महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि त्यातच या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. काही पक्षांनी आमदारांसाठी Five Star हॉटेल्स बूक केले होते. तर काही पक्ष आमदारांवर विश्वास ठेऊन ते शांत आणि स्तब्ध होते. त्यातच निकाल जाहीर झाल्यानंतर आता विजयी आमदार आनंद साजरा करत आहेत. (Vidhan Parishad)
महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकांमध्ये 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात होते. ज्यामध्ये महायुतीच्या भाजपचे -5 शिवसेना शिंदे गटाचे 2 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 असे एकूण 9 उमेदवार होते. तर महाविकास आघाडीचे कॉँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाचा प्रत्येकी एक उमेदवार होता. राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपला उमेदवार न उभा करता शेतकरी कामगार पार्टीच्या जयंत पाटील यांना समर्थन दिलं होत. या विधान परिषदेच्या रणांगणात महायुतीचा विजय झाला आहे.
ज्यामध्ये भाजपच्या पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, रयोगेश टीळेकर विजयी झालेले उमेदवार आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कृपाल तुमाने, भावना गवळी, शिवाजी गर्जे, राजेश विटेक हे उमेदवार विजयी झालेत. (Vidhan Parishad)
महाविकास आघाडी मध्ये कॉँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दोन्ही उमेदवार प्रज्ञा सातव व मिलिंद नार्वेकर विजयी झाले आहेत. पण शेतकरी कामगार पक्षाला पराभवाचा सामना करवा लागलाय. पण विधान परिषद म्हणजे नेमक आहे तरी काय ? जर सर्व सामान्य माणूस विधानपरिषदेसाठी मतदान करू शकत नाही, तर मग नेमकं वोट कोण करतं ?
भारत हे जगातला सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे आणि हेच लोकशाही राष्ट्रचालवण्यासाठी दोन प्रकारे सरकार स्थापन होत. केंद्र सरकार आणि राज्यसरकार. जसं भारताच्या संसदेत लोकसभा आणि राज्यसभा अशी दोन सभागृह आहेत, त्याच प्रमाणे प्रत्येक राज्यात विधानसभे व्यतिरिक्त विधानपरिषद असण्याचा अधिकार घटनेचा कलम 169 देतो. भारतात आतापर्यंत तरी सहा राज्यांमध्येच विधान परिषद आहे. (Vidhan Parishad)
विधानसभा आणि विधानपरिषद या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. विधानसभा म्हणजे राज्य विधीमंडळाचे कनिष्ठ सभागृह आणि विधान परिषद हे राज्य विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे. राज्यात विधानसभेत 288 सदस्य आहेत आणि विधान परिषदेतील सदस्य संख्या 78 इतकी आहे. संविधानातील तरतुदीनुसार कोणत्याही राज्यात विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किमान 40 असावी. तर कमाल संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एक-तृतीयांश इतकी असू शकते. (Vidhan Parishad)
विधानपरीषद निवडणूक प्रक्रिया अशा प्रकारे आहे की महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण 78 सदस्य आहेत. त्यातील 30 सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत म्हणजेच आमदारांमार्फत निवडले जातात. 22 सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांमार्फत निवडले जातात. तसंच 7 सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून तर 7 सदस्य शिक्षक मतदारसंघांमधून निवडले जातात. या शिवाय 12 सदस्य हे राज्यपालांद्वारे नामनियुक्त केले जातात, वाडःमय, शास्त्र, कला, सहकारी चळवळ आणि समाजसेवा यामध्ये अनुभव आणि ज्ञान असलेल्या व्यक्तींनाच राज्यपाल नियुक्त करतात.
विधान परिषदेची गरज का निर्माण झाली हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ? तर विधानसभा म्हणजे कनिष्ठ सभागृहात कायदे संमत करण्याचं काम केल जातं. अनेकदा ते घाईगडबडीने केलेले असू शकतात. त्यावेळी त्या कायद्याची नीट तपासणी वरिष्ठ सभागृहातील वरिष्ठ सदस्यांनी करावी अशी अपेक्षा असते. ही घाई राजकीय कारणामुळेच होते. अशी घाई होऊ नये यासाठी विधान परिषदेची निर्मिती करण्यात आली आहे. (Vidhan Parishad)
====================
हे देखील वाचा : आज नकद, उद्या मतदान… महायुतीची खेळी फळणार?
====================
विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुलं मतदानअसल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावं लागतं. पण विधान परिषदेत आमदार गुप्त मतदान करतात. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता असते, हा पक्षांसाठी तोट्याचा विषय आहे. म्हणूनच MORDEN प्रॉब्लेम्स Require Modern Solution म्हणतं सर्व पक्षांनी स्वतच्या आमदारांसाठी हॉटेल्स बूक केले गेले पण या हॉटेल बूकिंगचा फायदा फक्त महायुतीलाच झाल्याचं दिसत आहे. (Vidhan Parishad)
2022 ला ही भाजपाचे सर्व उमेदवार विजयी झाले होते आणि 2024 म्हणजे आता ही भाजपाने स्वत: च विजयस्थान विधान परिषदेत कायम ठेवल आहे. त्यामुळे आता विधानसभेत महायुती आपला झेंडा रोवेल की त्यांना पराभवाला सामोरं जावं लागेल., हे भविष्यच सांगेल.