अमेरिकेनं ज्या शहरावर 78 वर्षापूर्वी अणुहल्ला केला होता, ते हिरोशिमा (Hiroshima) शहर आता जगभरातल्या मान्यवर नेत्यांचे स्वागत करत आहे. 78 वर्षापूर्वी अणुहल्ल्यामध्ये पूर्णपणे उध्वस्त झालेल्या जपानच्या हिरोशिमामध्ये G-7 देशांची बैठक झाली. या बैठकीच्या निमित्तानं हिरोशिमा (Hiroshima) शहर आज असं आहे, याची उत्सुकता वाढली. अणुहल्ल्याच्या 78 वर्षानंतर या शहराची झालेली प्रगती ही सर्वांना आश्चर्य चकीत करणारी आहे. राखेतून जणू या नव्या हिरोशिमानं (Hiroshima) जन्म घेतला आहे. G-7 देशांची बैठक जपानच्या हिरोशिमा शहरात झाली. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. सुमारे 78 वर्षांपूर्वी हे शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. अणुहल्ल्याचा परिणाम पुढची अनेक वर्ष हिरोशिमानं सहन केला. परंतु येथील लोकांनी हे शहर पुन्हा उभे केले. G-7 देशांच्या बैठकीनिमित्तानं हिरोशिमाची (Hiroshima) झालेली प्रगती अवघ्या जगानं पाहिली आहे.

1945 साल हे जपानसाठी काळ्या अक्षरातील ठरले. दुस-या युद्धाची खूप मोठी किंमत जपानच्या हिरोशइमा आणि नागासाकी शहरांना मोजावी लागली. दुस-या महायुद्धात अमेरिकेला जपाननं धैर्यानं तोंड दिले होते. जपानी हार मानत नाहीत, हे ओळखल्यावर अमेरिकेनं धोकादायक पाऊल उचलले. 6 ऑगस्ट रोजी सकाळी 8:15 वाजता अमेरिकन लढाऊ विमानाने हिरोशिमावर (Hiroshima) अणुबॉम्ब टाकला. या बॉम्बचे नाव ‘लिटिल बाय’ होते. त्यात 64 किलो युरेनियम होते. या बॉम्बमुळे हिरोशिमाच्या 1 लाख 30 हजार नागरिकांनी आपला जीव गमावला. शिवाय जे जिवंत राहिले, त्यांच्यासाठी त्यांचे जीवन मरणयात्रेप्रमाणे ठरले. बॉम्ब पडल्यानंतर केवळ 5 सेकंदात 80 हजार लोकांचा मृत्यू झाला. ज्या भागात हा बॉम्ब पडला, तेथे दहा लाख अंश सेल्सिअस तापमान होते. पुढची अनेक वर्ष या भागातील नागरिकांना अणुबॉम्बच्या युरेनियमचा त्रास सहन करावा लागला. फारकाय पोटातील बाळांनाही या बॉम्बची झळ लागली. हा अणुबॉम्ब टाकल्यावर झालेली हानी बघता अमेरिकेवर जगभरातून टिका झाली. दुसऱ्या महायुद्धात जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला केला. ज्यात त्यांच्या 8 युद्धनौका नष्ट झाल्या. तसेच 2400 हून अधिक अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर हल्ला केला. अमेरिकेनं हे कारण पुढे केले. या हल्ल्यानंतर जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध तिथेच संपले.
या घटनेला आता 78 वर्ष झाली आहे. आता अणुबॉम्बचा हल्ला सहन केलेले हिरोशिमा (Hiroshima) शहर कसे आहे, हे जाणणे गरजेचे आहे. जपानच्या नागरिकांची चिकाटी आणि जिद्द किती आहे, याचे प्रतीक म्हणजे हे शहर असल्याचे म्हटले पाहिजे. कारण हिरोशिमा शहर हे आता जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक शहर आहे. या शहराच्या पुर्नबांधणीसाठी फक्त सरकारनच पुढाकार घेतला असे नव्हे तर तेथील जनतेनेही मनापासून या शहराची उभारणी केली. परिणामी अतिशय सुंदर शहर म्हणून हिरोशिमाचा गौरव होते आहे. हिरोशिमा शहर खूप बदलले आहे. हे शहर जपानमधील होन्शु या सर्वात मोठ्या बेटावर आहे. आता येथे दाट लोकवस्ती आहे. हे आपल्या सौंदर्याने पर्यटकांना खूप आकर्षित करते. हिरोशिमामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ असून तिथून अनेक देशांची थेट विमानसेवा आहे. याशिवाय तेथील ट्रेन सुविधाही अतिशय कौतुकास्पद अशीच आहे. हिरोशिमा हे शिक्षणासाठीही ओळखले जाते. जगभरातील अनेक विद्यार्थी हिरोशिमा येथील विद्यापिठांमध्ये आपले भविष्य घडवण्यासाठी येतात.
======
हे देखील वाचा : अमेरिका रासायनिक शस्त्रे नष्ट करणार
======
हिरोशिमावर (Hiroshima) झालेल्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येथे भव्य स्मारक बांधले असून त्याला जोडून संग्रहालयगही आहे. आता जगभरातील नागरिक हे संग्रहालय बघायला आवर्जून येतात. या हिरोशिमा शहरात अनेक बगिचे असून तेथेही पर्यटकांची गर्दी असते. 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉम्बनंतर हे शहर स्मशानासारखे झाले होते. हिरोशिमामधील 69 टक्के इमारती नष्ट झाल्या. मात्र आता हेच हिरोशिमा शहर उत्तुंग अशा इमारतींनी सजलेले आहे. G7 देशांच्या नेत्यांच्या बैठकाही अशाच अलिशान इमारतींमध्ये पार पडल्या. भारतासह अमेरिका, इंग्लड, जर्मनी, इटली, कॅनडा, जपान आणि फ्रान्स या देशांच्या नेत्यांनी हिरोशिमामध्ये (Hiroshima) दाखल होताच हिरोशिमा स्मारकाला भेट दिली आणि अणुहल्ल्यात मृत पावलेल्या लाखो नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. या बैठकीतही जगाला युद्धापासून लांब कसे ठेवता येईल यावर चर्चा झाली. जे शहर युद्धांच्या झळांनी पूर्णपणे नष्ट झाले होते, तिथूनच शांततापूर्ण चर्चा झाली आहे. जागतिक राजकारणात या घटनेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
सई बने