पब्लिक प्रोविडेंट फंडमध्ये गुंतवणूकदार नेहमीच गुंतवणूक करण्यासाठी तयार असतात. तर पीएफमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत सुरक्षित आणि त्याचसोबत तुम्हाला नक्कीच त्याचे उत्तम रिटर्न वेळेवर मिळतात. उत्तम व्याज दर आणि टॅक्स फ्री सारखी सुविधा ही तुम्हाला येथे दिली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक या सुविधेत गुंतवणूक करण्यासाठी वळतात. परंतु पीपीएफचा मेच्यॉरिटीचा कालावधी हा 15 वर्षांचा असतो हे लक्षात घ्या. मात्र असे नव्हे की, 15 वर्षात तुम्हीला कधीच पैसे काढता येणार नाहीत. यासाठी सुद्धा काही प्रक्रिया आहे. त्यामुळे जाणून घेऊयात पीएफ खात्यातून मेच्यॉरिटीपूर्वी पैसे कसे काढले जाऊ शकतात.(PPF money withdraw before maturity)
पीपीएफ खाते हे मेच्यॉरिटीपूर्टी काही विशेष परिस्थितीत बंद केले जाऊ शकते. पीपीएफ धार, पती-पत्नी किंवा आपली मुलं आजारी असल्याच्या कारणास्तव तुम्ही पैसे काढू शकता. या व्यतिरिक्त खातेधारकाला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा पैसे काढण्याची परवानगी असते. मात्र एखादा खातेधारक NRI झाल्यास तो आपले पीपीएफ खाते बंद करु शकतो.
हे देखील वाचा- नवंविवाहित कपल्सने ‘अशा’ पद्धतीने करा महिन्याभराचे आर्थिक प्लॅनिंग
-5 वर्षानंतर काढू शकतो पैसे
कोणत्याही खातेधारकाला पीपीएफ खाते सुरु केल्यानंतर 5 वर्ष झाल्यानंतर बंद करुन पैसे काढू शकतात. परंतु मेच्यॉरिटीपूर्वी खाते बंद केल्यास ज्या दिवशी तुम्ही ते सुरु केलेयं ते खाते बंद करण्याच्या तारखेपर्यंत 1 टक्के व्याज कापले जाते. परंतु खातेधारकाचा मृत्यू मेच्यॉरिटीपूर्वी झाल्यास तर नॉमिनीला पाच वर्षांची अट लागू केली जाते. त्यामुळे तो सुद्धा पाच वर्षांपूर्वी पीपीएफ खात्यातून पैसे काढता येणार नाहीत.
-अशा पद्धतीने खाते बंद करता येईल
खातेधारकाला जर मेच्यॉरिटी कालावधीपूर्वी पैसे काढायचे असेल तर त्याला फॉर्म भरुन पोस्टात किंवा बँकेत द्यावा लागणार आहे, जेथे तुमचे पीपीएफचे खाते आहे. फॉर्मसह पासबुकाची कॉपी आणि मूळ पासबूकाची सुद्धा तुम्हाला गरज भासणार आहेत. मात्र खातेधारकाचा मृत्यू झाल्यास पीपीएफ खाते बंद केल्यास त्यावरील व्याज, ज्या महिन्यात ते बंद केलेय त्या महिन्याच्या अखेर पर्यंत मिळते.(PPF money withdraw before maturity)
-पीपीएफचा व्याज दर
पीपीएफचा सध्याचा व्याज दर 7.1 टक्के वर्षभरासाठी आहे. पीपीएफमध्ये एका आर्थिक वर्षात कमीत कमी 500 रुपये आणि अधिकाधिक 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. एक व्यक्ती आपल्या नावे फक्त एकच पीपीएफ खाते सुरु करु शकतो.