पार केलेल्या पुरुषांमध्ये काचबिंदुचे प्रमाण अधिक (Risk of glaucoma)आढळते. धूम्रपान करणाऱ्यांमध्येही काचबिंदुचे प्रमाण चिंताजनक वाढले आहे. लंडन येथील बीएमजे ओपन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार नेत्र तज्ञांनी 4,00,000 हून अधिक लोकांच्या माहितीचे मूल्यांकन केले होते. त्यांच्या सर्व बारीकसारीक सवयींचीही नोंद करण्यात आली. तसेच जेवणाच्या पद्धतीचीही नोंद करण्यात आली. त्यामुळेच यातून निघालेल्या निष्कर्षावर चिंता व्यक्त झालीय.
या अभ्यासात 40 ते 69 वयोगटातील नागरिकांचा समावेश करण्यात आला होता. या सर्वांकडून त्यांच्या झोपेच्या सवयींबद्दल माहिती गोळा करण्यात आली. 2010 ते 2021 पर्यंत चाललेल्या अभ्यासादरम्यान, काचबिंदूची 8,690 प्रकरणे अभ्यासली गेली. डेटाच्या आधारे, संशोधकांना असे आढळले की, घोरणे आणि दिवसा अतिरिक्त झोप घेतल्यामुळे काचबिंदुचा धोका 11% वाढतो. त्यामानाने रात्री निवांतपणे 6 ते 7 झोप काढणा-यांमध्ये काचबिंदुचे प्रमाण अगदी नगण्य आहे. ज्यांना निद्रानाशचा त्रास जाणवतो त्यांच्यामध्ये काचबिंदूचे प्रमाण 13% पर्यंत आहे. या सर्व अभ्यासातूनच, 2040 पर्यंत जगभरात 112 दशलक्ष लोक काचबिंदूने प्रभावित होऊ(Risk of glaucoma) शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.
============
हे देखील वाचा : तुम्हाला सुद्धा नखं खाण्याची सवय आहे? वेळीच लक्ष द्या अन्यथा…
============
याशिवाय अपूर्ण झोपेमुळे काचबिंदू होण्याचा धोका वाढत असला तरी अन्य परिणामांनाही सामना करावा लागतो. पुरशी झोप न मिळाल्यास चिडचिड वाढते. काहींना त्यामुळे पित्ताचाही त्रास होतो. पित्ताचा त्रास झाल्यासही त्याचा डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच ज्यांना निद्रानाशाचा त्रास असतो, त्यांच्या स्मरणशक्तीवरही परिणाम होतो. काचबिंदू झाल्यास डोळ्यातील संवेदनशील पेशी खराब होऊ लागतात. वेळेवर उपचार न केल्यास डोळ्यांची दृष्टी कायमची निघून जाते. या सर्वांवर एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे पुरेशी झोप. रात्री 6 ते 7 तास झोप झाल्यास दिवसाही झोप घ्यावी लागत नाही. या पुरेशा झोपेमुळे डोळ्यांना आवश्यक असा आराम मिळतो, आणि संभाव्य रोगांना नक्कीच दूर सारता येते.
सई बने