Home » खाल्ल्यानंतर लगेच झोपत असाल तर वेळीच व्हा सावध

खाल्ल्यानंतर लगेच झोपत असाल तर वेळीच व्हा सावध

जेवल्यानंतर उत्तम झोप लागते असे बहुतांश जण म्हणतात. पण तुम्ही सुद्धा त्यांच्यापैकी एक आहात का? असे असेल तर वेळीच सावध व्हा. कारण अशाप्रकारच्या सवयीमुळे तुमच्या शरीरावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

by Team Gajawaja
0 comment
Health Advice
Share

जेवल्यानंतर उत्तम झोप लागते असे बहुतांशजण म्हणतात. पण तुम्ही सुद्धा त्यांच्यापैकी एक आहात का? असे असेल तर वेळीच सावध व्हा. कारण अशाप्रकारच्या सवयीमुळे तुमच्या शरीरावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जेवल्यानंतर जरी उत्तम झोप लागत असली तरीही असे करणे चुकीचे आहे. आपले शरीर हेल्दी राहण्यासाठी आपल्याला काही गोष्टींत बदल करावा लागतो. खरंतर खाल्लेले जेवण पचण्यासाठी जवळजवळ 2-4 तासांचा कालावधी लागतो. (Health Advice)

जेवल्यानंतर लगेच बसणे किंवा झोपण्याऐवजी थोडी शारीरिक हालचाल करावी. जेणेकरुन आपण खाल्लेले पदार्थ व्यवस्थितीत पचले जातील.पण याउलट केले तर तुमची पचनाची क्रिया मंदावली जाते. अशातच शरीराला पुरेसे पोषण तत्त्वे मिळत नाहीत. तर जाणून घेऊयात जेवल्यानंतर लगेच झोपल्याने काय नुकसान होते त्याबद्दल अधिक.

मधुमेहाचा धोका
जेवल्यानंतर लगेच झोपल्यास शरीरात अतिरिक्त फॅट्स वाढले जातात. याच कारणास्तव रक्तात साखर वेगाने वाढू लागते. रक्तात साखर वाढल्याने मधुमेह होण्याचा धोका असतो. खाल्ल्यानंतर आपले शरीर सक्रिय ठेवणे अत्यंत गरजेचे असते. शरीरात जमा झालेले फॅट जेवण सहज पचवू शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही काही आजारांचा सामना करता.

अपचन
जेवल्यानंतर लगचे झोपल्याने आपली पचनक्रिया पूर्णपणे काम करत नाही. पचनक्रिया प्रभावित झाल्यास पोटात अपचनाची समस्या होऊ लागतो. याच कारणास्तव फूड पॉइजिनिंग, उलटी किंवा डोकेदुखी अशा समस्या होऊ शकतात. जेवण पूर्णपणे न पचल्यास बैचेन वाटत राहते. यामुळे नेहमीच प्रयत्न करा की, जेवणानंतर थोडावेळ शतपावली करा. असे केल्याने खाल्लेले जेवण लवकर पचले जाईल आणि पूर्णपणे पोषक तत्त्वे ही मिळतील. (Health Advice)

वजन वाढणे
कोणत्याही प्रकारचे फूड खाल्ल्यानंतर थोडावेळ चालले-फिरले पाहिजे. म्हणजेच शरीराची हालचाल होणे महत्त्वाचे आहे. जेणेकरुन आपल्या पचनसंस्थेला खाल्लेले पदार्थ पचवण्यास मदत होते. शरीराला भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वे मिळतात. थकवा जाणवत नाही. दुसऱ्या शब्दात बोलायचे झाल्यास असे म्हणू शकतो की, खाल्ल्यानंतर जे अतिपचवणे आवश्यक आहे. म्हणजेच कॅलरीज बर्न करणे गरजेचे आहे. कॅलरीज बर्न केल्याने अतिरिक्त वसा बाहेर पडतो आणि आपले शरीर हेल्दी राहते. जेवल्यानंतर झोपल्यास अधिक वजन वाढले जाते. त्यामुळे जेवल्यानंतर कमीत कमी 3-4 तासांनी झोपावे असा सल्ला दिला जातो.


हेही वाचा- देशातील 70 टक्के लोकांना ‘या’ कारणास्तव सतावते पचनासंबंधित समस्या


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.