Home » बकऱ्यांच्या कळपामुळे जगाला मिळाली कॉफी !

बकऱ्यांच्या कळपामुळे जगाला मिळाली कॉफी !

by Team Gajawaja
0 comment
Coffee
Share

मोठ्या कॅफेसमध्ये गेल्यावर जी गोष्ट ऑर्डर करताना बोबडी वळते, ती गोष्ट म्हणजे कॉफी. एस्‍प्रेसो, कैपेचीनो, अमेरिकैनो, आईरिश, टर्किश, इटेलियन एस्प्रेसो, लात्ते आणि आपली साधी पण कडक फिल्टर कॉफी. कॉफीमध्ये एवढे प्रकार आहेत कारण पाण्यानंतर जगभरात सर्वात जास्त प्यायलं जाणारं दुसरं पेय म्हणजे कॉफी. त्यासोबत कॉफी ही पेट्रोलियम नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जास्त व्यापारी वस्तू आहे, म्हणजेच वेगवेगळ्या देशांद्वारे निर्यात केलं जाणारं दुसरं सर्वात महत्वाचं प्रॉडक्ट. कॉफी ही जगाला बकऱ्यांच्या कळपामुळे मिळाली. नेमकी कशी, जाणून घेऊया. (Coffee)

असं बोललं जातं की अनेक शतकांपूर्वी इथोपियामध्ये काल्दी नावाचा मेंढपाळ आपल्या बकऱ्यांच्या कळपांना चरण्यासाठी जंगलात घेऊन गेला होता. तेव्हा त्याच्या बकऱ्यांनी जंगलात काही बेरी खालल्या, आणि त्यामुळे त्याच्या बकऱ्या आणखी Energetic झाल्या आणि उड्या मारत धावायला लागल्या. आश्चर्य म्हणजे त्याच्या बकऱ्या रात्रीच्या झोपल्याच नाही. काल्दीला वाटलं की त्या बेरी मध्येच काही तरी आहे. हे त्याच्या घराजवळ असणाऱ्या आश्रमात सांगितलं, मग त्या आश्रमातल्या लोकांनी या बेरीपासून एक पेय बनवून पिलं ज्यामुळे त्यांना सुद्धा Energetic वाटायला लागलं. या बेरीची ही गोष्ट हळूहळू पूर्वेच्या अरब देशांपर्यंत पसरली आणि जगाला मिळाली कॉफी. (International News)

यमन देशात कॉफीची लागवड होऊ लागली. मग ती परेशिया, इजिप्त, सीरिया आणि तुर्की या देशांमध्ये सुद्धा लोकप्रिय झाली. कॉफी घरी बनवून पिण्यापेक्षा लोकं कॉफी हाऊसमध्ये जाऊन कॉफी पिणं पसंत करत असतं. या कॉफी हाऊसना ‘कहवे खाने’ बोललं जायचं. लोकांमध्ये कहवे खाने इतके लोकप्रिय झाले की, तिथे सामान्य लोकांशिवाय प्रवासी, कलाकार, साहित्यकार, धर्मगुरू भेटत असतं आणि जगभरातील वी विषयांवर तिथे चर्चा करत. (Coffee)

ज्यामध्ये राजनैतिक चर्चाही जोरात होत. त्यामुळे १६ व्या आणि १७ व्या शतकादरम्यान तुर्की, मेक्‍का, इजिप्तसह अनेक अरब देशांनी या कहवा खान्यांवर बंदी घातली. याच दरम्यान, १७ व्या शतकात कॉफी युरोपमध्ये पोहचली होती. तुर्कीचे राजदूत सुलेमान आगा यांनी पॅरिसच्या शाही राजदरबाराला याची ओळख करून दिली. युरोपियांना कॉफीची चटक अशी लागली की, काही वर्षातच युरोपच्या प्रमुख शहरांमध्ये कॉफी हाऊस उघडले गेले होते. १७१५ मध्येच एकट्या लंडनमध्ये २००० पेक्षा जास्त कॉफी हौऊस उघडले गेले होते. (International News)

======

हे देखील वाचा :  तुपाची कॉफी सेवनाचे चमत्कारिक फायदे

======

युरोपमध्ये निर्यात होणाऱ्या कॉफीच्या बिया या उकळलेल्या किंवा भाजलेल्या असायच्या जेणे करून त्या बियांपासून कॉफीची लागवड कोणी करू नये. अरब व्यापाऱ्यांना त्यांच्या देशातून कॉफीची शेती करण्याची प्रक्रिया बाहेर जाउ द्यायची नव्हती. तेव्हा विदेशी लोकांना कॉफीच्या बागांमध्ये जाण्याची परवानगी नव्हती. असं म्हटलं जातं. पण अशाच बागांमधुन सूफी हजयात्री बाबा बुदान यांनी कॉफीचे सात बीज चोरून भारतात आणले आणि दक्षिण भारतात मैसूर परिसरात ते लावले. मग भारतात सुद्धा कॉफीची लागवड सुरू झाली. १६१६ मध्ये एका डच गुप्तहेराने अरबमधून कॉफीचे बीज चोरले, आणि जावा, सुमात्रा, बाली, श्रीलंका आणि सूरीनाममध्ये सुद्धा कॉफीची लागवड सुरू झाली. मग कॉफी जगभरात कानाकोपऱ्यात पोहचली. कॉफीच्या बिन्समध्ये असणाऱ्या कैफीनमुळे शरीराचा आणि मेंदूचा अलर्टनेस वाढतो. शिरीरात एक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळेच हे पेय इतकं लोकप्रिय आहे. (Coffee)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.