अमेरिकन अंतराळ संस्था नासानं 50 वर्षांनंतर आपल्या चंद्र मोहीमेची घोषणा केली आहे. या मोहिमेची तीन वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी एक म्हणजे हे यान चंद्रावर उतरणार नाही, तर चंद्राभोवती फेरी मारणार आहे, आणि त्यातून भविष्यात चंद्रापर्यंत होणा-या अन्य मोहिमांसाठी पार्श्वभूमी तयार करण्यात येणार आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे, या चार अंतराळवीरांमध्ये एका कृष्णवर्णीय अंतराळवीराचाही समावेश करण्यात आला आहे. आणि तिसरे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, पहिल्यांदाच एका महिलेला चंद्र मोहिमेवर जाण्याची संधी मिळणार आहे. क्रिस्टीना कोच या चंद्रावर जाणा-या पहिल्या महिला (First Women) असून त्या 44 वर्षाच्या आहेत.
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपल्या चंद्र मोहिमेची घोषणा केली आहे. यातून चार अंतराळवीर चंद्रावर जाणार असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. नासाच्या मते, चंद्राच्या जवळ जाणार्या चार अंतराळवीरांमध्ये क्रिस्टीना कोच ही पहिली महिला (First Women) अंतराळवीर ठरणार आहे. या चंद्र मोहिमेअंतर्गत जाणारे अंतराळवीर प्रत्यक्षात चंद्रावर उतरणार नाहीत. पण त्यांच्या मदतीनं आणि या मोहिमेच्या भविष्यात चंद्रावर जाणाऱ्या प्रवाशांना उतरण्याचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न होणार आहे. नासाचे हे मिशन 2024 च्या शेवटी किंवा 2025 च्या सुरूवातीला सुरु होणार आहे. ह्यूस्टन, टेक्सास येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान नासाने या चार अंतराळवीरांना सर्वांसमोर सादर केले. तसेच या अभियानाची माहिती दिली. या अंतराळवीरांमध्ये तीन प्रवासी अमेरिकन नागरिक आहेत आणि एक कॅनडाचा नागरिक आहे. आता हे चारही आंतराळवीर या चंद्र मोहिमेसाठी कठोर प्रशिक्षण घेणार आहेत. नासाने यापूर्वी 1972 मध्ये अपोलो मोहीम सुरू केली होती. यानंतर नासाच काय पण जगभरातल्या कोणत्याही देशाचा नागरिक चंद्रावर उतरु शकला नाही. मात्र आता चंद्रावर पाय ठेवण्यासाठी भारत, चीन, रशिया या देशांमध्ये स्पर्धा चालू झाली आहे. त्यात अमेरिकेनं या चंद्र मोहिमेची घोषणा केल्यावर एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा आहे. (First Women)
नासाची अत्यंत महत्वाकांक्षी अशी अपोलो मोहीम यशस्वी ठरली होती. त्यातून नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिले मानवी पाऊल नोंदवले. हा विक्रम अजूनही नासाच्याच नावावर आहे. आता त्यानंतर 50 वर्षांनंतर नासा पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. नासानं या मोहिमेसाठी क्रिस्टीना हॅमॉक कोच, रीड विझमन, व्हिक्टर ग्लोव्हर आणि कॅनडाच्या अंतराळ एजन्सीचे अंतराळवीर जेरेमी हॅन्सन यांची निवड केली आहे. हे चार आंतराळवीर आर्टेमिस द्वितीय या मोहिमेवर जातील. पहिल्यांदाच(First Women), नासाने चंद्रावरील आपल्या मोहिमेसाठी अंतराळवीर म्हणून एका महिला आणि आफ्रिकन-अमेरिकन व्यक्तीची निवड केली आहे. या दशकाच्या उत्तरार्धात चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळवीरांच्या कायमस्वरूपी वास्तव्यासाठी सुविधा निर्माण करणे हे आर्टेमिस मिशनचे उद्दिष्ट आहे. ही मोहीम म्हणजे नासाचे खूप मोठे ध्येय आहे. नासा गेली काही वर्ष मंगळ मोहिमेसाठी प्रयत्नशील आहे. आर्टेमिस मिशनद्वारे चंद्राभोवती फिरुन आंतराळवीर चंद्रावर वास्तव्याच्या सुविधांचा विचार करतील. हे चंद्रावरील वास्तव्य निश्चित झाल्यावर मग मंगळ मोहिमेवर नासा पूर्णपणे काम करणार आहे. भविष्यात जे आंतरराळवीर मंगळावर जातील, त्यांचा आधी मुक्काम चंद्रावर असणार आहे. मंगळावरील भविष्यातील शोधांसाठी कायमस्वरूपी ही नासाची चौकीच असणार आहे. नासाचे आर्टेमिस एक हे मिशन डिसेंबर 2022 मध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. या मिशनमधून नासाच्या मेगा-रॉकेटने अंतराळयानाचे 25 दिवसांचे चाचणी उड्डाण पूर्ण केले. आता या नव्या मोहिमेद्वारे नासा चंद्राभोवती 10 दिवसांची प्रदक्षिणी घालणार आहे. शिवाय ओरियन रॉकेटची उपकरणे आणि इतर यंत्रणा कुठे ठेवली जातील याचा अंदाज घेणार आहे.
======
हे देखील वाचा : NATO म्हणजे काय?
======
नासाच्या या मोहिमेतील महिला अंतराळवीर क्रिस्टीना यांच्याबद्दल उत्सुकता आहे. पहिली महिला (First Women) अंतराळवीर क्रिस्टीना हॅमॉक कोच यांनी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी आणि भौतिक पदवी प्राप्त केली आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील मास्टर ऑफ सायन्सची पदवीही त्यांच्या नावावर आहे. क्रिस्टीना 2013 मध्ये नासामध्ये रुजू झाल्या. त्यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन साठी फ्लाइट इंजिनीअर म्हणून काम केले. आता क्रिस्टीना चंद्रावर जाणारी पहिली महिला बनून एक नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवणार आहे. या मोहिमेतील जेरेमी हॅन्सन हे कॅनडाचे रहिवासी आहेत. कॅनेडियन स्पेस एजन्सीमध्ये सामील होण्यापूर्वी ते रॉयल कॅनेडियन एअर फोर्समध्ये फायटर पायलट होते. ही त्याची पहिली अंतराळ मोहीम असेल. नासाच्या या मोहिमेत सहभागी झालेले रीड विजमन हे अमेरिकन नौदलात पायलट आहेत. त्यांनी काही काळ नासाच्या अंतराळवीर कार्यालयाचे प्रमुख म्हणूनही काम केले आहे. 2015 मध्ये ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर मोहिमेवर गेले होते. या मोहिमतील व्हिक्टर ग्लेबर, हे देखील प्रशिक्षणार्थी पायलट म्हणून यूएस नेव्हीमध्ये होते. 2013 मध्ये ते नासामध्ये रुजू झाले आणि 2020 मध्ये त्यांनी पहिले अंतराळ उड्डाण केले. स्पेस स्टेशनवर सहा महिने रहाणारे ते पहिले आफ्रिकन अमेरिकन ठरले आहेत. नासाच्या या मिशनसाठी क्रिस्टीनाच्या नावाची घोषणा झाली तेव्हा तिने आनंद व्यक्त केला. क्रिस्टीनानं ही तिच्यासाठी सन्मानाची बाब असल्याचे सांगितले आहे.