चंद्रावर आता आपला बेस बनण्यासह अन्य काही मोठ्या अभियानांसाठी व्यक्तीला पाठवण्याच्या दिशेने नासाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. यामधील पहिला प्रयत्न म्हणजेच नासाचे नुकतेच आर्टिमिस अभियान. याचे यशस्वीपणे प्रक्षेपण नुकतेच झाले आहे. आता ओरियॉन आंतराळ यान चंद्राच्या विशेष कक्षेच्या दिशेने पुढे जात आहे. हे अभियान नासाचे महत्वकांक्षी अभियानाचा पहिला टप्पा असून ज्याच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात नासा चंद्रावर पहिली महिला आणि पहिला गैरश्वेत पुरुष पाठवणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून चंद्रावर दीर्घकाळापर्यंत मानवाची उपस्थिती सुनिश्चित केली जाणार आहे. नासाच्या मोठ्या अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, २०३० पर्यंत व्यक्ती चंद्रावर राहण्यासह काम ही करु शकतात.(Humans working on Moon)
८ वर्षात राहणार लोक
या अभियानाबद्दल नासाने ओरियॉन स्पेसक्राफ्ट प्रोग्रामचे प्रमुख हॉवर्ड हू यांनी असे म्हटले की, २०३० पूर्वीच व्यक्ती चंद्रावर दीर्घकाळासाठी राहण्यास जाऊ शकतात आणि याचा अर्थ केवळ असा नव्हे की, चंद्रावर व्यक्तींना राहण्यायोग्य ठिकाण बनेल तर त्याचसोबत त्यांची साथ देण्यासाठी बहुतांश रोवर सुद्धा काम करु लागतील.
चंद्राची परिक्रमा करुन परतणार ओरियॉन
ओरियॉनचे प्रमुख मॅनेजर हू हे नासाच्या ऑरियॉनचे डिझाइन, विकास उत्पादन आणि ऑपरेशन्ससाठी जबाबदार आहेत.सध्या ओरियॉनचा कोणत्याही क्रू शिवाय चंद्रावर पाठवण्यासंदर्भात चाचणी केली जात आहे. ज्यामध्ये तो चंद्राची परिक्रमा करुन पुन्हा परतणार आहे. हू यांनी बीबीसी यांना असे सांगितले की, निश्चित रुपात जगातील या दशकात लोकांना दीर्घकाळासाठी चंद्रावर राहताना पाहिले जाईल.
रोवर करणार मदत
हू यांनी असे म्हटले की, २०३० पूर्वी येथे जाणाऱ्या वैज्ञानिकांसह कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी जागा तयार करण्यात आलेली असेल. त्यांच्याकडे फिरण्यासाठी रोवर असतील. तसेच खुप रोवर त्यांच्या कार्यात मदत करताना ही दिसतील. ते लोकांच्यासोबत राहण्यासह खुप वैज्ञानिक प्रयोग आणि कार्य ही करतील.
हे देखील वाचा- नासा जपान मधील कंपनीकडून खरेदी करणार चंद्रावरील माती
दीर्घकालीन अभियानाच्या दिशेने पहिले पाऊल
ओरियॉन गेल्या आठवड्यातच पहिल्यांदा नासाच्या स्पेस लॉन्च सिस्टिमच्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात आले होते. आपल्या अभियानाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत ओरियॉनने चंद्राचा अर्धा प्रवास केला होता. हार्वड या अभियानाला दीर्घ आणि सखोल आंतराळ अभियानातील पहिले पाऊल असल्याचे मानतात. त्यांचे असे म्हणणे आहे की, हा केवळ अमेरिकेसाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी ऐतिहासिक दिवस आहे.(Humans working on Moon)
वारंवार लोकांना पाठवणार
हार्वर्ड यांनी असे म्हटले की, आपण चंद्रावर पुन्हा जात आहोत. आपण तेथे शाश्वत कार्यक्रमांसाठी काम करत आहोत आणि हे यान लोकांना तेथे घेऊन जाणार आहे. जेणेकरुन वारंवार तेथे लोकांना पाठवले जाऊ शकते. हे अभियान नासा आणि त्यांच्या करारदात्यांना तंत्रज्ञान आणि उत्पादकांचे परिक्षण करण्याची सवय लावण्यास मदत करणार आहे.