Ghee benefits during winter : शुद्ध तूपाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे शरीर आतमधून गरम राहण्यास मदत होते. पण काहीजणांना वाटते की, तूपामुळे वजन वाढले जाते. मात्र तूपाचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला फायदा नक्की होते. अन्नपदार्थात तूपाचा वापर केल्याने पदार्थांची चव वाढण्यासह आरोग्य हेल्दी राहण्यास मदत होते.
हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, थंडीच्या दिवसात तूपाचे सेवन केल्याने आरोग्यदायी फायदे होतात. शुद्ध तूपात हेल्दी फॅट्स असण्यासह रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पण तुम्हाला तूपाचे योग्य पद्धतीने सेवन कसे करावे हे माहितेय का? याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…
अशाप्रकारे तूपाचे करा सेवन
थंडीच्या दिवसात गरम पोळीवर तूप लावून खाऊ शकता. याशिवाय भाजी तयार करण्यासाठी रिफाइंड ऑइलएवजी तूपाचा वापर करा. एका वाटीत डाळ घेऊन त्यामध्येही तूप मिक्स करु शकता. एवढेच नव्हे सकाळच्या चहा किंवा कॉफीमध्येही तूप मिक्स करून पिऊ शकता.
रोगप्रतिकारक शक्ती वाढेल
शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी तूपाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरिराला उर्जा मिळते. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यास आजारांशी लढण्याची ताकदही वाढली जाते.
त्वचेसाठी फायदेशीर
थंडीच्या दिवसात त्वचा बिघडली जाते. कोरड्या त्वचेवर खाज येणे किंवा रॅशेज येण्याची समस्या उद्भवली जाते. तूपाचा वापर केल्यने त्वचा आतमधून आणि बाहेरुन ओलसरपणा टिकून राहतो. (Ghee benefits during winter)
शरीर गरम राहण्यास मदत होते
थंडीच्या दिवसात शरीर आतमधून गरम राहण्यासह डिटॉक्स करण्यासाठी तूपाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. दिवसातून दोन ते तीन चमचे शुद्ध तूपाचे सेवन करावे.