Fashion Tips : लग्न कोणत्याही महिलेच्या आयुष्यातील सर्वाधिक खास दिवस असतो. या दिवशी त्यांना फार सुंदर दिसायचे असते. यामुळे महिला लग्नसोहळ्यासाठी सर्व गोष्टी परफेक्ट निवडतात. पण खरेदीवेळी लेहंगा निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
जर तुम्ही परफेक्ट लेहंगा न निवडल्यास ऐन लग्नात तुमचा लुक बिघडला जाऊ शकतो. यामुळे परफेक्ट लेहंगा खरेदी करताना काय करावे याबद्दल जाणून घेऊया अधिक….
घट्ट लेहंगा खरेदी करू नका
बहुतांश महिला बॉडी फिटिंग लेहंगा परिधान करणे पसंत करतात. पण अशातच त्वचेसंबंधित काही समस्या उद्भवू शकतात. लग्नसोहळ्यावेळी लेहंगा तुम्हाला संपूर्णवेळ परिधान करावा लागतो. यामुळे लेहंग्याची निवड करताना त्यामध्ये तुम्ही कंम्फर्टेबल आहात का हे आधी पाहा.

Fashion Tips
बॉडी टाइपनुसार निवडा लेहंगा
लेहंगा पसंत करताना बहुतांशजणी आपल्या बॉडी टाइपकडे दुर्लक्ष करतात. काहीजणी तर आपल्यासाठी असा लेहंगा निवडतात जो त्यांच्या बॉडी टाइपला सूट देखील करत नाही. यामुळे लेहंगा खरेदी करताना तुमचा बॉडी टाइप समजून घ्या आणि त्यानुसारच तो खरेदी करा. (Fashion Tips)
योग्य रंगातील लेहंग्याची निवड
मार्केटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाइन आणि रंगातील लेहंगा पाहायला मिळेल. पण तुम्ही त्याच रंगातील शेड्समधील लेहंग्याची निवड करा जो तुमच्या स्किन टोनला मॅच करेल. या शिवाय लग्न कोणत्या वेळी पार पडणार आहे त्यानुसारही लेहंगा खरेदी करा. दिवसा आणि रात्रीच्या लग्नावेळी परिधान केल्या जाणाऱ्या कपड्यांचा रंग फार काळजीपूर्वक निवडला पाहिजे.