स्वीट कॉर्न (sweet corn) लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. पिझ्झा टॉपिंग्सपासून ते सँडविचपर्यंत आणि पास्तामध्येही स्वीट कॉर्न घातले जातात. दुसरीकडे, मुले मसालेदार आणि चीजी स्वीट कॉर्नचे वेडे असतात. जर तुमच्या घरातील प्रत्येकाला स्वीट कॉर्न खूप आवडत असेल, तर ही कॉर्नची भाजी एकदा करून पहा. देशी स्टाईलमध्ये बनवलेल्या या भाजीची चव मोठ्यांपासून ते मुलांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल. चला तर मग जाणून घेऊया की, स्वीट कॉर्न भाजी कशी बनवायची. ही भाजी बनवण्यासाठी तुम्ही फ्रोझन स्वीट कॉर्न (sweet corn) वापरले, तर उत्तमच! कारण फ्रोझन स्वीट कॉर्न लवकर शिजते.
स्वीट कॉर्नची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
स्वीट कॉर्नची भाजी बनवण्यासाठी तुम्हाला २५० ग्रॅम स्वीट कॉर्न (sweet corn), एक शिमला मिरची, दोन कांदे, दोन टोमॅटो, हिरवी मिरची, ताजी मलई साधारण अर्धी वाटी, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, एक चमचा भाजीपाला मसाला, एक चमचा कस्तुरी मेथी, बारीक चिरलेला आल्याचा एक इंच तुकडा, गाजर, अर्धा चमचा हिंग, जिरे आणि लाल मिरची लागेल.
=====
हे देखील वाचा- घरीच बनवायची आहे केसर कुल्फी? ‘या’ सोप्या रेसिपीने झटपट तयार होईल थंडगार कुल्फी
=====
स्वीट कॉर्न भाजी बनवायची प्रक्रिया
स्वीट कॉर्नची भाजी बनवण्यासाठी फ्रोझन स्वीट कॉर्न (sweet corn) घ्या. आता कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची, आले घ्या आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करा. हे सर्व तुकडे मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करा. आता कढईत किंवा पातेल्यात तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात चिमूटभर हिंग टाका. नंतर त्यात जिरे आणि लाल मिरची टाका. यानंतर कांदा आणि टोमॅटोची सर्व पेस्ट घालून चांगली शिजवून घ्या.
कढईत या मिश्रणाला चांगले परतून घ्या आणि त्यात हळद, तिखट आणि भाजीच्या प्रमाणानुसार मीठ टाका. आता हे मसाले चांगले परतले की, त्यात शिमला मिरची आणि गाजरचे बारीक केलेले तुकडे टाका. याच्यात आता स्वीट कॉर्नही टाका आणि ते चांगले शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवा. आता या ग्रेव्हीमध्ये भाजीपाला मसाला आणि कस्तुरी मेथी घालून शिजू द्या. शेवटी त्यात बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घाला. तुमची स्वीट कॉर्नची (sweet corn) भाजी तयार आहे. आता तुम्ही ही भाजी पराठा किंवा भाताबरोबर सर्व्ह करू शकता.