सध्या आंब्याचा सिझन चालू झाला आहे. आंब्याचा राजा म्हणून आपल्या हापूसचे नाव घेतले जाते. मात्र हापूसच्या (Mango) तोडीस तोड अशा अनेक आंब्यांच्या जाती बाजारात उपलब्ध आहेत. आपल्या देशात सुमारे 1500 आंब्यांच्या जाती असल्याचे सांगितले जाते. बनारसी लंगडा आंबा (Mango) हा त्यापैकीच एक. अगदी हिरव्या रंगाचा, पातळ सालीचा हा आंबा कापला तरी आतून छान पिकलेला असतो आणि त्याची चवही तेवढीच चांगली लागते. या बनारसी लंगड्या आंब्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची किंमतही कमी असते आणि हा आंबा साधारण एप्रिल महिन्यापासून बाजारात विक्रीस येतो तो अगदी जून किंवा जुलैपर्यंतही हा आंबा विक्रीसाठी उपलब्ध असतो. अतिशय चांगल्या चवीचा, आंबट गोड चवीच्या या आंब्याला आता काही दिवसांपूर्वीच जीआय टॅग मिळाला आहे. त्यानंतर या बनारसी आंब्याला लंगडा आंबा का म्हणतात, याची उत्सुकता होती. या आंब्याला नाव कसं मिळालं हे जेवढं जाणण्यासारखं आहे, तशीच या आंब्यांची आता मोठ्याप्रमाणात जी लागवड केली जाते, त्याचे मुळ कशात आहे, हे जाणून घेणेही उत्सुकतेचे ठरले.
आंबा हा प्रत्येकाचा विकपॉईंट आहे. कुठलाही आंबा (Mango) का असेना पण त्याची चव बघितली नाही असा खवय्या शोधूनही सापडणार नाही. आंब्याच्या अनेक जाती आहेत. आणि या प्रत्येक जातीच्या आंब्यांची चव वेगवेगळी आहे. यातीलच एक खास आंबा म्हणजे बनारसी लंगडा आंबा. अलिकडे या आंब्याला जीआय टॅग मिळाला आहे. इतर आंब्याप्रमाणे या आंब्याची किंमत थोडीफार कमी असते, शिवाय याची चवही चांगलीच असते. त्यामुळे बनारसी लंगडा आंब्याला खूप मागणी आहे. उत्तरप्रदेशच्या बनारसमध्ये या अंब्याची(Mango) लागवड जास्त प्रमाणात होते. त्यामुळे या आंब्याला बनारसी आंबा (Mango) म्हणतात. मात्र लंगडा आंबा हे त्याचे नाव अधिक लोकप्रिय आहे. या अंब्याला लंगडा का म्हणतात, यामागे एक कथा सांगितली जाते. कारण हा आंबा आकारानं चांगला, (Mango) चवीला भन्नाट असला तरी त्याच्यापुढे हे लंगडा नाव कसे लागले याची कथा बनारसमध्ये सांगितली जाते. या बनारसी लंगडा आंब्याचा इतिहास 300 वर्षापूर्वीचा आहे. बनारसमधील एका शिवमंदिरात एक साधू राहण्यासाठी आला होता. त्यावेळी या साधूकडे दोन आंब्याची (Mango) रोपं होती. या साधूनं या आंब्यांच्या रोपाची लागवड मंदिराच्या आवारात केली. रोज साधू ज्या भक्तीभावानं शंकराची पूजा करीत असे, त्याच भक्तीभावानं या आंब्याच्या रोपांचीही काळजी घेत असे. सुमारे चार वर्षानंतर या आंब्यांना मोहोर आला आणि काही दिवसात त्याला आंबाही धरला. या आंब्याचे पहिले फळ साधूनं भगवान शंकराला अर्पित केले. त्यानंतर देवाच्या आरतीसाठी जमलेल्या भक्तांना हा आंबा कापून वाटण्यात आला. या घटनेनंतर, साधूनं हे मंदिर सोडलं, आणि तो अन्य जागी जाण्यासाठी तयार झाला. मात्र हे करतांना त्यांनी या दोन आंब्यांच्या झाडांची जबाबदारी मंदिराच्या पुजा-याकडे दिली. पण यासाठी त्यांनी एक अट घातली. ती म्हणजे या आंब्यांच्या कोयी अन्य कोणालाही द्यायच्या नाहीत. झाडाला येणारे आंबे कापून भक्तांना प्रसाद म्हणून द्यायचे आणि त्याची कोय जाळून टाकायची असे वचन त्या साधूनं पुजा-यांकडून घेतलं आणि त्यांनी तो मंदिर सोडून पुढील प्रवासासाठी रवाना झाला.
=======
हे देखील वाचा : चंद्रावर जाणारी पहिला महिला…
======
पुजार्याने त्याप्रमाणे काळजी घेतली. पण या आंब्याच्या (Mango) चवीची गोडी इतकी होती की, अवघ्या बनारसभर त्याची चर्चा होऊ लागली. पुजा-याकडे अनेकांना त्या आंब्याची कोय किंवा त्याची एखादी फांदी देण्याची विनंती केली. मात्र त्यानं त्याला नकार दिला. भगवान शंकराच्या आरतीला त्यामुळे गर्दी होऊ लागली. या भक्तांना प्रसाद म्हणून आंब्याची फोड मिळायची. या आंब्याच्या चवीची माहिती मग काशीच्या राजापर्यंत पोहचली. मग एके दिवशी स्वतः राजा मंदिरात हे आंब्याचे झाड पाहण्यासाठी आला. त्यांनी भगवान शंकराची भक्तिभावाने पूजा केली आणि झाडांचे निरीक्षण केले. मग पुजार्यासमोर या झाडाचे कलम करण्याची परवानगी मागितली. यावर पुजा-यानं त्याला साधूने घातलेली अट सांगितली. पण आपण राजाचा आदेश टाळू शकणार नाही, म्हणून त्यांनी देवाला प्रार्थना करणर, देवानं होकार दिला तरच तुम्ही याचे कलम करा, असे राजाला सांगितले. यावर पुजा-यानं भगवान शंकराची परवानगी मागितली आणि राजाला कलम करण्याची परवानगी दिली. त्यानंतर काशीच्या राजाच्या मुख्य बागायतदाराने या आंब्याची अनेक कलमे केली. ही कलमे राजवाड्याच्या आवारात लावण्यात आली. काही वर्षांतच त्यापासून फळे यायला सुरुवात झाली. अशाप्रकारे या झाडांपासूनही मग कलमे करण्यात आली आणि त्यांची बाग करण्यात आली. त्यामुळे रामनगरमध्ये लंगडा आंब्याच्या अनेक मोठ्या बागा तयार झाल्या. आजही बनारसच्या आसपास लंगड्या आंब्याच्या मोठ्या बागा आहेत. हिंदू विद्यापीठाच्या विस्तीर्ण प्रांगणातही शेकडो आंब्याची (Mango) झाडे आहेत. या आंब्याला ज्या साधूनं शिवशंकराच्या मंदिरात लावले होते, तो साधू लंगडा होता. त्यामुळे त्याला लंगडा आंबा हे नाव पडलं. आता हाच लंगडा आंबा बनारसची शान म्हणून ओळखला जातो. जीआय टॅग मिळाल्यावर त्याच्या प्रतिष्ठेत अजूनच भर पडली आहे.
सई बने