Home » शिवलिंगाला तुळशीच्या पानांचा सुगंध !

शिवलिंगाला तुळशीच्या पानांचा सुगंध !

by Team Gajawaja
0 comment
Gandeshwar Mahadev Temple
Share

भगवान शंकराची मंदिरे भारतदेशाच्या प्रत्येक प्रांतात आहे. यापैकी अनेक मंदिरांना पौराणिक वारसा आहे. भगवान शंकराची ११ ज्योतिर्लिंगही प्रसिद्ध आहेत. ही सर्वच मंदिरे हजारो वर्षाचा इतिहास सांगतात. या प्रत्येक मंदिराचे एक आगळे वैशिष्ट आहे. असेच एक भगवान शंकराचे मंदिर छत्तिसगड राज्यात आहे. छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातील सिरपूर येथील या मंदिराला गंधेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळखळे जाते. कारण या मंदिरातील शंकराच्या पिंडीमधून तुळशीच्या पानांचा सुगंध अहोरात्र येतो. हे मंदिर ज्या सिरपूर येथे आहे, ते गाव महासमुंद जिल्ह्यात येते. या सर्व भागाला प्राचीन बौद्ध शहर म्हणूनही ओळखले जाते. तसेच छत्तीसगडचे बाबा धाम म्हणूनही या भागाची ओळख आहे. गंधेश्वर महादेव मंदिरातील शिवपिंड हे हजारो वर्ष जुने असल्याची माहिती आहे. (Gandeshwar Mahadev Temple)

छत्तीसगडमधील सिरपूर येथील गंधेश्वर महादेव मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. या मंदिरात काही काळ प्रत्यक्ष भगवान शंकरानं वात्यव्य केल्याचेही सांगितले जाते. हजारो वर्षापूर्वी बांधलेल्या या मंदिराला विनाशकारी भुकंपाचाही फटका बसला. मात्र तत्कालीन राजांनी मंदिराची पुर्नबांधणी केली. त्यामुळे आज हे मंदिर हजारो शिवभक्तांसाठी श्रद्धेचे स्थान झाले आहे. गेल्या काही वर्षापासून या मंदिराची देखभाल पुरातत्व विभागातर्फे करण्यात येते. पुरातत्व विभागाचे तज्ञ या मंदिराचा इतिहास शोधत असून त्यांच्यामते हे मंदिर जेव्हा उभारले तेव्हा अतिशय भव्य आणि संपन्न असे होते. पहिल्या शतकाच्या सुरुवातीला सर्वपुरिया राजांनी हे गंधेश्वर महादेव मंदिर बांधल्याची माहिती आहे. (Gandeshwar Mahadev Temple)

हे मंदिर महानदीच्या काठावर वसलेले आहे. श्रावण आणि महाशिवरात्रीला या गंधेश्वर महादेव मंदिरात भक्तांची मोठी गर्दी होते. यावेळी भगवान शंकराला जल अर्पण करण्यासाठी हजारो कांवडधारकही श्रद्धेनं मंदिरात येतात. महादेवाच्या भक्तांचा मोठा मेळा यावेळी मंदिर परिसरात भरतो. या मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. त्यानुसार भगवान शंकरांनी बाणासुरला सांगितले होते की, ते काशीऐवजी सिरपूरमध्ये प्रकट होणार आहेत. तेव्हा बाणासुराने परमेश्वराला त्यांची ओळख कशी होईल, असा प्रश्न विचारला. तेव्हा भगवान शंकरांनी आपण जिथून प्रकट होऊ, त्या शिवलिंगाला तुळशीपत्रांचा सुगंध येईल, असे सांगितले. असेच शिवलिंग प्रकट झाल्यावर बाणासुरानं तिथे भव्य मंदिर उभारले. तेव्हापासूनच या शिवलिंगाला गंधेश्वर महादेव असे नाव पडले. (Gandeshwar Mahadev Temple)

इतिहासकारांच्या मते गंधेश्वर महादेव मंदिराचे शिवलिंग सुमारे दोन हजार वर्षे जुने आहे. या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला सदैव तुळशीच्यापानाचा सुगंध येतो. हा सुगंध नेमका कशामुळे येतो, याचा अद्याप शोध घेता आलेला नाही. पहिल्या शतकाच्या सुरुवातीला सर्वपुरिया राजांनी या गंधेश्वर महादेव मंदिराला भव्य स्वरुप दिले. सोन्या, चांदीने मंदिराची सजावट करण्यात आली होती. या विशाल मंदिराला पहिल्यांदा १२व्या शतकात झालेल्या विनाशकारी भूकंपाचा फटका बसला. नंतर महानदीला आलेल्या पुरात मंदिर उद्ध्वस्त झाले. पण मंदिर उदध्वस्त झाले तरी त्यातील शिवलिंग सुखरूप बचावले. नंतरच्या काळातील राजांनी या जागी पुन्हा मंदिर उभारले आणि काळानुसार त्याचे नुतनीकरण होत राहिले. आता हा सर्व परिसर पुरातत्व विभागाच्या नियंत्रणाखाली आहे. (Gandeshwar Mahadev Temple)

==============

हे देखील वाचा : मृत्युंजय महादेवाचे रहस्य

===============

पुरातत्व विभाग गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी उत्खनन करत आहे. आत्तापर्यंत मुख्य गंधेश्वर महादेव मंदिराच्या आवारात अनेक लहान-मोठी शिवलिंगे मिळाली आहेत. या मंदिराला जो पुराचा तडाखा बसला त्यात मंदिराचा बराचसा इतिहास जमिनीखाली दडला गेल्याचे जाणकारांचे मत आहे. यासाठी याभागात सातत्यानं उत्खलन करण्यात येत आहे. गेल्या वर्षी केलेल्या उत्खननात येथे नाणी, मूर्ती, ताम्रपट, भांडी, शिलालेख आदी गोष्टी सापडल्या आहेत. या सर्व वस्तूंचे वयोमान हे २ हजार वर्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातूनच या गंधेश्वर महादेव मंदिराची उभारणी हजारो वर्षापूर्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या मंदिराच्या परिसरात आत्तापर्यंत २१ वेगवेगळी शिवलिंग सापडली आहेत. विशेष म्हणजे, ही शिवलिंग गंधेश्वर महादेवाच्या शिवलिंगासारखीच आहेत. मात्र त्यांना तुलशीच्या पानांचा सुगंध येत नाही. त्यामुळेच या सर्व अधिक उत्खलन करण्याची मागणी होत आहे. (Gandeshwar Mahadev Temple)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.