Home » हा बोगदा एका स्वप्नासारखाच वाटत होता मात्र…

हा बोगदा एका स्वप्नासारखाच वाटत होता मात्र…

by Team Gajawaja
0 comment
Germany and Denmark
Share

युरोपियन युनियन आणि नाटोचे सदस्य असलेल्या डेन्मार्क आणि जर्मनी या दोन शेजारी देशांमधील संबंध अधिक दृढ होणार आहेत. पहिल्या आणि दुस-या महायुद्धात या दोन्ही देशात तेढ असली तरी सध्या हे दोन्ही देश एकमेकांच्या सहकार्यांने प्रगतीच्या नव्या दिशेकडे आहेत. डॅनिश संस्कृती आणि समाजावर जर्मन प्रभाव मोठ्याप्रमाणात असून जर्मनीत डेन्मार्कमधील विद्यार्थी मोठ्या संख्येनं शिक्षणासाठी येत आहेत. या दोन्ही देशात वाहतुकही मोठ्या प्रमाणात चालते. त्यात हवाई वाहतुकीचा समावेश असला तरी सागरी मार्गानेही वाहतूक होते.

जर्मनीहून डेन्मार्काला बोटीमार्गाने जाता येते. यासाठी ४५ ते ६० मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र आता या दोन्ही देशांनी हा वेळही कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या दोन्ही देशातील सागरी मार्गाच्या खालून बोगदा तयार करण्यात येत आहे. जगातील सर्वात लांब सागरी बोगदा म्हणून या बोगद्याची नोंद झाली आहे. (Germany and Denmark)

जर्मनी आणि डेन्मार्क या दोन्ही देशांनी जगातील सर्वात लांब सागरी बोगद्याची घोषणा काही वर्षापूर्वी केली होती. हा बोगदा एका स्वप्नासारखाच वाटत होता. मात्र गेल्याच आठवड्यात डेन्मार्कच्या राजांनी या बोगद्याच्या काही भागाचे उदघटान करत जगाला सुखद धक्का दिला आहे. ४० मिटर लांबीचा हा बोगदा समुद्राच्या पोटातून जाणार आहे. शिवाय हा बोगदा एवढा मोठा असणार आहे, की यामधून ट्रेन आणि गाड्या एकाचवेळी धावणार आहे. या बोगद्यामुळे डेन्मार्क आण जर्मनीमधील अंतर केवळ काही मिनिटावर आले आहे. जर्मनी आणि डेन्मार्क या दोन देशांमध्ये जगातील आणखी एका आश्चर्याची निर्मिती होत आहे. फेहमार्नबेल्ट नावाचा हा बोगदा डेन्मार्क आणि जर्मनीमधील सागरी अंतर दूर करण्यार आहे. अर्थात या दोन्ही देशातील पर्यावरण वादी गटांनी या बोगद्यावर आक्षेप घेतले आहेत. पण डॅनिश सोसायटी फॉर नेचर कॉन्झर्व्हेशनचे मायकेल लोवेन्डल क्रुस यांनी या बोगद्याच्या कामाला पाठिंबा देत पर्यावरण साधत मनुष्याला अधिक सुखदायी बोगदा असे या फेहमार्नबेल्टचे वर्णन केले आहे.

हा बोगदा जगातील सर्वात आश्चर्यकारक बोगदा असणार आहे. कारण बाल्टिक समुद्राच्या ४० मीटर खालून तो तयार होत आहे. हा सर्व मार्ग गाडीत बसून बघता येणार आहे. सध्या या बोगद्याचे काम चालू असून ते पुढच्या पाच वर्षात पूर्ण होईल, अशी आशा आहे. हा प्रकल्प जर्मनी आणि डेन्मार्कला जोडणारा एक विशेष पूल ठरणार आहे. कारण या दोन्ही देशात सांस्कृतिक, आर्थिक देवाण घेवाण मोठ्या प्रमाणात होते. अशात हा फेहमार्नबेल्ट बोगदा त्याला पूरक ठरणार आहे. फेहमार्नबेल्ट बोगद्याचे सर्व काम २०२९ पर्यंत पूर्ण होणार आहे. यामुळे दोन्ही देशांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल. या बोगद्याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन नुकतेच डेन्मार्कचे राजा फ्रेडरिक यांनी केले. (Germany and Denmark)

२०२० मध्ये फेहमार्नबेल्ट बोगद्याचे बांधकाम सुरू झाले तेव्हापासून यावर टिकाही मोठ्या प्रमाणात होत होती. समुद्रातील या बोगद्याची बांधकाम किती टिकाऊ असेल याबाबत शंका घेण्यात आली होती. आता या बोगद्याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यावर हा प्रकल्प कसा असेल हे दाखवण्यात येणार आहे. फेहमार्नबेल्ट बोगदा युरोपमधील सर्वात मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक आहे. यासाठी ७ अब्ज युरो ची गुंतवणूक या दोन्ही देशांनी केली आहे. आत्तापासूनच या बोगद्याची तुलना इंग्लंड आणि फ्रान्सला जोडणाऱ्या ५० किलोमीटर चॅनेल टनेलशी केली जात आहे. फेहमार्नबेल्ट बोगद्याचे काम जर्मन बेट फेहमर्न आणि डॅनिश बेट लॉलँड यांच्यामध्ये होत आहे. (Germany and Denmark)

============================

हे देखील वाचा : ट्रॅव्हल करण्याचे जबरदस्त फायदे, ऐकून व्हाल हैराण

============================

सध्या या मार्गावरुन बोटींनी प्रवाशांची ने आण केली जाते. यासाठी तासाभराचा कालावधी लागतो. मात्र बोगदा पूर्ण झाल्यावर हे अंतर ट्रेनने फक्त ७ मिनिट आणि कारने १० मिनिटांत पार करता येईल. अमेरिकन कंपनी रीजेंट सीग्लाइडकडे या बोगद्याचे कंत्राट आहे. यातून एक सर्व्हिस रोड आणि दोन इलेक्ट्रिक रेल्वे ट्रॅक असतील. फेहमार्नबेल्ट बोगद्याच्या कामाची सुरुवात २००८ मध्ये झाली. डेन्मार्कमधून या बोगद्याला लगेच मान्यता मिळाली असली तरी जर्मनीतील अनेक संस्थांनी पर्यावरण आणि आवाजाच्या कारणास्तव या बोगद्याला सुरुवातीला विरोध केला होता. या विरोधकांना समाधानकारक उत्तर दिल्यावर बोगद्याचे काम सुरु करण्यात आले. आणखी तीन वर्षांनी या बोगद्याचा आणखी एक टप्पा नागरिकांसाठी खुला करुन देण्यात येणार आहे.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.