Home » श्रीलंकेतील महाबोधी वृक्षावर मोठे संकट

श्रीलंकेतील महाबोधी वृक्षावर मोठे संकट

by Team Gajawaja
0 comment
SriLanka
Share

श्रीलंकेतील (SriLanka) सर्वात जुन्या आणि पवित्र मानल्या जाणा-या महाबोधी वृक्षाला विषारी वायूचा धोका निर्माण झाला आहे. श्रीलंकेत असलेल्या चीनच्या पॉवर प्लांटमधून विषारी वायू निघत आहे. दुषित हवेमुळे या वृक्षावर परिणार होत असल्याचा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे. या वृक्षावर अशाच प्रकारे वायुचा परिणाम झाल्यास या पवित्र बोधी वृक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह निर्माण होईल अशी चिंता आता पर्यावरणवाद्यांना पडली आहे. चीनच्या या पॉवर प्लांटमधून जो विषारी वायू निघत आहे, त्यामुळे त्या भागातील लहान मुलांच्या त्वचेवरही पुरळ येत असून त्यामुळे अनेक मुलांना आणि अन्य नागरिकांनाही त्वचेचे विकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  

महाबोधी वृक्ष हा जगातील सर्वात जुना वृक्ष आहे. भगवान बुद्धांच्या स्मृती या वृक्षासोबत जोडल्या गेल्या आहेत, त्यामुळे या महाबोधी वृक्षाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र आता हा श्रीलंकेतील महाबोधी वृक्ष धोक्यात आला आहे. चीनने श्रीलंकेत काही कारखाने उभारले आहेत.  मात्र त्यातून विषारी वायू बाहेर पडत असून त्यामुळे श्रीलंकेतील (SriLanka) पर्यावरण धोक्यात आले आहे. त्यापैकीच एक प्रकल्प म्हणजे, नोरोचोलाई कोल पॉवर प्लांट. या प्लांटमधील विषारी ऍसिड जगातील सर्वात जुन्या श्री महाबोधी वृक्षासाठी धोकादायक ठरू लागले आहे. परिसराचे सर्वेक्षण केल्यानंतर, पर्यावरणशास्त्रज्ञांनी सांगितले की, पॉवर प्लांटमधून निघणा-या विषारी वायुमुळे महाबोधी वृक्षाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. या वृक्षाची पाने लवकर पिवळी पडत असून त्यामुळे हा महाबोधी वृक्ष वाचवणे जिकीरीचे झाले आहे. या विषारी पॉवर प्लांटच्या आजूबाजूच्या सर्वच झाडांची पाने सुकू लागली आहेत. तसेच काही उंच झाडांची पाने विषारी वायूमुळे पिवळी पडली आहेत. फक्त वृक्षांवरच या विषारी वायुचा परिणाम झालेला नसून या परिसरात राहणाऱ्या अनेकांना त्वचा रोग झाल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.  

नोरोचोलाई प्लांट हा श्रीलंकेतील (SriLanka) सर्वात मोठा थर्मल पॉवर प्लांट आहे. या 900MW क्षमतेच्या प्लांटमधून विहित मानकांपेक्षा जास्त उत्सर्जन नोंदवले गेले आहे. याबाबत अनेकवेळा स्थानिकांना आंदोलन केले आहे. मात्र चीनच्या दबावापुढे श्रीलंकेतील (SriLanka) सरकारचे काहीही चालत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकदा या प्लांटमध्ये बिघाड होतो. त्यामुळे अनेकवेळा प्रदूषित वायू मोठ्या संख्येनं थेट वातावरणात सोडण्यात येतो. त्याचा परिणाम म्हणजे, या परिसरातील अनेक झाडे झाडातून या प्लांटमधून बाहेर पडणा-या राखेनं भरलेली दिसत आहेत. हा सर्वात घातक परिणाम असून यामुळे भविष्यात या सर्व भागातील नागरिकांचेच काय पण पशूपक्षी आणि वृक्षसंपदाही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे. या प्लॅटमधून निघणारी दुषित राख उघड्या खड्ड्यात ठेवण्यात येते. ही राख वाऱ्यासह आसपासच्या भागात पोहोचते, त्यामुळे अनेक लहान मुलांमध्ये त्वचेचे आजार झाले आहेत. याशिवाय वीज केंद्रातून बाहेर पडणाऱ्या गरम वाफेमुळे परिसरातील वातावरणात उष्णतेचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या महाबोधी वृक्षावरही आता या विषारी राखेचा परिणार झाल्याचे आढळून आले आहे. महाबोधी वृक्ष हा बौद्ध धर्मातील पवित्र स्थानांपैकी एक आहे.  महाबोधी वृक्ष हा जगातील सर्वात जुन्या वृक्षांपैकी एक असल्याचे सांगण्यात येते. श्रीलंकेच्या (SriLanka) वायव्य प्रांतातील नोरोचोलाई पॉवर प्लांट अनुराधापुरा येथील श्री महाबोधी वृक्षापासून सुमारे एक तासाच्या अंतरावर आहे. भारतातील पवित्र बोधी वृक्षाच्या एका फांदीपासून महाबोधी वृक्षाची वाढ झाली. हे झाड बौद्ध धर्मीयांसाठी विशेष मानले जाते. 

========

हे देखील वाचा : २० लाख रुपये आणि ११ लोकांसह सुरु झाली होती एसर कंपनी

========

दरवर्षी लाखो बौद्ध धर्मीय या पवित्र वृक्षाला भेट देतात. याबाबत आख्यायिकाही सांगितली जाते. सम्राट अशोकची कन्या राजकुमारी संघमित्रा हिने पवित्र बोधी वृक्षाची एक शाखा श्रीलंकेत (SriLanka) आणली. हे झाड अनुराधापुरा येथे लावण्यात आले. या पवित्र वृक्षाच्या दक्षिणेकडील फांदीवर ‘सियुरा’ (बौद्ध भिक्षूंनी परिधान केलेला केशरी झगा) ठेवून आणि ‘पांडुरा’ (नाण्याने बांधलेला लहान कापडाचा तुकडा) बांधून त्याची पूजा केली जाते. बोधी वृक्ष हे बिहार राज्यातील गया जिल्ह्यातील बोधगया येथील महाबोधी मंदिर संकुलात असलेले पिंपळाचे वृक्ष आहे. भगवान बुद्धांना 531 इ.स या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले. याच वृक्षाचा श्रीलंकेतील वारसा मात्र आता धोक्यात आला आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.