Home » झेंडावंदनाचे ‘हे’ प्रमुख नियम प्रत्येक भारतीयाला माहिती असायलाच हवेत

झेंडावंदनाचे ‘हे’ प्रमुख नियम प्रत्येक भारतीयाला माहिती असायलाच हवेत

by Team Gajawaja
0 comment
Flag hoisting rules
Share

यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अख्ख्या देशाने साजरा केला. सोशल मीडियावर बहुतांश लोकांच्या फोटोमध्ये तिरंगा दिसत होता. जवळपास सर्वच महानगरं, शहरं, गावं येथील महत्त्वाच्या व प्रमुख वास्तूंना दोन/ तीन दिवस अगोदरपासूनच तिरंगी रोषणाई करण्यात आली होती. इतकंच नव्हे तर, मोदींच्या ‘हर घर तिरंगा’ या संकल्पाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे यावर्षी घरोघरी झेंडा फडकू लागला.  दिवाळीमध्ये जसं वातावरण असतं तसंच वातावरण यावर्षी स्वातंत्र्यदिनाला अनुभवायला मिळालं आणि या राष्ट्रीय सणाला सांस्कृतिक स्वरूपही आलं.  (Flag hoisting rules)

१५ ऑगस्ट १९४७ साली देश स्वतंत्र झाल्यावर २६ जानेवारी १९५१ रोजी आपल्या देशाची स्वतंत्र घटना तयार झाली, त्यामुळे हे दोन्ही दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात. पण जसे आपण धार्मिक उत्सव किंवा सांस्कृतिक सण साजरे करताना काही नियम पाळतो तसेच नियम राष्ट्रीय सण साजरे करतानाही पाळायला हवेत. उदा. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना त्याचा मुहूर्त म्हणजे वेळ, गुढीची दिशा, गुढीला घालायचा हार, तांब्या कसा ठेवायचा, इ अनेक गोष्टी शास्त्रानुसार करतो. अगदी तशीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त काळजी झेंडावंदनाच्या दिवशीही घ्यायला हवी. कारण तिरंगाचा अपमान होईल अशी अगदी छोट्यातली छोटी चूक आपल्या हातून चुकूनही घडता कामा नये. 

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन्ही दिवशी ‘ध्वजवंदन’ वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं, हे तुम्हाला माहिती आहे का? खरंतर हे प्रत्येक भारतीयाला माहीत असायला हवं. १५ ऑगस्टचे ‘ध्वजारोहण’ आणि २६ जानेवारीला ‘झेंडा फडकवणे’ यामध्ये फरक आहे. हे फरक कोणते आहेत याबद्दल समजून घेऊया (Flag hoisting rules)

१. कोणाच्या हस्ते –

   १५ ऑगस्ट –  ध्वजारोहण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जातं . 

  २६ जानेवारी:  या दिवशी राष्ट्रपती झेंडा फडकवतात कारण देश स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपती पद   अस्तित्वातच आलेलं नव्हतं. 

२. पद्धत –

१५ ऑगस्ट:  या दिवशी झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो. त्याला ‘ध्वजारोहण’ (flag hoisting) म्हणतात. 

२६ जानेवारी:  झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून ‘झेंडा फडकवला’ (flag unfurling) जातो. 

=====

हे देखील वाचा – ७५ वर्षांत ‘आत्मनिर्भर’ झालेला भारत

=====

३. ध्वजारोहण आणि झेंडा फडकवणे यामधील फरक 

ध्वजारोहण: १५ ऑगस्ट १९४७ ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला ‘ध्वजारोहण’ म्हणतात.

 झेंडा फडकवणे: २६ जानेवारी १९५० ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्यावर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केला जातो, म्हणून त्याला ‘झेंडा फडकवणे’ म्हणतात. (Flag hoisting rules)

४. स्थळ 

१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर ‘ध्वजारोहण’ होते. 

२६ जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर ‘झेंडा फडकवला’ जातो.

तर हे होते, १५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनी आणि २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन कसं करायचं या संबंधित महत्त्वाचे नियम. ही अत्यंत महत्त्वाची माहिती असून ती प्रत्येक भारतीयाने आपल्या संग्रही ठेवायला हवी. 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.