बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर तातडीने देश सोडला. विद्यार्थ्यांनी संपूर्ण बांग्लादेशभर रस्त्यावर उतरून जल्लोष सुरू केला. पण बघता बघता या जल्लोषाच रूपांतर एका हिंसाचारात झालं. आणि हा हिंसाचार काही विशिष्ट वर्गांवरच करण्यात येत आहे. अल्पसंख्याक समुदाया आणि शेकडो हिंदू त्यांच्या घरांवर आणि व्यवसायांवर झालेल्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. हा हिंसाचार कशाप्रकारे झाला? आणि हिंसाचार होण्याची करणं काय आहेत?
बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर, अनेकांना वाटलं की, हा त्या विद्यार्थ्यांचा विजय आहे, ज्यांनी शेख हसीना विरुद्ध आंदोलन केलं होतं. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर तातडीने देश सोडला. अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांना ५२ जिल्ह्यांमध्ये हल्ल्यांचा सामना करावा लागला ज्यामध्ये अशाप्रकारच्या २०५ घटना समोर आल्या. त्यासोबतच शेकडो हिंदू त्यांच्या घरांवर आणि व्यवसायांवर झालेल्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
बांगलादेशची राजधानी ढाका येथे भारतीय सांस्कृतिक केंद्राची तोडफोड करण्यात आली. याशिवाय,बांगलादेशमधल्या मंदिरांचं सुद्धा नुकसान झालं आहे. ढाकाच्याच इस्कॉन मंदिरात खुसखोरी करत लूटमार आणि तोडफोड करण्यात आली. ज्यामुळे अल्पसंख्याक आणि हिंदू समाजाच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. अनेक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यामध्ये लोकांनी बाहेर चाललेल्या हिंसक परिस्थिती ला घाबरून स्वत:ला घरात कोंडून घतेलं आहे. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषद आणि बांगलादेश पूजा उद्जापन परिषदेने बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतलेल्या नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांना एका पत्रात परिस्थिती कीती गंभीर आहे हे सांगितलं.
पत्राच्या म्हणण्यानुसार, “आम्ही संरक्षणाच्या शोधात आहोत कारण आमचं जगणं संकटमय झाल आहे. आम्ही रात्री जागरणं करतो, आमच्या घरांचं आणि मंदिरांचं रक्षण करतो. मी माझ्या आयुष्यात असं काहीही पाहिलेल नाही.” या पत्रातून सरकारने हरवलेला जातीय सलोख पुन्हा स्थापित करावा अशी मागणी करण्यात आली आहे. हिंदू समाजातील अनेक लोक आता इतरांच्या घरी आश्रय घेत आहेत. या सगळ्या आंदोलनाचं रूपांतर हिंसाचारात होण्याचं कारण म्हणजे कट्टरपंथी विचारधारेचे लोकं जे पूर्वीपासूनच अल्पसंख्याक आणि हिंदूवर अत्याचार करत आहेत.
१९७२ मध्ये बांगलादेशचं संविधान तयार झालं, जे चार गोष्टींवर आधारित होतं. समाजवाद, राष्ट्रवाद, लोकतंत्र आणि धर्मनिरपेक्षता. बांगलादेशचे पहिले पंतप्रधान शेख मूजीबुर रेहमान यांनी बांग्लादेशच्या संसदेत जाहीर केलं होतं की, बांगलादेशमध्ये प्रत्येक धर्मातील लोकांना त्यांच्या धर्माच पालन करण्याच स्वतंत्र आहे. आणि त्यानुसार, संविधानात आर्टिकल १२चा वापर करत धर्माचा राजकीय उपयोग करण्यावर बंदी आणीली. पण पंतप्रधान शेख मूजीबुर रेहमान यांच्या हत्येनंतर धर्मनिरपेक्ष बांगलादेशला इस्लामिक रिपब्लिक ऑफ बांग्लादेश म्हणून घोषित करण्यात आलं. झियाउर रेहमान यांच सरकार होतं, त्यांनी आर्टिकल बारा रद्द केला.जो निवडणुकीत धर्माचा राजकीय उपयोग करण्यावर बंदी घालत होता. मग येणाऱ्या निवडणुकांमध्ये सगळ्या पक्षांनी धर्माचा वापर करत प्रचार केला, ज्यामुळे अल्पसंख्याक आणि हिंदूकडे दुर्लक्ष झालं. हा झाला एक मुद्दा
अल्पसंख्याक आणि हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराचं दुसरं कारणं म्हणजे जमात-ए – इस्लामी. ही एक बांग्लादेशमधली पॉलिटिकल पार्टी आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्यापूर्वी या पार्टीचं नाव जमात-ए – इस्लामी पाकिस्तान असं होतं. यापार्टीने आणि तिच्या नेत्यांनी बांगालादेशच्या स्वातंत्र्याचा विरोध केला होता. शिवाय, १९७१ च्या युद्धात या पार्टीच्या नेत्यांवर हत्या, बलात्कार अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे आरोप होते. स्वातंत्र्यानंतर आरोपींना शिक्षा देण्यात आली या पार्टीला बॅन करण्यात आलं. पण पंतप्रधान शेख मूजीबुर रेहमान यांच्या हत्येनंतर १९७५ साली हा बॅन हटवण्यात आला. २०१३ साली, पुन्हा सुप्रीम कोर्टाकडून या पॉलिटिकल पार्टीला निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात आली. याच पॉलिटिकल पार्टिची विद्यार्थी संघटना आहे. जमात शिबीर ज्यांच्यावर हिंदु परिवारांवर आणि मंदिरांवर हल्ला करण्याचे आरोप आहेत. आणि ही पार्टी पुन्हा सत्तेत सहभागी होण्याचे प्रयत्न करतं आहे अशी चर्चा आहे.
=====
हे देखील वाचा : शेख हसीना यांच्या मागचे कारस्थान
======
बांगलादेशाच्या लष्कराकडून हिंदू अल्पसंख्याक, मंदिरे आणि इतर अल्पसंख्याकांसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.अल्पसंख्याकांना देशभरात कोणताही हल्ला किंवा कोणत्याही प्रकारचा धोका असल्यास संपर्क साधण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत. पण या हिंसेमुळे अस्वस्थ झालेले लोकं भारत बांग्लादेश सीमेवरून भारतात शिरण्याचा प्रयत्न सुद्धा करत आहेत. बांगलादेशची राजधानी ढाका आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर असलेल्या चितगावमध्ये शनिवारी लाखो लोक रॅलीत सहभागी झाले होते हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ ही रॅली काढण्यात आली होती ज्यामध्ये देशभरातील मंदिरे, त्यांची घरे आणि व्यवसायांवर हल्ले होत असताना त्यांनी सुरक्षेची मागणी केली. बांगलादेशचे नवे गृहमंत्री सखावत हुसेन यांनी हिंदू समुदायाचं पुरेस संरक्षण न करू शकल्या बद्दल हिंदू समाजाची माफी मागितली आहे. भविष्यात त्यांना सुरक्षितेचे आश्वासनं सुद्धा त्यांनी दिलं आहे.