Home » चेस मास्टर गुकेश डोम्मराजू !

चेस मास्टर गुकेश डोम्मराजू !

by Team Gajawaja
0 comment
Gukesh Dommaraju
Share

२०१७ साली चेन्नईच्या एका १२ वर्षांच्या चेस खेळणाऱ्या मुलाला विचारलं होत की, तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे ? त्यावर त्याने उत्तर दिल की, मला सर्वात यंगेस्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन व्हायचं आहे. १२ डिसेंबर २०२४ रोजी सिंगापूरमध्ये भरलेल्या वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये फायनलमध्ये भारत आणि चीन पोहोचले होते. भारताचा चेसमास्टरसुद्धा मातब्बर आणि चीनचा वर्ल्ड क्लास प्लेयर पण अंतिम सामन्यात चीनच्या प्लेयरने एक असा ब्लंडर केला, ज्यामुळे अख्ख स्पोर्ट्स जग शॉकच झालं. भारताच्या चेसमास्टरचा विजय निश्चित झाला आणि अखेर भारताने इतिहास रचला. त्या चेस मास्टरचं नाव डोम्मराजू गुकेश ! विश्वनाथन आनंद यांच्यानंतर वर्ल्ड चॅम्पियन होणारा गुकेश हा दुसरा भारतीय ठरलाच पण याच्यासोबतच तो जगातला सर्वात यंगेस्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन झाला. सगळीकडे गुकेशचीच चर्चा होती पण त्याचा 18 वर्षांचा प्रवास अनेकांना माहित नव्हता. (Gukesh Dommaraju)

२९ मे २००६ रोजी गुकेशचा चेन्नईमध्ये जन्म झाला. पण मुलगा तेलुगु गुकेशचे आईवडील डॉक्टर्स त्यामुळे फावल्या वेळात ते चेस खेळायचे, ज्याचा नाद लहानपणीच गुकेशला लागला. आपल्या भारताला चेसचा जनक म्हणतात. त्यामुळे चेसमध्ये अनेक मातब्बर खेळाडू आपल्या देशात झाले आहेत. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन गुकेशने सातव्या वर्षीच त्याने आपला चेसचा प्रवास सुरु केला. तुम्ही एक ओब्झर्व्ह केलं का की विश्वनाथ आनंद, आर. प्रज्ञानंद आणि डी. गुकेश हे सर्वच चेस मास्टर तमिळनाडूचे आहेत. त्यामुळे तमिळनाडूला चेसचं Grand Master राज्य म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गुकेश हा त्याच शाळेचा विद्यार्थी आहे जिथून देशाला विश्वनाथन आनंदसारखे खेळाडू मिळाले. गुकेशने त्याच शाळेत शिकणाऱ्या ग्रँडमास्टर प्रज्ञानंदमुळे त्याला चेसमध्ये आणखी मदत मिळाली. चेसमध्ये तो इतका गुंतला होता की, त्याने शाळाच सोडली असं सांगितलं जातं. चौथीनंतर नियमित शाळेत जाण त्याने बंद केलं आणि संपूर्ण लक्ष चेसवरच लावलं. गुकेशच्या स्वप्नासाठी त्याच्या आई-वडिलांनीही त्याला मदत केली. विजयानंद चेस Academy मध्ये तो चेसचं प्रशिक्षण घ्यायला लागला. त्याचे प्रशिक्षक विष्णू प्रसन्ना यांनी गुकेशला विशिष्ट अपारंपरिक दृषटिकोनाने या खेळाकडे पाहायला शिकविले. गुकेशचे वडील ईएनटी सर्जन आहेत. पण तरीही ते गुकेशसोबत प्रत्येक टूर्नामेंटला जायचे. महिन्यातील १५ दिवस गुकेशबरोबर ते प्रवास करायचे आणि बाकीचे १५ दिवस ऑपरेशन्स करत होते. गुकेशबरोबर सतत प्रवास करत असल्यामुळे त्यांच्या कामावरही ताण येत होता. पण आपल्या मुलासाठी ते सर्वकाही करायला तयार होते. तो दररोज ७० चेसची कोडी सोडवायचा, त्यामुळेच त्याच्या बुद्धीला बळ मिळत गेलं. (Latest Updates)

गुकेशने सर्वप्रथम वयाच्या ९ व्या वर्षी २०१५ साली एशियन स्कूल चेस चॅम्पियनशिप जिंकली होती. त्यानंतर २०१८ मध्ये अंडर-12 वर्ल्ड युथ चेस चॅम्पियनशिपचा तो विनर ठरला. २०१८ च्या एशियन युथ चेस चॅम्पियनशिपमध्ये त्याने ५ गोल्डमेडल जिंकले. यानंतर तो चांगलाच लाईमलाईटमध्ये आला. १५ जानेवारी २०१९ रोजी वयाच्या 12व्या वर्षी तो इतिहासातला दुसरा यंगेस्ट Grand Master ठरला. २०२२ च्या एशियन गेम्समध्ये त्याने सिल्व्हर मेडल जिंकलं. २०२३ मध्ये गुकेशने विश्वनाथन आनंद यांना International Chess Federation च्या Ranking मध्ये भारताचा अव्वल क्रमांकाचा खेळाडू म्हणून मागे टाकल, ३६ वर्षांमध्ये पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूने चेसच्या आयकॉनला मागे टाकल होत. याशिवाय चेस ऑलीम्पियाडमध्ये २०२२ ते २०२४ दरम्यान एक ब्राँझ आणि तीन गोल्ड जिंकून चेसच्या मार्केटचा नवा युवा राजा बनला. (Gukesh Dommaraju)

========

हे देखील वाचा : भाऊबंदकीच्या भांडणातून Oreo बिस्किट मार्केटमध्ये आलं !

========

आता त्याच्यासमोर सर्वात मोठ आव्हानं होत ते म्हणजे वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचं ! चीनचा डिंग लिरेन गेल्याच वर्षी रशियाच्या इयन नेपोम्नियाशीला हरवून वर्ल्ड चॅम्पियन बनला होता. पण गुकेशसमोर मात्र तो चाचपडत होता. यापूर्वी ऑलिम्पियाडमध्ये गुकेशशी भिडण डिंग लिरेनने चक्क टाळल होत. पण ३२ वर्षाचा डिंग लिरेन आणि १८ वर्षांचा डी. गुकेश अखेर वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये समोर आले. १३ व्या डावापर्यंत सामना बरोबरीत होता. मात्र १४ व्या डावात डिंगने केलेल्या ब्लंडरमुळे गुकेश वर्ल्ड चॅम्पियन झाला. हा सामना ४ तास आणि ५८ चालींपर्यंत चालला. या विजयानंतर सगळीकडेच गुकेशची चर्चा होती. जिंकल्यानंतर तो प्रचंड भावूक झाला आणि त्याने वडिलांना मिठी मारली. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. विश्वनाथ आनंद यांच्यानंतर भारतीय चेसचा चेहरा कोण असणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. मात्र आर. प्रज्ञानंद आणि डी. गुकेश यांनी केल्या काही वर्षात जो धमाका केला आहे ते पाहून नक्कीच पुढच्या काही वर्षात पुन्हा एकदा भारत चेसचा किंग होईल, एवढं नक्की ! (Latest Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.