संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चालू असलेला गोंधळ शांत होण्याच चिन्हे दिसत नाहीत. सत्ताधारी पक्षाला उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरुन घेरण्याचा प्रयत्न करणा-या विरोधी पक्षालाच आता जॉर्ज सोरोस यांच्यावरुन सत्ताधा-यांनी कैचीत पकडले आहे. अमेरिकन अब्जाधीश असलेल्या जॉर्ज सोरोस यांच्या एका एनजीओमध्ये सोनिया गांधी या उपाध्यक्ष असल्याचा आरोप आहे. जॉर्ज सोरोस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधक मानले जातात.
नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी जॉर्ज सोरोस यांनी करोडो रुपये खर्च केल्याचा आरोप आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला हानी पोहचवण्यासाठीही सोरोस यांनी बराच प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येतो. याच सोरोस यांच्या एका एनजीओमध्ये सोनिया गांधी पदाधिकारी आहेत. या एनजीओचा स्वतंत्र काश्मिरला पाठिंबा असल्याचाही गंभीर आरोप आहे. सत्ताधारी पक्षानं कॉंग्रेस आणि त्यांच्या नेतृत्वाला या गंभीर आरोपामध्ये घेरलं आहे. अशावेळी जॉर्ज सोरोस हे नेमके कोण आहेत, आणि त्यांच्या या वादग्रस्त संस्थेत काय काम होतं, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जॉर्ज सोरोस हे अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती आहेत. त्याचा जन्म हंगेरीतील ज्यू कुटुंबात झाला. हिटलरनं जे ज्यू हत्याकांड केले त्यात सोरोस यांचे कटुंब वाचले आणि हंगेरीत स्थलांतरीत झाले. सोरोस यांचे शिक्षण हालाखीत झाले. मात्र त्यांनी नंतर अनेक मार्गातून पैसे कमवायला सुरुवात केली. शेअर बाजारातून सोरोस यांनी सुमारे 44 अब्ज डॉलर्स कमावण्याची माहिती आहे. या पैशातून त्यांनी शाळा आणि रुग्णालये बांधली. 1979 मध्ये, सोरोस यांनी ओपन आता सुमारे 120 देशांमध्ये सक्रीय असल्याची माहिती आहे. सोरोस हे आपल्या अनेक वक्तव्यांनी वादात सापडले आहेत.
त्यांनी 2003 च्या इराक युद्धावर टीका केली आणि डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ अमेरिकाला लाखो डॉलर्स दान केले. यानंतर अमेरिकेच्या उजव्या विचारसरणीकडून त्यांच्यावर होणारे हल्ले अधिक तीव्र होऊ लागले. 2019 मध्ये, ट्रम्प यांनी एक व्हिडिओ रिट्विट करुन सोरोस यांनी होंडुरासमधील हजारो निर्वासितांना अमेरिकेच्या सीमा ओलांडण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप केला आहे. भारतात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनामागेही जॉर्ज सोरोस यांचाच हात असल्याचा आरोप होतो. देशांमधील सरकार अस्थिर करण्यासाठी सोरोस हे पैसा पुरवत असल्याचा आरोपही अनेकवेळा झाला आहे. याच सोरोस आणि गांधी घराण्याची मैत्री असून राहूल गांधी यांचे परदेश दौरे सोरोस यांच्यातर्फेच आयोजित केल्याचाही चर्चा आहे. आता त्याच जॉर्ज सोरोस यांच्या संस्थेत सोनिया गांधी उपाध्यक्ष असल्याचा आरोप विरोधी पक्षातर्फे करण्यात येत आहे. याबाबत भाजप खासदारांनी राज्यसभेत मुद्दा उपस्थित करुन ही राष्ट्रीय एकात्मतेसाठी अत्यंत चिंतेची बाब असल्याचे सांगितले. शिवाय या खासदारांनी नियम 267 अन्वये राज्यसभेत चर्चा करण्याचीही मागणी केली. अशा आरोपांवर काँग्रेसने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असला तरी संसदेत जॉर्ज सोरोस यांचे नाव पुन्हा एकदा गाजत आहे.
जॉर्ज सोरोस यांच्या संदर्भातील ज्या संस्थेचे नाव आले आहे, ती आहे FDL-AP. म्हणजेच Forum of Democratic Leaders in the Asia-Pacific. अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याकडून निधी मिळवणाऱ्या संस्थेशी कॉंग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी संबंधित असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. फोरम ऑफ डेमोक्रॅटिक लीडर्स इन एशिया-पॅसिफिक नावाच्या संघटना वादग्रस्त असल्याचा आरोपही होत आहे. ही एक ना-नफा संस्था आहे. त्याची स्थापना डिसेंबर 1994 मध्ये दक्षिण कोरियाचे तत्कालीन अध्यक्ष किम डे-जुंग यांच्या पुढाकाराने झाली. FDL-AP फोरम आशियातील लोकशाही समाजांच्या विकासास समर्थन देत असल्याची माहिती आहे. आशिया-पॅसिफिक प्रदेशात लोकशाहीला चालना देण्यासाठी या मंचाची स्थापना करण्यात आली. FDL-AP च्या वेबसाइटवर जॉर्ज सोरोस फाउंडेशन तसेच किम डाई-जंग पीस फाउंडेशन, ओलोफ पाल्मे इंटरनॅशनल सेंटर आणि नौमन फाउंडेशन यांच्याकडून आलेल्या आर्थिक मदतीची यादीही आहे. असे असले तरी ही वेबसाईट अनेक दिवसांपासून अपडेट केलेली नाही. त्यावर सोनिया गांधी यंचा सह-अध्यक्षा असा उल्लेख आहे. शिवाय फिलीपिन्सच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोराझोन अक्विनो याही त्यांच्या सह-अध्यक्ष होत्या.
========
हे देखील वाचा : पुण्याच्या शनिवारवाड्यातून आजही अशी आरोळी ऐकू येते !
========
कोराझोन यांचे 2009 मध्ये निधन झाले. त्यांच्या व्यतिरिक्त, दक्षिण कोरियाचे तत्कालीन अध्यक्ष किम डे-जंग आणि कोस्टा रिकाचे माजी अध्यक्ष आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते ऑस्कर एरियास हे देखील त्यांच्या सह अध्यक्ष आहेत. तसेच बर्मा, दक्षिण आफ्रिका, रशिया आणि जर्मनीचे नेतेही त्याचे वरिष्ठ सल्लागार असल्याची माहिती आहे. मात्र ही संघटना काश्मीर भारतापासून वेगळे करण्याचा पुरस्कार करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. कारण काश्मीर प्रश्नावरील काही कागदपत्रे आणि मुलाखती त्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आहेत. मोदी सरकार पाडण्यासाठी 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केल्याचे उघडपणे सांगणा-या जॉर्ज सोरोस यांच्या या संघटनेचे कार्य अद्यापही उघड करण्यात आलेले नाही. मात्र पाकिस्तानबाबत त्यांनी केलेली प्रशंसा वाद निर्माण करणारी आहे.
सई बने