Home » सकाळी ‘हा’ नाष्टा करत असाल तर वेळीच बंद करा…

सकाळी ‘हा’ नाष्टा करत असाल तर वेळीच बंद करा…

by Team Gajawaja
0 comment
Breakfast
Share

जगभरातल्या बहुतांश घरामध्ये सकाळचा नाष्टा (Breakfast) काय होत असेल तर उत्तर एकच आहे, ते म्हणजे, ब्रेड आम्लेट….अगदी जगाच्या कुठल्याही कोप-यात गेल्यावर नाष्ट्यासाठी ब्रेड आम्लेट हे उत्तर मिळते. पण सकाळच्या वेळी होणारा हा नाष्टा (Breakfast) म्हणजे आपल्या शरीरात कॅलरीजचे प्रणाम मर्यादेबाहेर वाढवण्याचे साधन असल्याचे आता स्पष्ट होत आहे.  

सकाळचा होणारा हा आम्लेट ब्रेडचा नाष्टा (Breakfast) शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढवत आहे. यासंदर्भात अमेरिकेतील एका संशोधन संस्थेनं आपला अहवाल प्रकाशित केला आहे. त्यातून सकाळचा आम्लेट ब्रेड नाष्टा करणा-या नागरिकांच्या शरीरात कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अहवाल प्रसिद्ध करणा-या USDA च्या मते, अंडी आणि ब्रेड या दोन्हीमध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. जवळपास 250 ते 350 कॅलरीज यातून शरीरात जातात. सकाळी हे पदार्थ खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते आणि लवकर भूक लागण्याची समस्या येत नाही, म्हणजेच हे खाल्ल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहू शकते. अंडी-ब्रेडमध्ये प्रथिनेही मुबलक प्रमाणात आढळतात, त्यामुळे स्नायू बळकट होतात. पण यापलिकडे यापासून होणा-या तोट्यांचे प्रमाण अधिक आहे. नियमित आम्लेट ब्रेड खाणारे, किंवा ब्रेडसोबत उकडलेले अंड जे खातात, त्यांच्या वजनात वाढ होते. ब्रेडमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात पण फायबरचे प्रमाण कमी असते. त्यामुळे ब्रेड आणि अंडी यामुळे काहींना अॅसिडिटीचाही त्रास जाणवतो. तसेच पोटाच्या समस्या होतात. काहींना ठराविक काळानं पोटदुखी जाणवते. मात्र हा त्रास सकाळच्या नाष्ट्यामुळे होत आहे, हे लक्षात येत नाही. (Breakfast)  

यासाठी यासंदर्भात संशोधन केलेल्या संस्थेनं काही पर्याय सुचवले आहेत. बहुतांशी आम्लेट ब्रेड किंवा नाष्ट्यामध्ये नियमित अंडी वापरतात ती मंडळी घरापासून दूर राहत असतात. त्यांच्यासाठी हा नाष्टा (Breakfast) करणे अतिशय सोपे असते. पण अशावेळी काही काळजी घेतली तर आरोग्यासही फायदा होऊ शकतो. त्यासाठी जो ब्रेड वापरला जातो, तो पूर्णपणे ताजा आहे, हे आधी तपासून बघितले पाहिजे. शिवाय मैद्याचा ब्रेड शक्यतो टाळावा. मैद्याऐवजी धान्यापासून बनवलेला ब्रेड वापरावा. शक्यतो मिक्स धान्यापासून बनवलेला ब्रेड मिळाल्यास त्याचा अधिक फायदा होतो.  होल ग्रेन ब्रेड बाजारात उपलब्ध असतो. अशा ब्रेडमुळे वजन नियंत्रणात राहते. याशिवाय मधुमेहाचे रुग्णही याचे सेवन करू शकतात. ब्रेड कुठलाही असला तरी त्याच्या दोन  किंवा तीन स्लाईल खाव्यात. तसेच अंडीही दोनच्या वर खाऊ नयेत अशा सूचना अहवालात दिल्या गेल्या आहेत. याशिवाय अंड्यामध्ये प्रोटीन माफक प्रमाणात असते. त्याचा शक्यतो पिवळा भाग खाऊ नये. त्यामुळे वजनावर नियंत्रण राहते. या नाष्ट्याच्या प्रकारात अतिरिक्त बटरचाही वापर होतो. ब-याचवेळा बटर लावून ब्रेड भाजला जातो. अशाप्रकारे बटर खाल्यास त्यामुळे रक्तातील कोलॉस्ट्रोल वाढण्यास मदत होते, तसेच वजनही वाढते. त्यामुळे मर्यादित प्रमाणात बटर ब्रेडला लावावे, पण ते लावल्यावर ब्रेड भाजू नये.  

=======

हे देखील वाचा : ब्राझील नट्स करू शकतात थायरॉइडवर मात

======

ब्रेड आणि अंडे सकाळी नाष्टा (Breakfast) म्हणून घेतांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अंड्याच्या पांढर्‍यामध्ये भरपूर प्रथिने असतात, परंतु त्याचा पांढरा भाग रिकाम्या पोटी खाल्ल्याने आजारांना आमंत्रण मिळते. अंड्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पण  अंड्याचा पांढरा भाग कमी कॅलरीचा असतो. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांना फायदा होतो.अंड्याचा पांढरा भाग हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात अमिनो अॅसिड मिळते. पण सकाळी हे अंडे खातांना काळजी घेणेच अधिक महत्त्वाचे असते. अंड्याचा पांढरा जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरावर ऍलर्जी येऊ शकते. अंडे खातांना ते चांगल्याप्रकारे शिजले आहे की नाही, याची काळजी घेणे गरजेचे असते. कच्चे अंडे खाल्यास त्याचाही त्रास होण्याची शक्यता असते. तसेच त्यामुळे पचनासंबंधी तक्रार होऊ शकतात.  अनेकवेळा भाजलेल्या ब्रेडवर कच्चे अंडे आणि त्यासोबत कच्चे कांदे, टोमॅटो खाल्ले जातात. या सर्वांवर दूध पिण्याची सवय अनेकांना असते.  हा नाष्टा (Breakfast) जरी चांगला असला तरी त्याचा पोट्याच्या पचनशक्तीवर परिणाम होतो. कारण हे सर्व विरुद्ध पदार्थ आहेत. त्यांचे पचन करण्यासाठी वेळ लागतो. परिणामी शरीरात काहीवेळा स्नायू दुखीची तक्रार जाणवू शकते. एकूण आपण काय आहार घेतो, हे महत्त्वाचे आहे आणि दिवसाची सुरुवात करताना आपला नाष्टा किती आरोग्यदायी आहे, हे सर्वात महत्त्वाचे आहे. 

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.